महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना 2023 | फायदे, उद्देश्य काय आहे | Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana in Marathi

पूर्वी समाजामध्ये स्त्री या जातीला खूप हलक समजत होते. त्यांना इज्जत, त्यांचे विचार एवढेच नव्हे तर ते अस्तित्त्वातच नाही आहे असे धरून चालायचे. त्यांच्या कडे खूप दुर्लक्ष केले जात होते. पन जसे – जसे समजा मध्ये प्रगती होत राहिली तस – तसे महिलांच्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन ही बदलला. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करून अव्वल येते. परंतु ग्रामीण भागात अजूनही महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. ग्रामीण भागात अजून सुद्धा महिला या निरक्षर व निराधार आहेत. अजूनही त्यांना त्यांचे निर्णय स्वतः घेण्याची परवानगी नाही आहे. | Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana

महिलांचा सर्वांगीण विकास होऊन ते सर्व दृष्टीने सक्षम होऊन त्यांचा विकास करतील. त्यासाठी सरकारने महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी व्हावी यासाठी महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना राबविण्यात आली आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांना सर्व लाभ घेता येतील व ते सशक्त बनतील. तसेच आर्थिकदृष्टय़ा प्रबल होतील.

Table of Contents

Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana हा असाच एक उपक्रम आहे जो सरकारने महिलांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरू केला आहे. आजच्या ह्या article मध्ये आपण महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना 2023 काय आहे, त्याचे फायदे, उद्धेश्य काय आहे हे व ही योजना का राबविण्यात आली आहे हे आपण बघणार आहोत.

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना मुख्य उद्देश

महाराष्ट्र सरकार महिलांच्या सशक्तिकरणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवते, या योजनेच्या अंतर्गत महिला स्वावलंबी होतील त्यांच्या धाडस आणि बळावर ते उभे राहतील.

महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हे महासमृद्धी महिला शक्तीकरण योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. याद्वारे महिलांना विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध करून दिल्या जातात, ज्यामुळे त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत होते. या योजनेचा उद्देश महिलांना अधिकार, संसाधने आणि कौशल्ये देऊन सक्षम करणे आहे.

 • महिलांचे पोषण, आरोग्य, शिक्षण, स्वाभिमान जपणे, इत्यादी बद्दल जनजागृती करणे.
 • महिलांचा आर्थिक आणि सामाजिक विकास व्हावा.
 • सरकार महिलांच्या सक्षमकीकरणासाठी विविध लोकचळवळ उभारण्यात तत्पर असते.

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना काय आहे |Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana in Marathi

महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील सशक्त बनवण्यासाठी महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना काढली आहे. जागतिक महिला दिन या दिवशी म्हणजेच 8 मार्च 2021 रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. समाजात महिलांसाठी राखीव जागा भेटावी तसेच महिला स्वावलंबी होतील आणि 7/12 उताऱ्यावर आपल्या पति सोबत पत्नी नाव लावतील तसेच घरातील सम्पत्ति मध्ये बरोब्बर वाटा भेटावा ह्या गोष्टींना प्रोत्साहन देने हे महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेचे महत्व आहे.

या योजनेंतर्गत महिलांना व्यवसाय, उद्योग, कृषी, पशुसंवर्धन, आर्थिक सेवा, शिक्षण, प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रात संधी दिली जातात. याशिवाय आर्थिक मदत, बेकिंग सुविधा, कर्ज योजना, तांत्रिक सहाय्य, मार्गदर्शन अशा विविध सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात.

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना Key Highlights

योजनेचे नावमहासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना
व्दारा सुरुमहाराष्ट्र सरकार
तारीख8 मार्च 2021
योजना कोणी काढलीमहाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री हसन मुशरीफ
लाभार्थीग्रामीण महिला
उद्देश्यराज्याच्या ग्रामीण महिलांचे सशक्तिकरण

महासमृद्धी महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत महिलांना विविध लाभ मिळतात. हा लाभ त्यांना आर्थिक स्वातंत्र्य, व्यवसाय विकास, प्रशिक्षण आणि शिक्षण, आर्थिक सहाय्य, बँकिंग सुविधा आणि तांत्रिक सहाय्य या स्वरूपात दिला जातो. या फायद्यांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात आणि त्यांच्या धोरणात्मक आणि मानसिक स्थितीत सुधारणा करतात.

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना फायदे | Benefits of Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana in Marathi

महासमृद्धी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिलांना खालील फायदे मिळतात.

 • आर्थिक स्वातंत्र्य मदत
 • कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाच्या संधी
 • आर्थिक मदत
 • बँकिंग सुविधा
 • उद्योग आणि व्यापारासाठी समर्थन
 • सामाजिक जाणीव आणि समस्यांची जाणीव

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना Eligibility Criteria in Marathi

 • महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजने साठी महाराष्ट्राचा मूळचा रहिवासी असावा .
 • फक्त महिला या योजनेसाठी पात्र ठरतील.
 • लाभ घेणारी महिला ही ग्रामीण क्षेत्रातील निवासी पाहिजे.

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेसाठी लागणारे Documents in Marathi

रहिवासी दाखला ( Address Proof )

ओळख पुरावा ( Identify Proof )

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजनेअंतर्गत राबवले जाणारे कार्यक्रम

 • स्वयं सहाय्यता गट ( SHGs ) व ग्रामसंघच्या माध्यमातून महिला सक्षम संस्था निर्माण करणे .
 • ग्रामीण भागातील पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढवणे.
 • महिलांचे उपजीविकेचे स्तोत्र वाढवणे तसेच सेवा क्षेत्रात उद्योग निर्मिती करण्यासाठी कर्ज व निधी चे वितरण करणे.
 • महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाचे marketing करणे.
 • महिलांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी स्टॉल लावण्याची संधी उपलब्ध करून देणे.
 • महिलांचा दर्जा उंचवण्यासाठी अन्न, पोषण, आरोग्य व स्वच्छताबाबत विविध उपक्रम राबवणे व सर्व सोयी उपलब्ध करून देणे
 • सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवावा व विविध उपक्रम राबविणे.

कार्यक्रमांचे वर्णन:

Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana समर्पित महिलांच्या उद्देशाने विविध कार्यक्रम आयोजित करते. खालील काही मुख्य कार्यक्रम आहेत:

कौशल्य विकास योजना : महिलांना प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी आधार दिला जातो. हा कार्यक्रम त्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यास आणि रोजगाराच्या संधी ओळखण्यास मदत करतो.

आर्थिक सहाय्य योजना : महिलांना कर्ज आणि आर्थिक मदतीद्वारे उद्योग सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मदत केली जाते. हा कार्यक्रम त्यांना स्वावलंबनासाठी आवश्यक आर्थिक संसाधने प्रदान करतो.

व्यवसाय आधारित उद्योजकता कार्यक्रम : महिलांसाठी व्यवसाय नवकल्पना आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केले जातात. हे महिलांना उद्योजकतेच्या जगात संधी शोधण्यात आणि व्यवसाय स्थापित करण्यात मदत करते.

सामाजिक जागरूकता : सामाजिक समस्या, अधिकार आणि महिलांच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी सामाजिक जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जातात. हा कार्यक्रम महिलांच्या स्थितीत बदल करण्यास आणि त्यांना न्यायाधीशपदासाठी अधिक सक्रिय करण्यास मदत करतो.

थोडक्यात, महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना हा महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारी मदत पुरवणारा एक प्रमुख उपक्रम आहे. ही योजना महिलांना स्वतंत्र आणि सक्रिय बनविण्यात मदत करते आणि त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक संसाधने प्रदान करते. महिला माध्यम आणि महिला सक्षमीकरणाच्या प्रगतीशील टप्प्यातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

FAQs

महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना केव्हा काढण्यात आली ?

महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना 8 मार्च 2021 रोजी काढण्यात आली.

महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?

राज्याच्या ग्रामीण महिला या महिला सशक्तीकरण योजनेचे लाभार्थी आहेत.

महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेचे महत्व काय आहे ?

महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना हा महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारी मदत पुरवणारा एक प्रमुख उपक्रम आहे.

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना काय आहे ?

ग्रामीण भागातील सर्व महिलांना स्वावलंबी बनवून त्यांची प्रगती करणे व त्यांना सर्वांगीण प्रबळ बनवणे.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना  या योजनेची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.

जर तुम्हाला महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना 2023 | फायदे, उद्देश्य काय आहे | Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana in Marathi या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment