बेकरी व्यवसाय कसा सुरू करावा 2023 | HOW TO START BAKERY BUSINESS IN MARATHI

नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत की बेकरी व्यवसाय कसा सुरू करावा, मित्रांनो तुम्हाला तर बेकरी हा शब्द माहीतच असेल, तर आपण आज बघणार आहोत, की बेकरी टाकण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, किंवा काय शिकावं लागतं, असे खूप लोक असतात, की त्यांना केक विषय किंवा बेकरी हे काय असतं, कसं करावं हे माहीत नसते, तर आपण त्यांना आज सांगणार आहोत, की केक आणि बेकरी हे काय आहे किंवा हा व्यवसाय आपण कसा चालवावा. या संदर्भात सगली माहिती आज आपण तुम्हाला ह्या लेखात बघायला मिलेल.

बेकरी व्यवसाय कसा सुरू करावा

बेकरी म्हणजे त्यात तुम्ही केक, पाव, ब्रेड,  बिस्किटे, नानखटाई, पेस्ट्री, पॅटीस, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात, आणि तेच बाजारात विकले जाते, आजच्या काळात चालणारे हे पदार्थ आहेत, आणि असं काही नसतं, की तुम्ही बेकरी हा व्यवसाय टाकला म्हणजे सर्व वस्तू असल्या पाहिजेत, काहींना प्रश्न पडतो, की एवढे बनवायचे तर तुम्ही नुसते केक जरी बनवले तरी ते विकू शकता, पण त्या अगोदर तुम्हाला केक शिकावे लागतील, आणि त्यासोबत तुम्ही म्हणाल आम्हाला तर पाव, बिस्किट, नानखटाई पण ठेवायचे आहे, तर काय करावं, तर तुम्ही बाजारातून तुमच्या बेकरी ठेवण्यासाठी पाव, बिस्किट, नानखटाई, बाहेरून आणून विकू शकता, त्यासोबतच तुम्ही तुमच्या बेकरीत आईस्क्रीम, कुल्फी, पेप्सी, लस्सी, कोल्ड्रिंक्स, पण ठेवू शकता।

बेकरी व्यवसाय कसा सुरू करावा
बेकरी व्यवसाय कसा सुरू करावा

बेकरी व्यवसाय सुरू करायला किती पैसे लागतात

तुम्ही बेकरी हा व्यवसाय कमीत कमी भांडवलात सुरू करू शकतात, यात असे खूप कही पैसे लागतील आणि तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायला खूप मोठी जागा लागेल असे काही ही नहीं आहे। हा व्यवसाय तुम्ही खूप कमी पैसे लावुन करू शकतात आणि हा व्यवसाय तुम्ही तुमचा घरून देखील सुरू करू शकतात।

बेकरी व्यवसायात कोणते कोणते पदार्थ विकले जातात।

  • केक 
  • बिस्किट
  • नानखटाई
  • टोस्ट
  • खारी
  • पाव
  • ब्रेड
  • पेस्ट्री
  • पॅटीस
  •  पेप्सी
  • कुल्फी
  • कोल्ड्रिंक्स
  • आईस्क्रीम

बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या मशिनरी लागतात।

बेकरी व्यवसायासाठी तुम्हाला खुप काही मोठ्या मोठ्या मशनरी घेण्याची गरज नहीं आहे पन काही लहान लहान मशीनरी ह्या तुम्हाला तुमचा गरजे नुसार लागू शकतात त्या पैकी काही मशीनरी ह्या तुम्हाला आम्ही खाली दिल्या आहेत।

  • Bakery own 
  • Ac Counter 4 foot
  • Droping machine
  • Mixchar machine
  • Packaging matching
  • Hot counter 4 foot

बेकरी व्यवसायासाठी लागणारी आवश्यक कागदपञे

मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या स्वतःची बेकरी टाकायची असेल, किंवा चालवायची असेल, मित्रांनो हा प्रश्न प्रत्येकाला  पडतो, की मला तर स्वतःची मोठी बेकरी टाकायची पण माझ्याकडे पैसे नाहीत, तर कशी टाकणार, तर मित्रांनो तुम्ही तुमच्या गावातल्या बँकेत लोन मिळवू शकता, बेकरी टाकण्यासाठी तर ते कसे मिळवणार ते बघणार आहोत, तुम्हाला कोण कोण ते डॉक्युमेंट लागणार, ते मी तुम्हाला सांगते,

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड
  •  मतदान कार्ड
  •  जागेचा उतारा
  •  रेशन कार्ड
  •  बँक पासबुक
  •  आधार उद्योग
  •  सॅाप अॅट 
  •  मशनरी कोटेशन
  •  फ्रुड लायसन 

मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तयार करून तुम्ही स्वतःची बेकरी टाकू शकता,

बेकरी व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल 

मित्रांनो व्यवसाय कुठलाही असो, तो चालू करण्याआधी तुम्हाला कच्चा माल लागतो, तर व्यवसाय चालू करण्याआधी शिकण्याआधी प्रत्येकाला प्रश्न पडतो, की कच्चा माल म्हणजे काय किंवा काय काय लागत असेल, तर आपण आता बघणार आहोत, आपल्याला लागणारा कच्चामाल, मित्रांनो मी तुम्हाला सर्वच शिकवणार आहे, की केक कसा बनवायचा त्याला कुठलं साहित्य लागतं, किंवा कुठलं साहित्य कधी कसं वापरायचं, तर मित्रांनो आपण आता बघत आहोत, की कच्चा माल काय काय लागतो,

  • व्हॅनिला रिमिक्स 
  • चॉकलेट
  • रेड वेलवेट
  • मावा प्रिमिक्स
  • तेल 
  • पाणी 
  • क्रीम

बेकरी व्यवसायासाठी योग्य जागा निवडा  

मित्रांनो आता सर्वांना प्रश्न पडलाच असेल, की बेकरी तर टाकायची पण कुठं आपल्याकडे तर जागा नाहीये, तर काय करायचं आता, तर मित्रांनो आपल्याला आता जागा शोधायची आहे, शोधायची जागा पण ती कुठं शोधायची तर मित्रांनो आता आपण जागा कुठे शोधायची ते बघणार आहोत, आपल्याला जागा अशा ठिकाणी शोधायची आहे, की तिथे आपलं जे गिऱ्हाईक असेल त्यांना यायला काही त्रास नको, बेकरी ही बाजारपेठेत  नाहीतर अशा ठिकाणी पाहिजे की जिथे आजूबाजूला दुकान पाहिजेत जेणेकरून आपली बेकरी मस्त चालेल, 

तुम्ही सुरुवातीला तुमच्या घरातून सुद्धा चालू करू शकता, किंवा जर तुमच्या घराजवळ जागा असेल, तर तुम्ही तिथे सुद्धा चालू करू शकता, मित्रांनो तुम्ही म्हणाल मला तर बेकरीच टाकायची आहे, तर किती जागा लागेल तर तसं काही नसतं तुम्ही कमीत कमी जागेत चालू करू शकता, किंवा जर तुम्हाला कुठे जागा मिळाली तर चांगलंच आहे तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मला मोठी जागा पाहिजे तर किती जागा लागेल, तर मित्रांनो तुम्हाला 400 500 किंवा 600 चौरस फूट जागा पुरेशी असेल, तर मित्रांनो तुम्ही एवढ्या जागेत खूप चांगल्या प्रकारे बेकरी चालू करू शकता,

बेकरी टाकण्यासाठी किती खर्च लागतो

मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडलाच असेल, की बेकरी टाकण्यासाठी किती खर्च येईल, तर आपण आता बघणार आहोत, की बेकरी टाकण्यासाठी खर्च किती येतो, तुम्ही जर म्हणाल मी पहिले केक करून विकते, तर तुम्हाला 30 ते 40 हजार खर्च येईल आणि तुम्हाला जर मोठी बेकरी टाकायची असेल, तर 80 ते 90 हजार लागतील मित्रांनो तुमच्यावर असेल ते तुम्ही जर म्हणाल मला तर सर्वच ठेवायचं किंवा विकायचं तर जास्त पण लागू शकता, किंवा कमी पण तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल, की आपण एवढे पैसे अडकवू तर ते निघतील का? तर आपण ते पुढे बघू किती पैसे निघतील किंवा नफा किती होतो,

बेकरी व्यवसायासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची

मित्रांनो आता बघा बेकरी म्हटली म्हणजे गॅस असतोस, लाईट असतेच, किंवा जर तुम्ही Own  घेतले, तर मित्रांनो तुम्हाला या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, तर मित्रांनो तुम्हाला एवढेच नाही तर खूप गोष्टी असतील अशा त्यांची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, तुम्ही ते कराल तेव्हा तुम्हाला ते आपोआपच कळेल कसली काळजी घ्यायची ते,

बेकरी व्यवसायात चालणारे केक चे नाव 

  1. Doll cake
  2. Black forest cake
  3. Red velvet cake
  4. Car cake
  5. Galaxy cake
  6. Marbal cake
  7. Rasmalai cake
  8. Gel cake
  9. Photo cake
  10. Thread cake
  11. Venila cake

बेकरी व्यवसायात कमाई

आपण आता बघणार आहोत, की बेकरी व्यवसायात किती कमाई होते,  तर मित्रांनो तुम्ही जर चांगल्या जागेत बेकरी चालू केली, तर तुम्ही 30 ते 40 हजार महिना कमवू शकता, कोणी जास्त पण कमवू शकत, किंवा कमी पण ते तुमच्यावर असेल, कोणाला जास्त कमवता येतील, कोणाला कमी आणि तुम्ही जर खूप चांगल्या प्रकारे विक्री चालू केली तर तुम्हाला खूप फायदा असेल, आणि तुम्ही यशस्वी तेव्हाच व्हाल  जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे काम कारणे चालू कराल आणि लोकना चांगल्या प्रकारचे मटेरियल द्याल तेव्हा आपोआप तुमचे गिरहाईक वाढतील आणि तुमची कमाई वाढेल।

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. बेकरी व्यवसाय कसा सुरू करावा ही तुम्हाला समजले असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्याना देखील ह्या व्यवसाय बदल माहिती समजेल. जर तुम्हाला या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

Leave a Comment