आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजना काय आहे । What is Atmanirbhar Horticulture Clean Plant Program in Marathi 2023

नमस्कार मित्रानो, आपल्या सर्वांना माहीतच असेल कि भारत हा कृषिप्रधान देश आहे . त्यात शेतकरी म्हनजे अन्नदाता. आपल्या नैसर्गिक गरजांपैकी सर्वात महत्वाची गरज म्हनजे अन्न . ती आपला शेतकरी पूर्ण करतो . तर नुकतेच सरकारने Budget २०२३ ची घोषणा केली त्यात शेतकरी चा आणि जगाच्या विकास व्हावा म्हणून खूप साऱ्या योजना काढण्यात आल्या त्यात आज आपण आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजना काय आहे हे जाणून घेऊ या . या article मध्ये तुम्हाला आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजना काय आहे । What is Atmanirbhar Horticulture Clean Plant Program in Marathi याची सर्व माहिती मिळून जाईल . तर हा article शेवट पर्यंत वाचा

आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजना

मित्रानो आपल्याला माहितीच आहे कि भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारताचा total GDP (Gross domestic product । स्थूल राष्ट्रीय उत्पादन) पैकी २०. १९% हा agriculture मधून येतो .पण total agriculture चा ३३% हा फक्त फलोत्पादन (Horticulture) मधून येतो .हे फलोत्पादन चे खास वैशिष्ट्य आहे भारतात केवळ १०% जमीन ही फक्त agriculture साठी वापरली जाते. तरी सुद्धा भारताचा total GVA ( Gross Value Added। सकल मूल्य वर्धित ) चा ३३% हा फक्त फलोत्पादन (Horticulture) क्षेत्रातून येतो. फलोत्पादन या क्षेत्रामध्ये खूप रोजगार संधी उपलब्ध आहे. जर सरकारने अजून थोडी फलोत्पादन क्षेत्रामध्ये चालना दिली तर त्यात खूप साऱ्या रोजगार संधी उपलब्ध होऊ शकता. फलोत्पादन पिकांची value वाढवण्यासाठी आणि त्यांचे उत्पादकता वाढवण्यासाठी Government of India ने आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजना (Atmanirbhar Horticulture Clean Plant Program ) घोषित केली आहे.

Atmanirbhar Horticulture Clean Plant Program

आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजनेचे उद्दिष्ट | Objective of Atmanirbhar Horticulture Clean Plant Program in Marathi

जो शेतकरी वर्ग फलोत्पादन क्षेत्रात काम करत असेल त्यांना रोगमुक्त वनस्पती सामग्रीची उपलब्धता करून द्यावी किंवा त्यात वाढ करावी हे आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजनेचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. एखादे पीक लावण्याआधी त्यात काही disease असेल तर येणारे उत्पादन हे हानिकारक असू शकते. त्यामुळे रोगमुक्त वनस्पती सामग्रीची उपलब्धता करून द्यावी हे उद्दिष्ट आहे जेणे करून पुढे चालून कोणतीही बाधा होणार नाही किंवा सर्वत्र हानी पसरणार नाही. अशामुळे फलोत्पादन पिकांची मागणी व किम्मत वाढेल याने सरकार व शेतकरी वर्ग दोघांना फायदा होईल. Government of India ने घोषित केले आहे कि या योजने अंतर्गत फक्त स्वच्छ वनस्पती (clean plants ) याचाच वापर करण्यात यावा. तर चला जाणून घेऊया कि स्वच्छ वनस्पती काय आहे

स्वच्छ वनस्पती काय आहे | What is clean Plants in Marathi

केंद्र सरकारने आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजने अंतर्गत फक्त स्वच्छ वनस्पती (clean plants ) याचाच वापर करण्यात यावा असे सांगितले आहे पण स्वच्छ वनस्पती काय आहे | What is clean Plants in Marathi हे बघूया स्वच्छ वनस्पती म्हणजे लागवड करण्यापूर्वी रोपाची अनेक गोष्टींसाठी चाचणी केली गेली जाते. तर या चाचणी यामध्ये व्हायरस ( Virus ), बॅक्टेरिया ( Bacteria ) किंवा बुरशीसाठी (Fungi ) आहे कि नाही या साठी वनस्पती तपासल्या जातात आणि या सूक्ष्मजीवांचा संसर्ग झालेल्या झाडांची लागवड केली जात नाही. त्याच प्रमाणे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या वनस्पतींना स्वच्छ वनस्पतींच्या श्रेणीत टाकले जाते. ज्याने जास्त फायदा होईल. त्यांपैकी काही उत्पादकता वाढवण्यासाठी नियंत्रित परिस्थितीतही राखली जातील.

स्वच्छ वनस्पती बनवले कसे जातात | How clean plants made in Marathi

स्वच्छ वनसंपत्ती तयार करणे हि एक खूप मोठी प्रक्रिया आहे तर चला step – by – step बघूया कि स्वच्छ वनस्पती बनवले कसे जातात | How clean plants made in Marathi

  • झाडे रोगजनकांसाठी (pathogen ) तपासली जातात. तर Pathogen हे फॉरेन पार्टीकल असते जसे कि मानवाचे शरीरा मध्ये बाहेरून एखादी bacteria आला तर म्हनजे एखादी सूक्ष्मजीवांचा मानवी शरीरात प्रवेश झाला तर बाहेरून तर त्याला आपण pathogen म्हणतो. तर वनस्पतींमध्ये सर्वात पहिले pathogen ची तपासणी केली जाते.
  • तर या pathogen मध्ये सक्रियपणे वाढणारे ओळखले जातात. मग या सक्रियपणे वाढणाऱ्या वनस्पतींमधून ऊतींचे (tissue ) नमुने गोळा केले जातात.
  • त्यानंतर वनस्पतींची उत्पादकता वाढवण्यासाठी या ऊतींचे ( tissue ) इतर वनस्पतींसोबत मिश्रण केले जाते.

अश्या पद्धनतीने स्वच्छ वनस्पती बनवले कसे जातात व ते शेतकरी पर्यंत पोहचवले जातात. अश्या प्रकारे शेतकरी यांचा वापर करतील आणि फलोत्पादनात वाढ होईल.

भारत सरकाने आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजना साठी केलेली आर्थिक मदत |

आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती या योजनेसाठी भारत सरकारने 2,200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

FAQs

आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?

जो शेतकरी वर्ग फलोत्पादन क्षेत्रात काम करत असेल त्यांना रोगमुक्त वनस्पती सामग्रीची उपलब्धता करून द्यावी किंवा त्यात वाढ करावी हे आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजनेचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.

स्वच्छ वनस्पती काय आहे ?

स्वच्छ वनस्पती म्हणजे लागवड करण्यापूर्वी रोपाची अनेक गोष्टींसाठी चाचणी केली गेली जाते. तर या चाचणी यामध्ये व्हायरस (Virus), बॅक्टेरिया ( Bacteria ) किंवा बुरशीसाठी (Fungi ) आहे कि नाही या साठी वनस्पती तपासल्या जातात.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. आत्मनिर्भर फलोत्पादन स्वच्छ वनस्पती योजना काय आहे । What is Atmanirbhar Horticulture Clean Plant Program in Marathi या योजनेची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील. जर तुम्हाला या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

Leave a Comment