मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करावा : खर्च, वेळ, जागा | How To Start Candle Making Business In Marathi 2024

मित्रांनो आपण आजच्या या लेखात मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करावा हे बघणार आहोत. तर मेणबत्ती व्यवसाय हा खूप चालणारा व्यवसाय आहे. मेणबत्ती व्यवसाय कधीही बंद न पडणारा व्यवसाय आहे. मेणबत्ती व्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे. जो नवीन उद्योजक सुरु करणार असेल तर त्याला हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. आणि हि एक अशी वस्तू आहे. जिची मागणी कधीच कमी होत नाही.

पहिले लोक मेणबत्ती चा वापर लाईट नसल्यावर करायचे पण आता टॉर्च चा वापर होतो. पण मेणबत्ती हि पहिल्या पेक्षा आता जास्त विकली जाते. कारण आता मेणबत्ती जर कुणाचा बर्थडे असला तर केक मध्ये लावली जाते किंवा कोणत्याही Event मध्ये मेणबत्ती चा वापर हा खुप प्रमाणात केला जातो.

आता सणाला देखील मेणबत्तीचा वापर होतो, जसे कि दिवाळी, नवरात्री, गणपती उत्सव तसेच धार्मिक कार्य, घराची सजावट, लग्न कार्य, अस्या अनेक कार्या मध्ये मेणबत्तीचा उपयोग होतो. तसेच मेणबत्ती व्यवसाय हा कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे, आताच्या काळात टॉर्च चा देखील वापर वाढला असेल तरी मेणबत्ती चा वापर कमी झाला असं होत नाही आता लोक show म्हणून देखील मेणबत्तीचा वापर करताना दिसतात. तसेच मेणबत्तीची मागणी सणांच्या वेळेस प्रचंड असते.

तसेच मेणबत्ती हा व्यवसाय घरगुती व्यवसाय आहे. ज्या महिला घरात बसून काम शोधताय त्यांच्या साठी मेणबत्ती व्यवसाय हा अगदी सोपा व्यवसाय आहे. या लेखा मध्ये तुम्हाला मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करावा हि संपूर्ण माहिती मिळून जाईल तसेच तुम्ही आम्हचा लेख पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला Menbati Banavanyacha Vyavsay Kasa Suru Karava हे नक्की समजेल.

तसेच मेणाची संपूर्ण जगातील मागणी हि १०,००० दशलक्ष इतकी वाढली असून यातील मेणबत्ती साठी ५०% इतकी वापरण्यात येते.

Table of Contents

मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करावा

मित्रांनो आपण आता बघणार आहोत, मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करावा? तर मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय असा आहे, कि कमी खर्च्यात जास्त नफा मिळवुन देणारा हा एक व्यवसाय तसेच मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा फायदेशीर व्यवसाय आहे. ज्यातून तुम्हाला अनेक फायदे शिकायला मिळतील. तसेच मेणबत्त्याची मागणीही बाजारात प्रचंड वाढलीये. तसेच तुम्ही मेणबत्याचे वेगवेगळे प्रकार देखील बनवून बाजारात विकू शकतात. यामुळे तुम्ही बनवलेल्या मेणबत्ती ची बाजारात खूप मागणी होईल आणि तुम्ही जास्त नफा कमवू शकतात. तसेच तुम्ही कमी खर्च्यात हा व्यवसाय सुरु करू शकतात. मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल याची माहिती जाणून घेऊया.

मेणबत्ती व्यवसाय

मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल

आता आपण बघणार आहोत, मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल तर खालील दिलेल्या तकतेत वस्तू आणि त्याची किंमत तुम्ही पूर्ण वाचू शकतात. अस्या प्रकारे आपल्याला कच्चा माल लागेल. जेणेकरून तुम्हाला लघु उद्योगाची एक छोटीशी कल्पना येऊ शकते. मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल खाली दिला आहे.

अ, क्रकच्चा माल किंमत
1एरंडेल तेल350 रुपये प्रति लिटर
2मेणबत्ती धागा रील50 रुपये प्रति रील
3पॅराफिन मेण130 रुपये प्रति किलो
4मेणबत्ती साचा400 ते 3000 रुपये प्रति नग
5विविध रंग50 ते 100 रुपये प्रति पॅकेट
6सुगन्धसाठी सेंट250 ते 500 रुपये प्रति बाटली
7थर्मामीटर200 रुपये प्रति नग
8ओवन3000 ते 10,000 रुपये
9भांडे300 ते 500 रुपये प्रति नग

मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी कच्चा माल कुठून खरेदी करायचा

मित्रांनो आपण आता बघणार आहोत, कि मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल कुठून घ्यायचा? तर तुम्ही मेणबत्ती साठी लागणारा कच्चा माल हा होलसेल विक्रेत्या कडून घेऊ शकतात. नाहीतर बाजारातून स्थानिक दुकानदारा कडून पण घेऊ शकतात. तुम्हाला जिथे योग्य वाटेल तेथून तुम्ही मेणबत्ती साठी लागणारा कच्चा माल घेऊ शकतात. कच्चा माल घेताना नेहमी गुणवंतेचि काळजी घ्या तुम्ही तुमच्या आजू बाजूच्या परिसरात असे होलसेल विक्रेते किंवा स्थानिक दुकानदार शोधू शकतात.

तसेच मेणबत्या बनवण्यासाठी कच्चा माल पुरवणाऱ्या काही कंपन्यांचे नावे:

  1. वेलंर्बन मेणबत्या प्रा.
  2. पूजा क्राफ्ट आणि एम्ब्रायडरी हि कंपनी मुंबईच्या बोरिवली भागात आहे.

मेणबत्यांचे प्रकार कोणते आहेत

आपण आता बघणार आहोत, कि मेणबत्यांचे प्रकार कोणते आहेत? मित्रांनो जर आपण मेणबत्ती तयार करतोय तर आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. मेणबत्या किती प्रकारच्या असतात. आपल्याला जर माहित नसलं तर आपण मेणबत्या कोणत्या बनवायच्या तसेच मेणबत्यांचे प्रकार हे 9 आहेत. बाकी आम्ही तुम्हाला सांगूच तर मित्रांनो मेणबत्यांचे प्रकार हे ४ प्रकारचे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ह्या ४ प्रकारच्या मेणबत्यांची बाजारात प्रचंड मागणी असते. तर आपण बघू ४ प्रकारच्या कुठल्या मेणबत्या आहेत.

  1. सामान्य मेणबत्या = ह्या मेणबत्या एखाद्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी वापरल्या जातात. तसेच जर कुणाकडे पूजा असली तर पूजेला वापरल्या जातात.
  2. सजावट मेणबत्या = सजावटीच्या मेणबत्या ह्या विवाह सोहळ्यात जास्त प्रमाणात वापरल्या जातात. तसेच दीपावली सारख्या सणाला देखील वापरल्या जातात. तसेच पार्टी इतर प्रकारच्या कार्यक्रमात सजावटीसाठी सजावट मेणबत्या वापरल्या जातात. ह्या मेणबत्याची बाजारात १२ हि महिने जास्त प्रमाणात मागणी असते.
  3. वाढदिवसाच्या मेणबत्या = वाढदिवसाच्या मेणबत्या ह्या तर हररोज वापरल्या जातात. रोज कुणाचा तरी वाढदिवस असतोच. आणि वाढदिवस कुणाचा पण असो लहान मुलाचा असो किंवा वडीलधाऱ्या माणसाचा तो साजरा केला जातो. तर सर्व जण हे मेणबत्यांचा वापर करतात. म्हणून वाढदिवसाच्या मेणबत्या बाजारात रोज विकल्या जातात.
  4. सुगंधी मेणबत्या = सुगंधी मेणबत्या ह्या भारतात खूप लोक प्रिय आहेत. लोक त्यांच्या घरात सुगंधीत वातावरण करण्यासाठी देखील ह्या मेणबत्यांचा वापर करतात. तसेच सुगंधी मेणबत्या यांची देखील बाजारात खूप मागणी वाढलीये.

तर हे मेणबत्ती चे प्रकार तुम्ही नीट वाचून घ्या ह्या ४ प्रकारच्या मेणबत्त्या बाजारात खूप मागणी वर असतात. तुम्ही ह्या ४ प्रकारच्या मेणबत्त्या बनवून याच्यातून खूप पैसे कमवू शकतात.

मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारी जागा

मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारी जागा, पण जर ठरवलं मेणबत्ती व्यवसाय सुरु करायचं तर आपल्याला जागा लागेल, तर आपण आता बघू आपल्याला मेणबत्ती व्यवसायासाठी जागा किती लागेल. तसेच तुम्ही तुमच्या घरातून देखील हा व्यवसाय सुरु करू शकतात. जर तुम्हाला तुमचे घर छोट वाटत असेल. तर तुम्ही जागा घेऊ शकतात. तर तुम्हाला १० x १० किंवा १२ x १२ ची खोली घ्यावी लागेल. ह्या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ठे म्हणजे ह्या व्यवसायाला जास्त जागा लागत नाही. तुम्ही अगदी छोट्या जागेत देखील हा व्यवसाय सुरु करू शकतात.

तसेच तुम्हाला खोली घेताना एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला खोली घेताना किंवा तुमच्या कडे खोली असली. तर तुम्हाला त्या खोली ला एखादी खिडकी आहे. का हे बघावं लागेल. तुम्हाला तुमच्या घेतलेल्या खोली मध्ये मेण वितळायला किती जागा लागेल. हे बघावं लागेल त्याच बरोबर तुम्हाला तुम्ही घेतलेल्या खोली मध्ये कच्चा माल ठेवायला बनवलेल्या मेणबत्या ठेवायला एवढी जागा असणं गरजेचं आहे. त्याच बरोबर तुम्ही ह्या व्यवसायाचा कारखाना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सहज पने हलवू शकतात.

मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारा वेळ

मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारा वेळ तर वेळ हा तुमच्या वर अवलंबून असतो. तुम्ही हाताने बनवताय का मशीन ने त्या नुसार तुम्हाला वेळ लागेल. तसेच जर तुम्ही हाताने बनवत असाल. तर एक माणूस एका दिवसात ९० ते १०० किंवा १५० मेणबत्त्या बनवू शकतो. आणि जर तुम्ही मशीन ने बनवत असाल. तर ऑटोमॅटिक मशीन ने एका मिनटात २०० ते २५० मेणबत्या बनवता येतात. तसेच तुम्ही जर म्युच्युअल मशीन वापरत असाल. तर तुम्ही त्या मशीन द्वारे १८०० ते २००० मेणबत्त्या बनवू शकता. तसेच तुम्ही जर पूर्णतः ऑटोमॅटिक मशीन वापरत असाल. तर तुम्ही एका तासाला ११०० ते १२०० एवढ्या मेणबत्त्या बनवू शकतात.

मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारे आवश्यक मशीन

आपण जर मेणबत्तीचा व्यवसाय सुरु केला, तर आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला मशीन कोण कोणते लागताय ते तर आपण आता बघणार आहोत. आपल्याला मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारे आवश्यक मशीन तर मेणबत्ती व्यवसायासाठी एकूण ३ मशीन आवश्यक आहेत. तर ते कोणकोणते मशीन असतील हे आपण आता बघणार आहोत.

  1. मॅनुअल मशीन = ह्या मशीन द्वारे तुम्ही एका वेळेस १००० पर्यंत मेणबत्त्या बनवू शकतात. तसेच तुम्ही हे मशीन वापरताना तुम्हाला अनेक गोष्टी हाताने कराव्या लागतील.

2. सेमी ऑटोमॅटिक मशीन =मेणबत्ती बनवण्याच्या ह्या मशीन मध्ये तुम्ही मेणबत्ती चा आकार लागोपाठ बदलू शकतात. तुम्हाला जो आकार वाटला तो आकार तुम्ही घेऊ शकतात. तसेच ह्या मशीन मध्ये मेनाला म्हणजे मेणबत्तीला थंड करण्यासाठी कुलेंड म्हणून पाण्याचा वापर केला जातो. तसेच हे मशीन मॅनुअल मशीन पेक्षा जास्त वेगाने काम करते व त्याच बरोबर हे मशीन एका वेळेस ५०० ते ६०० मेणबत्या बनवू शकत.

3. पूर्णतः ऑटोमॅटिक मशीन = पूर्णतः ऑटोमॅटिक अस्या मशीन मध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या मेणबत्या बनवू शकतात. जसे वाढदिवसाच्या पार्टी मध्ये लागणाऱ्या अस्या अनेक प्रकारच्या मेणबत्त्या तुम्ही बनवू शकतात. तुम्हाला ज्या आकाराची मेणबत्ती लागली. त्या आकाराचा साचा तुम्ही मशीन मध्ये टाकून मेणबत्या तयार करू शकतात. हे मशीन एका मिनिटाला ३०० ते ४०० मेणबत्या तयार करत.

मेणबत्ती बनवण्याची प्रक्रिया

मेणबत्ती बनवण्याची प्रक्रिया आपण सर्व बघितले जागा, वेळ, प्रकार, मशनरी, आपण अजून खूप माहिती पाहिली पण आपण आता बघणार आहोत. मेणबत्ती कशी बनवायची. तर मित्रानो आपल्याला जर संपूर्ण माहिती माहिती असेल. आणि जर मेन माहिती म्हणजे मेणबत्ती बनवण्याची प्रक्रिया जर माहित नसली. तर आपल्याला मेणबत्ती कशी बनवता येईल त्याच साठी आपण आता बघणार आहोत. मेणबत्ती बनवण्याची प्रक्रिया तर मित्रांनो मेणबत्ती बनवायच्या वेळेस तापमान सर्व वेळ २९० अंश ते ३८० अंशापर्यंत पाहिजे तसेच तुम्ही तुमच्या जवळ जे मेन असेल त्या मेनाला वितळून तुम्ही तुमच्या जवळ जो साचा किंवा मशीन असेल त्यात टाकून मग मेन थंड झालं कि तुम्ही तयार झालेली मेणबत्ती काढून विक्री साठी ठेऊ शकतात.

मेणबत्ती पॅकेजिंग कशी करावी

मित्रांनो आपण मेणबत्ती पॅकेजिंग कशी करावी हे बघणार आहोत. तर मित्रांनो मेणबत्ती बनवून झाल्या नंतर तिला एका प्लास्टिक मध्ये पॅक करायची अनादर तुम्ही गिफ्ट पेपर मध्ये देखील मेणबत्ती पॅकिंग करू शकतात. मित्रांनो आपल्या मेणबत्तीच्या पॅकिंग वर सर्व अवलंबून असत. कि आपल्या मेणबत्या किती विकल्या जाती. तसेच मेणबत्ती हि तुम्ही हाताने देखील पॅक करू शकतात. नाहीतर मेणबत्ती पॅकेगिंग च हि मशीन असत. तुम्ही तेही घेऊ शकतात.

अन्यथा मशीन ने पॅकिंग केलेल्या मेणबत्या ह्या दिसायला छान दिसतात. आणि स्थानिक दुकानदार असो कि होलसेलर ते आपल्या मेणबत्याची मागणी देखील करतात. त्याच प्रमाणे तुम्ही ज्याच्यात मेणबत्त्या पॅक कराल त्याच्यावर तुम्हाला तुमच्या कंपनी चे नाव पत्ता तुमच्या वेबसाईट चे नाव सर्व माहिती टाकावी लागते. अन्यथा अजून काही माहिती असेल ती तुम्हला समजलं असेल कि मेणबत्ती पॅकिंग कशी करतात.

मेणबत्या बनवण्याच्या व्यवसायाला लागणारा खर्च

तर मित्रांनो आपल्याला जर मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करावा हे जर समजल असेल, आणि मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायाला लागणारा खर्च जर आपल्याला माहित नसला. तर आपण कस काय हा व्यवसाय सुरु करू शकतो. तर आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ह्या व्यवसायाला खर्च किती येतो. जर तुम्हाला जास्त गुंतवणूक न करता मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरु करायचा असेल. तर तुम्ही १०,००० ते ५०,००० रुपये गुंतवणूक करून मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता.

तसेच जर तुम्हाला एखादी मशीन घेऊन हा व्यवसाय सुरु करायचा असेल. तर तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागते. तर किती गुंतवणूक करावी लागते. ते बघू तर तुम्हाला मशीन घ्यायचे असतील. तर १,००,००० ते ८,००,००० एवढा खर्च लागेल. तुम्हाला ह्या रुपया मध्ये कच्चा माल मशनरी ह्या सर्व वस्तू घेता येतील. त्याच बरोबर तुम्हाला अजून काही वस्तू ह्या पैस्यान मध्ये घेता येतील. तुम्हाला अजून काही वस्तू आवश्यक वाटल्या तर त्या हि तुम्हाला घ्यावा लागतील.

याशिवाय तुम्हाला जागा घ्यावी लागेल. तसेच काहींना १,००,००० ते ८,००,००० कमी होतील. काहींना १०,००,००० पर्यंत देखील खर्च येऊ शकतो. आणि तसे पाहायला गेले तर बाकीच्यांच्या कामावर देखील त्यांना खर्च येऊ शकतो. तुम्हच काम कस ये यावर तुम्हचा खर्च ठरेल बाकीच्यांना कमी लागू शकतो. बाकीच्यांना जास्त देखील लागू शकतो. तर आता तुम्हाला समजल असेल, कि मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायाला लागणार खर्च.

मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायातील नफा

आपण आता बघणार आहोत, मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायातील नफा तर मित्रांनो हा प्रश्न सर्वानांच पडतो. आपण जर हा व्यवसाय सुरु केला. तर आपल्याला किती नफा निघेल. तर ह्या व्यवसायात तुमच्या बनवलेल्या मेणबत्या कश्या असतील. याच्यावर तुम्हचा नफा समजेल. हा व्यवसाय असा आहे. जर तुमच्या बनवलेल्या मेणबत्त्यांची पॅकिंग चांगली असेल. तुम्ही बनवलेला माल चांगला असेल. तर तुम्ही महिन्याला ५०,००० ते १,००,००० येवढा नफा मिळवू शकतात.

तसेच तुम्ही जर तुमच्या कंपनीच्या वेबसाईट चे नाव आणि संपूर्ण माहिती तुम्ही केलेल्या पॅकिंग वर जर टाकली असेल. तर तुमच्या माल ची मार्केटिंग जास्त होईल. तसेच तुम्ही स्थानिक दुकानदार, होलसेलर दुकानदार, यांच्या कडे जाऊन तुम्ही जर माल विक्री केला, तर तुमच्या माल ची सेलिंग जास्त होईल. तसेच तुम्ही बनवलेल्या मेणबत्त्या मार्केट मध्ये वेगाने चालतील. आणि तुम्हचा नफा देखील वाढेल. तुम्ही जर चांगल्या प्रकारे मेणबत्या बनवुन सेल केल्या तर तुम्ही महिन्याला १,००,००० ते २,००,००० रुपये कमवू शकतात.

वैयक्तिक कागदपत्रे

मित्रांनो तुम्ही जर मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. तर तुम्हाला काही वैयक्तिक कागदपत्रे लागतील. ते कागदपत्रे तर सर्वान कडे असतात. पण जर बाकीच्या न कडे नसतील. तर तुम्ही काढून घ्या, कारण व्यवसाय म्हटला कि कागदपत्रे लागतात. तर आपण आता बघू कोणते कोणते कागदपत्रे आपल्याला लागतील.

  • ओळखपत्र– आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड.
  • पत्त्याचा पुरावा– रेशनकार्ड, लाईट बिल.
  • पासबुकसह बँक खाते.
  • फोटो, ईमेल आयडी, फोन नंबर.

हे सर्व कागदपत्रे आपल्या जवळ असण खूप गरजेचं आहे.

मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी

मित्रांनो आपण आता पर्यंत ह्या लेखात संपूर्ण माहिती बघितली. अजून खूप माहिती बघितली. तर आपण आता बघणार आहोत, मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी. मित्रांनो आपण जर मार्केटिंग नाही केली. तर आपण सुरु केलेला व्यवसाय कसा चालेल. तर मित्रानो आपल्याला मार्केटिंग करन खूप गरजेचं आहे. आपण जर एखादा व्यवसाय सुरु केला. तर आपण त्याची माहिती हि लोकांपर्यंत पोहचवतो. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवू शकतात. आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाची अनेक प्रकारे मार्केटिंग करू शकतात. तुम्ही जेवढी तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग जास्त कराल. तेवढा फायदा तुम्हाला तुमच्या व्यवसायात दिसेल आणि तुम्हाला नफा देखील तेवढाच जास्त होईल.

मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी मिळणारे लोण

जर आपल्याला मेणबत्ती व्यवसाय सुरु करायचाय आणि आपल्या कडे पैसे नाही. तर कुठून आणायचे हा प्रश्न सर्वाना पडतो. तर मित्रांनो तुमच्या गावात जी बँक असेल. तुम्ही त्या बँकेतून लोण मिळवू शकतात. आपल्याला व्यवसाय करण्यासाठी सरकारी लोन मिळते. तुम्ही तुमच्या इथल्या बँकेत जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकतात. आणि मग तुम्ही पुढची प्रोसेस करू शकतात. तुम्हाला एक कोटेशन तयार करावं लागत ज्यात तुम्हाला मशनरी चे नाव किंमत टाकून ते कोटेशन बनवून बँकेत द्यावे लागते.

तसेच तुम्ही हे सर्व करून मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी लोन प्राप्त करू शकतात. तुम्ही बँकेत जो अर्ज टाकला असेल. तो मंजूर झाल्या नंतर तुम्हाला मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायासाठी पैसे मिळून जातील. आणि तुम्ही मग मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसाय सुरु करू शकतात.

FAQ’s

मेणबत्ती व्यवसाय सुरू करणे कठीण आहे का?

मेणबत्तीचा व्यवसाय सुरू करणे खूप काम आहे, परंतु ते खूप फायदेशीर देखील असू शकते. 

सुगंधित मेणबत्त्या बनवणे फायदेशीर आहे का?

कमी प्रवेश खर्चामुळे मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय एक आकर्षक पर्याय बनतो.

मेणबत्तीची वात कशी बनवायची?

मेणबत्तीसाठी तात्पुरती वात बहुतेक घरांमध्ये सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीचा वापर करून बनविली जाऊ शकते. कॉटन स्ट्रिंग किंवा सुतळीचा तुकडा वापरणे ही एक सामान्य पद्धत आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करावा आणि मेणबत्यांचे प्रकार कोणते आहेत. याची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. हा लेख आपल्या त्या मित्राला शेयर करा आणि article आवडले तर खाली comment मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करावा. या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment