मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारताची scientific research करणारी संस्था असून तिने आतापर्यंत मंगल यान तसेच चंद्रयान 1, चंद्रयान 2 असे अजून भरपूर मोहीम उत्तम रित्या पार पाडल्या आहेत. चंद्रयान 1 ची मोहीम यशस्वी ठरल्यानंतर चंद्रयान 2 ची मोहीम भारताने काढली. परंतु शेवटच्या क्षणी झालेल्या तांत्रिक बिघाड मुळे rover क्रॅश झाल्या कारणामुळे चंद्रयान 2 ची मोहीम अयशस्वी ठरली. त्यामुळे ISRO ने चंद्रयान 3 मिशन ची मोहीम यशस्वी ठरली आणि उत्तमरीत्या पार पडली. चला तर बघुया चंद्रयान 3 मिशन संपूर्ण माहिती | Chandrayan 3 Full Information in Marathi
चंद्रयान 3 मिशन काय आहे | Chandrayan 3 Full Information in Marathi
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ने चंद्रयान 3 मिशन ची मोहीम यशस्वी पार पाडली या आधी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ने चंद्रयान १ आणि चंद्रयान २ ह्या चंद्रावर जाण्याच्या २ मोहीम केल्यात, त्यात चंद्रयान २ हि मोहीम काहीही तांत्रिक बिघाड आल्यामुळे हि मोहीम अयशस्वी ठरली. चंद्रयान 3 मिशन यात हे यान चंद्राच्या दक्षिण द्रवावर ( South Pole ) soft landing केली. जगाच्या इतिहासात या टोकापर्यंत आतापर्यंत कोणीही जाऊ शकले नाही ते भारताने करून दाखवले त्यामुळे हे भारतीयांसाठी खूप कौतुकास्पद आहे. याने भारताला जगासमोर आपकी नवीन technology दाखवायला मिळालेली आहे. चंद्रयान-3 चे प्रक्षेपण हे १४ जुलै २०२३ ला दुपारी २:३५ वाजता झाले. लँडर ( landar ) आणि रोव्हर ( rover ) २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवा जवळ उतरले. भारत हा दक्षिण ध्रुवा जवळ land करणारा पहिला आणि चंद्रावर यशस्वीपणे उतरणारा चौथा देश बनला.
चंद्रयान 3 मिशनचे मुख्य उद्दीष्टे | Objectives of Chandrayan 3 in Marathi
- चंद्राच्या पृष्ठभागावर landar हे सुरक्षितपणे उतरवणे.
- चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण करणे आणि प्रात्यक्षिक बघणे
- चंद्राची रचना हि अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्याचा सराव करण्यासाठी चंद्रयान ३ खूप महत्वाचे मिशन आहे
- चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या chemical आणि natural घटक तसेच माती, पाणी यांवर scientific research करणे.
चंद्रयान 3 मिशन Key Highlights
Chandrayan 3 Mission key Highlights | |
मिशन प्रकार | चंद्र लँडर, रोव्हर, प्रोपल्शन मॉड्यूल |
ऑपरेटर | Indian Space Research Organisation (ISRO) |
Website | www.isro.gov.in |
मिशन कालावधी | 14 दिवस |
Payload वस्तुमान | प्रोपल्शन मॉड्यूल 2148 किलो, लँडर मॉड्यूल (विक्रम) 1752 किलो रोव्हरसह 26 किलो एकूण 3900 किलो |
Power | प्रोपल्शन मॉड्यूल: 758W लँडर: 738W, बायस रोव्हरसह WS: 50W |
Launch Date | १४ जुलै २०२३ ला दुपारी २:३५ वाजता |
Roket | LVM3 M4 |
Launch site | सतीश धवन अंतराळ केंद्र |
Landing Date | २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०४ वाजता |
LVM 3 काय आहे | What is LVM 3 in Marathi
LVM 3 हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे खूप महत्त्वपूर्ण अशे प्रक्षेपण यान आहे. LVM ची उंची 43.50 मीटर उंच इतकी आहे. तसेच LVM याचे वजन 640 टन आहे.LVM मध्ये 8 ते 9 हजार किलोग्रॅम वजन पेलण्याची क्षमता देखील आहे. भारता मधील सर्वाधिक वजन असणारे प्रक्षेपण यान हे LVM म्हणूनओळखले जाते.LVM 3 हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अतिशय महत्त्वाचे प्रक्षेपण यान आहे. चंद्रयान 3 ह्या यानात रोव्हर , लेंडर आणि प्रॉपलशन मोड्युल असल्यामुळे ते स्वतः अंतराळात प्रवेश करू शकत नाही. LVM 3 जोडण्याचे महत्वाचे कारण असे की , LVM 3 मध्ये पुढे ढकलण्याची क्षमता असते. ज्यामुळे पृथ्वीचा gravitational force हा कमी होऊन उपग्रहासारख्या जड वस्तूंना अवकाशात घेऊन जाण्यासाठी लागणारी अत्यावश्यक ऊर्जा हि LVM 3 तयार करते त्यामुळे LVM 3 हे प्रक्षेपण यान या चंद्रयान 3 मध्ये महत्त्वाचे काम करते.
चंद्रयान 3 मिशन साठी लागणारा खर्च | Total Budget of Chandrayan 3 Mission in Marathi
२०१९ डिसेंबर मध्ये, ISRO ने चंद्रयान 3 या प्रकल्पासाठी ७५ कोटी एवढ्या प्रारंभिक निधीची विनंती केली होती. त्यापैकी ₹६० कोटी मशीनरी , उपकरणे आणि इतर खर्चासाठी होती, ₹१५ कोटी हे महसुली खर्च शीर्षकाखाली होते. चंद्रयान 3 साठी लागणारा खर्च 615 कोटी रुपये आहे. पाहिलं तर इतर देशांपेक्षा खूप कमी budget मानले जात आहे. यावेळेस ISRO ने कमी budget मध्ये खूप मोठी कामगिरी बजावली आहे
चंद्रयान मिशन Launch Dates
Chandrayan 1 mission Launch Date | 22 ऑक्टोबर 2008 |
Chandrayan 2 mission Launch Date | 22 जुलै 2019 |
Chandrayan 3 mission Launch Date | 14 जुलै 2023 |
FAQs
चंद्रयान 3 मिशनचे उद्दीष्टे काय आहे?
चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या chemical आणि natural घटक तसेच माती, पाणी यांवर scientific research करणे.
LVM 3 काय आहे?
LVM 3 हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे खूप महत्त्वपूर्ण अशे प्रक्षेपण यान आहे. LVM ची उंची 43.50 मीटर उंच इतकी आहे. तसेच LVM याचे वजन 640 टन आहे.LVM मध्ये 8 ते 9 हजार किलोग्रॅम वजन पेलण्याची क्षमता देखील आहे. भारता मधील सर्वाधिक वजन असणारे प्रक्षेपण यान हे LVM म्हणूनओळखले जाते.
चंद्रयान ३ मिशन साठी टोटल किती खर्च लागला?
चंद्रयान ३ मिशन साठी टोटल 615 कोटी रुपये खर्च लागला.
निष्कर्ष
मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल.चंद्रयान 3 मिशन याची माहिती समजली असेल. या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.
जर तुम्हाला चंद्रयान 3 मिशन संपूर्ण माहिती | Chandrayan 3 Full Information in Marathi या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.