चॉकलेट व्यवसाय कसा सुरु करावा 2023

आपण आता बघणार आहोत कि  चॉकलेट व्यवसाय कसा  सुरु करावा तर तुम्हाला पहिले हा प्रश्ना पडला असेल कि चॉकलेट व्यवसाय जर केला तर तो चालतो का तर मित्रानो चॉकलेट हा एक असा खाद्यपदार्थ आहे कि पहिले  खूप कमी खायचे तर आता ती खूप खाल्ली जाते  आणि तुम्ही म्हणालच आम्ही चॉकलेट व्यवसाय करू शकतो का तर नक्कीच  तुम्ही चॉकलेट व्यायसाय हा घरी बसून करू शकतात.  बाकी काही महिला अस्या पण असता कि त्या  फक्त  घरा साठी चॉकलेट बनवतात.

पहीले चॉकलेट हि कोचीत लोक खायचे तर आता तस नाही आहे आता चॉकलेट हा एक असा पदार्थ झाला कि चॉकलेट लहान मुलानं पासून तर मोठ्यानं पर्यंत सर्व जण खूप आवडून आवडून खातात. आणि बाकी महिला असं हि म्हणतात  मी तर दुसरा व्यवसाय करते तर मग चॉकलेट व्यवसाय कस करू  आणि मला तर चॉकलेट बनवता येते तर तुम्ही दोघे व्यवसाय करू शकतात ते कस तर तुम्ही जी चॉकलेट तुमच्या घरी खाण्यसाठी बनवतात तीच चॉकलेट तुम्हाला बनवून विकायची आहे आणि जर तुम्हाला खरंच चॉकलेट व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही हि माहिती पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल कि चॉकलेट व्यवसाय कसा सुरु करावा.

Table of Contents

चॉकलेट व्यवसाय कसा सुरु करावा

आजच्या काळात चॉकलेट ही खूप खाल्ले जाणारी व विकली जाणारी वस्तू किंवा पदार्थ असू शकते त्यामुळे ही खूप चांगली वेळ असू शकते चॉकलेट व्यवसाय सुरू करण्याची याचा वापर करून आपण येत्या काळात खूप चांगला व्यवसाय करू शकतो. कारण आधीच्या काळात चॉकलेटही खूप कमी प्रमाणात खाल्ली जायची याचे कारण असे की आधीच्या काळामध्ये चॉकलेटी खूप महाग मिळत असे आणि त्यावेळेस चॉकलेट तयार करणारी कंपनी देखील क्वचित होत्या पण आत्ताच्या काळात पूर्ण परिस्थिती ही चेंज झाली आहे त्यामुळे मार्केटमध्ये खूप साऱ्या चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीत उपलब्ध आहेत आणि ही सर्व परिस्थिती बघता चॉकलेट ची किंमत देखील खूप कमी झाली त्यामुळे कमी किंमत असल्यामुळे चॉकलेट खाणे हे सर्वांना सोयीचे झाले आहे

चॉकलेट हा एक असा पदार्थ आहे जो की सर्वच लोक आवडीने तर खातातच पण जर समजा कोणाला काही गिफ्ट द्यायचे असेल किंवा कोणाला काही भेटवस्तू द्यायचे असेल तर त्यावेळेस देखील लोक चॉकलेट देणे सोयीचे समजतात त्यामुळे चॉकलेट ही खूप वेगवेगळ्या प्रकारात वापरली जाते त्यामुळे हा आपल्यासाठी एक खूप चांगला काळ आहे चॉकलेट व्यवसाय सुरू करण्याचा तर मग वेळ न वाया घालवता आपण जाणून घेऊयात चॉकलेट व्यवसाय कसा सुरू करावा.

जर आपल्याला चॉकलेट व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी या अगोदर समजून घ्यावे लागतील. कोणताही व्यवसाय चालू करण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी या माहीत असणे गरजेचे आहे जसे की चॉकलेट व्यवसायासाठी लागणारी जागा, चॉकलेट व्यवसायासाठी लागणारा खर्च हा व्यवसाय कोण करू शकते कोण नाही करू शकत त्याचबरोबर चॉकलेट व्यवसायात आपल्याला किती गुंतवणूक करणे गरजेचे आहे याच्यासाठी आपण जो काही मटेरियल असेल तो कुठून आणू शकतो चॉकलेट बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या मशनरी ची गरज असू शकते त्याचबरोबर चॉकलेट व्यवसाय करण्यासाठी आपल्याला काही प्रोसेस करावी लागेल का काही कागदपत्रे लागतील का त्याचबरोबर चॉकलेट व्यवसाय कसा सुरु करावा चॉकलेट बनवायची कशी याचे प्रशिक्षण आपण कुठून घेऊ शकतो त्यानंतर चॉकलेट मार्केटमध्ये विकायची कशी त्यानंतर हा व्यवसाय करत असताना आपल्याला किती नफा होईल किती नुकसान होईल या सर्व गोष्टी आपण या आपल्या आर्टिकलमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्ही खरंच चॉकलेट व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असाल व येत्या काळात चॉकलेट व्यवसाय करून पैसे कमवण्यात तुम्हाला आवड असेल तर तुम्ही हा आजचा लेख नक्कीच वाचा व चॉकलेट व्यवसाय सुरू करा

चॉकलेट व्यवसाया साठी लागणारी जागा

सर्वात अगोदर जर आपण कुठलाही व्यवसाय  करत असलो तर आपल्याला जागेचा प्रश्न पडतो कि आपण कुठल्या जागेवर व्यवसाय सुरु  करावा  तर मित्रानो आपण आता बघू  चॉकलेट व्यवसाय साठी जागा तर तुम्हाला अस्या ठिकाणी जागा घ्यायची आहे कि तुम्हाला तिथं व्यवसाय करता आलं पाहिजे आणि सर्वात मह्त्वाच म्हणजे तुम्ही हा व्यवसाय घरून पण चालू करू शकतात

जर तुम्ही  पहिलेच हा व्यवसाय करत असाल आणि तुम्हाला ह्या व्यवसाय साठी जागा घ्यायची असेल तर तुम्ही अस्या ठिकाणी जागा घ्या जी तुम्हाला तुम्हाच्या व्यवसाया साठी योग्य असेल आणि तुम्ही जी जागा घेतली असेल ती जागा अस्या ठिकाणी पाहिजे जेथे तुमच्या दुकानावर येणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही आणि त्या जागेवर तुम्हचाही चॉकलेट व्यवसाय नीट चालेल जसे कि बाजार पेट तिथं तुम्हचा चॉकलेट व्यवसाय मस्त चालेल तर मित्रांनो तुम्हचा चॉकलेट व्यवसाय ज्या ठिकाणी योग्य चालेल तिकडे तुम्ही जागा घेऊ शकतात आणि परत एकदा सांगते कि तुम्ही हा व्यवसाय घरून पण सुरु करू शकतात।

तुम्हाला मोठी जागा तेव्हाच लागेल जेव्हा तुम्हच काम मोठं होईल तुमच्या हाताखाली कामगार असतील मोठे मोठे मशीन असतील तर मित्रानो  तुम्हाला किमान 10 X 10 किंवा 10 X 12 फूट जागा लागेल.

चॉकलेट व्यवसाय साठी लागणार खर्च

मित्रानो आपण आता बघणार आहोत कि आपल्याला चॉकलेट व्यवसाय साठी किती खर्च येऊ शकतो तर ते तुम्हाच्या व्यवसाय वर अवलंबून असेल जर तुम्ही छोटा व्यवसाय चालू केला तर तुम्हला कमी खर्च लागेल आणि जर तुम्ही  मोठा व्यवसाय चालू केला तर तुम्हाला जास्त पण खर्च लागू शकतो. तर तुम्ही म्हणाल तरी पण किती खर्च लागेल  तर मित्रानो ते तुम्हाच्या वर असेल कि तुम्हाला किती खर्च येऊ शकतो ते तुम्ही जसा तुम्हचा व्यवसाय चालू कराल छोटा किंवा मोठा त्याच्यावर तुम्हाला खर्च लागू शकतो बाकी जण असे पण असता कि त्यांच्या कडे पहिलेच काही सामान असत बाकीच्यान कडे ते पण नसत तुम्ही तुम्हचा खर्च तुमच्या व्यवसायावर ठरवू शकतात आणि ते तुम्हच्यावर अवलंम्बुन असत जर तुम्ही घरगुती व्यवसाय केला तर तुम्हाला २५.००० ते ३०.००० लागू शकतात आणि जर तुम्ही मोठा व्यवसाय चालू केला  तर तुम्हाला मशनरी ५०,००० ते १,००,००० लागू शकतात आणि तुम्हाला तुम्हचा बाकी खर्च धरून १,50,000 लागू शकतात तर मित्रानो तुम्हाला एवढा खर्च लागू शकतो।

चॉकलेट व्यवसाय कोण करू शकत

तर कोण करू शकत हा व्यवसाय असं प्रत्यकाला वाटत असेल तुम्ही तर चॉकलेट  व्यवसाय हा सर्व जण करू शकतात  चॉकलेट व्यवसाय हा एक सोपा व्यवसाय आहे तर असं म्हणायचंच नाही कि आम्ही हा व्यवसाय करू का  आमच्या कडून होईल कि नाही  चॉकलेट व्यवसाय हा श्री  असो किंवा पुरुष नाहीतर   किशोरवयीन मुली सर्व जण करू शकतात जर कोणी  शिक्षण करत  असेल तर  शिक्षण करता करता पण चॉकलेट व्यवसाय करू शकतात कारण ह्या व्यवसाय तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळात करू शकतात.

चॉकलेट व्यवसायात गुंतवणूक

तुम्ही  चॉकलेट व्यवसायात जेवढी जास्त गुंतवणूक कराल तेवढा जास्त फायदा तुम्हाला होईल तुम्ही जेवढी जास्त गुंतवणूक कराल तेवढा तुम्हचा व्यवसाय वाढेल आणि तो फायदा तुम्हालाच  होईल कारण तुम्ही जेवढी  गुंतवणूक जास्त केलेली राहील तेवढे प्रोडक्ट तुम्हचे वाढतील आणि प्रोडक्ट वाढले कि तुम्हाला फायदा होईलच

तुम्ही चॉकलेट चा व्यवसाय दोन प्रकारे चालू करू शकतात ते तुम्हच्यावर अवलंबून असेल जर तुम्हचा बजेट कमी असेल तर तुम्ही खालच्या पातळीच्या चॉकलेट बनवू शकतात आणि त्या सेल करू शकतात तुम्हाला सुरुवात किमान २०.००० ते ३०.००० पर्यंत करावी लागेल  मग हळू हळू तुम्ही तुम्हचा व्यवसाय वाढवू शकतात आणि मग सर्व प्रकारचे चॉकलेट तुम्ही बनवू शकतात  मग तुम्ही रुपये पासून ची चॉकलेट ते २०० रुपये पर्यंत चॉकलेट बनवून  विकू शकतात

तुमच्या कडे जर हा व्यवसाय वाढविण्यासाठी बजेट कमी असेल तर तुम्ही लोण घेऊन व्यवसाय  वाढवू शकतात तुम्हाला जर काही आयडिया असेल लोण ची तर लोण काढू शकतात आणि  जर आयडिया नसेल तर आम्ही सांगणारच आहोत तर तुम्ही ते वाचून तुम्हचे तसे डॉकॉमेन्ट रेडी करून लोण मिळवू शकतात

चॉकलेट बनवण्यासाठी कच्चा माल

तर तुम्ही विचार करत असाल कि चॉकलेट व्यवसाय तर करायचा पण आम्हाला माहित नाही कि त्या साठी आम्हाला काय काय मटेरियल लागेल तर आपण आता बघणार आहोत कि चॉकलेट व्यवसाय साठी लागणार कच्चा माल

  •  चॉकलेट कंपाऊंड – हा एक पदार्थ आहे हा तुम्हाला चॉकलेट व्यवसायात कामात येणार अतिशय महत्वाचा पदार्थ आहे  चॉकलेट कंपाऊंड हे कोको पावडर आणि साखर पासून बनवलं जात आणि तुम्हाला हे  कंपाऊंड बाजारात कुठल्याही दुकानात सहज पणे मिळू शकत
  •  इसेंस – तर इसेंस हे दोन प्रकारचे असता पाहिलं म्हणजे त्याचा नुसता सुगंध येतो आणि दुसरं जर तुम्ही ते चॉकलेट मध्ये टाकलं तर  त्याची चव सुद्धा येते मग ते तुम्ह्च्य वर डिपेंड करत कि तुम्हाला कुठलं वापरायचं ते
  • कलर – तर कलर तुम्हाला लागेलच कारण तुम्ही चॉकलेट बनवलं मग ती कलर मध्ये  कशी होईल त्या साठी तुम्हाला कलर लागेल मग कलर तुम्हाला कुठला युज करायचा ते तुम्ही बघा तुम्हाला कलर बाजारात मिळून जातील आणि कलर मध्ये पण प्रकार असता तर तुम्हाला जेल कलर वापरायचे आहे कारण तुम्हाच्या चॉकलेट ला कलर खूप छान येईल जेल कलर मध्ये १२ कलर असता मग तुम्ही कुठलाही वापरू शकतात 
  • चोको चिप्स – तर  चोको  चिप्स तुम्हाला चॉकलेट मध्ये टाकायला लागेल तुम्ही चोको चिप्स पासून पण चॉकलेट  बनवू शकतात आणि तुम्ही चोको चिप्स घरी पण बनवू शकतात नाहीतर बाजारातून पण आणू शकतात चोको चिप्स हे चॉकलेट कंपाऊंड पासून बनवलं जात
  •  रॅपिंग पेपर – चॉकलेट पूर्ण झाल्यावर तुम्हाला रॅपिंग पेपर लागतो करणं तुम्ही चॉकलेट बनवली मग ती कंसात  पॅक करून सेल कराल त्या साठी तुम्हाला रॅपिंग पेपर लागेल 
  • चॉकलेट मोल्ड – तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनच्या  चॉकलेट बनवायचाये  मग कास्यात बनवाल तर चॉकलेट मोल्ड मिळत तुम्ही  ते चॉकलेट मोल्ड घेऊन त्याच्यात चॉकलेट तयार करू शकतात
  • नट्स – याचा वापर चॉकलेट ला चविस्ट होण्यासाठी केला जातो तर तुम्ही पण नट्स चा वापर करून तुमची चॉकलेट चविस्ट बनवू शकतात 
  • स्पॅचूला – हे एक लांब असलेला  चमचा आहे जो तुम्हाला चॉकलेट बनवताना कामात येतो
  • ट्रे शिट –  हे तुम्हची चॉकलेट फ्रिज मध्ये ठेवण्या अगोदर यांच्यात ठेवली जाते जेणेकरून तुमच्या चॉकलेट ला छान असा आकार येईल म्हणून ह्या  ट्रे शिट चा वापर केला जातो
  • ट्रान्सफर शिट – हि एक अशी शीट  आहे कि इचा वापर चॉकलेट सवण्या साठी केला  जातो

तर अस्या प्रकारे तुम्हाला चॉकलेट व्यवसाय साठी लागणारा  कच्चा माल  तर तुम्हाला हा संपूर्ण माल बाजारात मिळून जाईल तर तो तुम्ही घ्या आणि चाकलेट  व्यवसाय अतिशय सुंदर याच्याने स्टार्ट करा

चॉकलेट व्यवसाय साठी लागणारे मशीन

तर आपण आता बघू कि चॉकलेट बनव्यासाठी कुठले कुठले मशीन आपल्याला लागतील असं नाही कि तुम्हला घ्यावेच लागतील तुम्हाला जर नसतील घ्यायचे तर तुम्ही तसा सुद्धा व्यवसाय  करू शकतात

 मेल्टर – ह्या मशीन चा वापर चॉकलेट मेल्ट होण्या साठी केला जातो जर तुमच्या कडे हे मशीन नसेल तर तुम्ही तुमच्या घरच्या गॅस वर पण चॉकलेट मेल्ट करू शकतात

मिक्सिन्ग –  ह्या मशीन ने तुम्ही तुम्हची चॉकलेट मिक्स करू शकतात आणि जर तुम्हाला चॉकलेट मध्ये काही टाकायचं असेल तर तुम्ही ह्या मशीन ने मिक्स करून टाकू शकतात

रेफ्रिजर – तुम्ही तुम्हची चॉकलेट ह्या फ्रिज मध्ये ठेऊन सेट करू शकतात आणि जर तुमच्या कडे पहिलेच तुम्हच  घरच फ्रिज असेल तर तुम्ही त्याचा पण वापर  करू शकतात 

तुम्ही म्हणाल मशीन तर खूप असतात तर तस नाही तुम्हाला जास्त गरज ह्या तीन मशीन चीच  आहे तर तुम्ही ह्या तीन मशीन ग्या आणि तुम्हचा व्यवसाय सुरू करा तुम्हाला  चॉकलेट व्यवसायात जास्त ह्या मशीन चि  गरज आहे 

 चॉकलेट व्यवसाय साठी लागणारे कागदपत्रे 

तर मित्रानो तुम्हाला तुमच्या गावात चॉकलेट व्यवसाय कसा सुरु  करावा  हा  प्रश्न तुम्हाला सर्वाना पडलाच असेल ना कारण तुम्हाला व्यवसाय सुरु करायचाय पण तुमच्या कडे पैसे नाही तर आपण आता बघू तुम्हाला कुठले कागदपत्रे लागतील चॉकलेट व्यवसाय साठी आणि तुम्ही त्या कागदपत्रे वर लोण कस मिळवू शकतात आपण आता ते बघणार आहोत

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • मतदान  कार्ड 
  • जागेचा उतारा 
  • रेशन कार्ड  
  • बँक पासबुक
  • आधार उद्यम 
  • सोपं अक्ट 
  • मशीनरी कोटेशन 
  • फ्रुड लायसन

तर मित्रानो तुम्ही हे सर्व कागदपत्रे जमा करून स्वतःचा चॉकलेट व्यवसाय सुरु करू शकतात  आणि तुमच्या गावातल्या  बँकेत लोण मिळवू शकतात

चॉकलेट व्यवसायाचे  प्रशिक्षण

या व्यवसायात तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या  प्रशिक्षण संस्थेत जाण्याची गरज नाही किंव्हा कुठलाही क्लास लावण्याची गरज नाही कारण तुम्ही मोबाईल द्वारे चॉकलेट कशी बनवता हे  घरी बसून  शिकू शकतात तेही फ्री मध्ये  तुम्ही तुमच्या  मोबाईल वरून गूगल च्या माध्यमातून चॉकलेट कशी बनवतात ही  संपुर्ण  माहिती विडिओ किव्हा लेख द्वारे वाचू शकतात किव्हा बघू शकतात आणि जर तुम्हाला विडिओ पाहून किव्हा लेख वाचून बेसिक गोष्टी समजल्या तर तुम्ही तुमच्या नवं नवीन कल्पनांनी चॉकलेट बनवू शकतात.

मित्रांनो तुम्ही कितीही विडिओ पाहून किव्हा लेख वाचून चॉकलेट बनवायला शिकलात तरी तुम्हाला शिकता येणार  नाही कारण जेव्हा तुम्ही स्वतः चॉकलेट बनवायचा प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही नीट चॉकलेट बनवू शकतात.

तुम्ही चॉकलेट बनवायला शिकलात कि मग तुम्ही तुम्हची बनवलेली चॉकलेट तुमच्या घरी आणि आजू बाजू च्या लोकांना खायला द्या आणि तुम्ही पण खाऊन बघा  म्हणजे तुम्हाला कळेल कि तुम्हची चॉकलेट कशी झाली ये तिची टेस्ट चांगली आहे कि नहीं आणि   तुम्हची चॉकलेट छान झाली असेल तर तुम्हाला ती बनवून विकायला काही अडचण नाही मग तुम्ही तुम्हची बनवलेली चॉकलेट नीट पॅकिंग करून बाजारात सेल करू शकतात.

र मित्रानो तुम्हाला फक्त एकच गोस्ट लक्ष्यात ठेवायचीये तुम्ही बनवलेली चॉकलेट हि चवीला छान असली पाहिजे आणि दिसायला पण छान दिसली पाहिजे जेणे करून तुम्हची चॉकलेट पाहूनच समोरच्या व्यक्तीला आवडायला पाहिजे आणि ती तुमच्या कडून लगेच घेतली पाहिजे तर अस्या प्रकारे तुम्ही चॉकलेट बनवायला शिकू शकतात मग तुम्हाला  चॉकलेट व्यवसाय कसा सुरु करावा हे पण कळेल आणि तुम्ही तुम्हचा व्यवसाय पण चालू करू शकतात.

चॉकलेट  पॅकेजिंग

तर मित्रानो आपण चॉकलेट व्यवसाय सुरु केला चॉकलेट  पण बनवल्या पण आता त्या पॅक कश्या   करायच्या   तर चॉकलेट पॅक करण  हाच सर्वात मोठा प्रश्न असतो तर मित्रानो तुम्हाला तुम्हची चॉकलेट अशी पॅक करायचीये कि ती दिसायला आकर्शक असली  पाहिजे आजकाल बाजारात खूप छान चॉकलेट  बॉक्स  मिळतात तर तुम्ही ते बॉक्स आणून पण चॉकलेट पॅक करू शकतात नाहीतर तुम्हाला जर काही पॅकिंग ची कल्पना असेल तर तुम्ही बाजारातून होलसेल विक्रेत्या कडून पाकिजीग च मटेरियल  खरेदी करून तुम्ही वेगवेगळ्या  डिसाईन च्या  चॉकलेट पॅक करून विकु  शकतात.

चॉकलेट व्यवसायात नफा

 तर चॉकलेट हि प्रत्येक दिवशी खाल्ली जाते म्हणून चॉकलेट ची मागणी बाजारात खूप वाढलीये आणि तुम्ही जर हा व्यवसाय सुरु केला तर तुम्हाला दुसऱ्या कामाची कधीही गरज भासणार  नाही जेव्हा तुमच्या चॉकलेट ची बाजारात खूप मागणी वाढेल तेव्हा तुम्हाला खुप नफा मिळेल आणि असं हि तुम्हाला चॉकलेट व्यवसायात ३० ते ४० टक्के नफा मिळतो तुम्ही एका वर्षात कशे हि १०००००  ते  १५००००  पर्यंत नफा मिळवू शकतात.

FAQs:

Q. भारतात कोणते चॉकलेट बनवले जाते

Ans: भारतात नेव्हीलुनाचे चॉकलेट बनवले जाते

Q. भारतात कोणते चॉकलेट १ नंबर ला चालतात

 Ans: भारतात १  नंबर ला डेरी मिल्क ५ स्टार जेम्स अस्या प्रकारच्या चॉकलेट चालतात

Q. बाजारात कोणत्या चॉकलेट ला जास्त मागणी आहे

Ans: बाजारात डेरी मिल्क आणि ५ स्टार चॉकलेट ला जास्त मागणी आहे 

Q. चॉकलेट व्यवसायात नफा किती असतो

Ans: चॉकलेट व्यवसात ३० ते ३५ टक्के नफा असतो

Q. चॉकलेट व्यवसाय हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो का

Ans: हो चॉकलेट व्यवसाय हा भारताचा फायदेशीर व्यवसाय आहे

Q. मी माझा स्वतःचा चॉकलेट व्यवसाय कसा सुरु करू शकते

Ans: तुम्ही आम्हचा लेख पूर्ण वाचा आणि तुम्हचा चॉकलेट व्यवसाय चा बजेट ठरवून तुम्ही चॉकलेट व्यवसाय सुरु करू शकतात

निष्कर्ष

मित्रानो आशा आहे कि तुम्हाला आम्हचा चॉकलेट व्यवसाय कसा सुरु करावा हा लेख नक्कीच आवडला असेल आणि समजला हि असेल तर  मित्रानो तुम्हाला जर आमच्या लेखा मध्ये काही चुकीचं वाटत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आम्हचा लेख कसा वाटला  तेही कळवा आणि हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा म्हणजे त्यांना हि  चॉकलेट व्यवसाया बदद्ल कळेल कि हा व्यवसाय कसा सुरु करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment