Python भाषा कशी शिकायची | How To Learn Python In Marathi 2024

मित्रांनो,तुमच्या ही मनात प्रश्न येतच असेल की Python भाषा कशी शिकायची? पायथन भाषा शिकणे खूप सोपे आहे. या आर्टिकल मधे पायथन भाषा शिकण्यासाठी काही स्टेप्स दिल्या आहेत. बाकी सर्व भाषा न पेक्षा पायथन सोपं आहे.ते आपण सहज शिकु शकता.पायथन शिकल्यावर तुम्हाला पायथन भाषेवर अवलंबून चांगली नौकरी मिळू शकते. तुमच्या नॉलेज मधे भर पडते. फक्त सिन्टॅक्स लक्षात ठेवून तुम्ही पायथन भाषेत कोड करू शकता. तर या आर्टिकल मधे आपण पाहूया Python भाषा कशी शिकायची आणि Python शिकणे इतके सोपे का आहे?

Python शिकणे इतके सोपे का आहे | Why Is Python Easy To Learn In Marathi

पायथन चा सिंटॅक्स साधा सरळ आणि लक्षात ठेवायला सोपा आहे.नवीन शिकणाऱ्या साठी याचे स्ट्रक्चर आणि कोडिंग पॅटर्न सोपं आहे.पायथन ही एक पॉप्युलर आणि Comprehensive भाषा आहे. याचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रात होतो जसे की वेब डेव्हलपमेंट, डाटा सायन्स, मशीन लर्निग, इत्यादी. यामुळेच पायथन सोबत सपोर्ट, संदेश बोर्ड, ऑनलाईन ट्युटोरियल आणि कम्युनिटी सपोर्ट उपलब्ध आहेत.

पायथन ही लार्ज कम्युनिटी आहे ज्यात लाख पेक्षा ही अधिक डेव्हलपर, प्रोग्रामर,आणि शिक्षक आहेत. हा community युजर्स च्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहयोग करतो आणि त्यांना नवीन नॉलेज देण्या साठी सक्षम असतो. पायथन ही corss प्लॅटफॉर्म भाषा आहे. जी विंडोज, मॅक ओ. एस.आणि लिनक्स अश्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम वर उपयोग केला जातो. Python नंतर कोणता कोर्स सर्वोत्तम आहे हेही या आर्टिकल मधे सांगितलेलं आहे.

एकदा लिहिलेल्या कोड ला काही बदल न करता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर चालवलं जाऊ शकते. पायथन चा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रात केल्या जातो. जसे की वेब डेव्हलपमेंट, डाटा visualization आणि analytics . याच अर्थ असा की ही एक खूप उपयोगी आणि सोपी भाषा आहे ज्याचा तुम्ही खुप उद्योगधंद्यात वापर करू शकता.

Python शिकण्याचे काय फायदे आहेत | What Are The Benefits Of Learning Python In Marathi

तुमच्या मनात हे येत असेल की अनेक प्रोग्रामिंग भाषा आहेत, मग Python शिकण्याचे काय फायदे आहेत? पायथन शिकण्याचे अनेक फायदे आहेत. येथे काही मुख्य फायदे आहेत:

 • Simplicity
 • prevalence
 • operability
 • prosperous community
 • career opportunities

सुरुवातीला फक्त Python शिकलो तर नौकरी मिळेल का | Can Learning Python Get A Job In Marathi

सुरुवातीला फक्त Python शिकलो तर नौकरी मिळेल का? असा प्रश्न तुमच्या मनात येतो का? Python ही एक अतिशय प्रसिद्ध आणि शक्तिशाली प्रोग्रामिंग भाषा आहे जी वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि ऑटोमेशन इत्यादी विविध क्षेत्रात वापरली जाते. पायथनमध्ये अनेक लायब्ररी आणि फ्रेमवर्क आहेत जे विविध कार्ये Accessible बनवतात आणि त्यांना customized करण्यात मदत करतात.

पायथनच्या लोकप्रियतेमुळे, अनेक कंपन्या पायथन डेव्हलपर्स च्या शोधात आहेत. त्यामुळे जर तुम्ही पायथन चांगले शिकलात आणि सराव केलात, तर तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट्स वर काम करणे, ऑनलाइन रिसोर्सेस वापरणे आणि सुधारण्यासाठी नियमितपणे शिकणे आवश्यक आहे.

तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि जॉब सर्च वेबसाइट्सवर पायथन डेव्हलपरच्या पदांसाठी सूचना पाहू शकता. शिवाय, बहुतेक शैक्षणिक संस्था पायथनचा समावेश करत आहेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तयार करण्यासाठी संबंधित skills आणि knowledge प्रदान करत आहेत.

Python भाषा कशी शिकायची | How To Learn Python In Marathi

Python भाषा कशी शिकायची? तर पायथन भाषा शिकण्याचे अनेक मार्ग आहेत. येथे काही steps आहेत ज्या तुम्हाला पायथन शिकण्यास मदत करू शकतात:

 • ऑनलाइन ट्यूटोरियल आणि Cources: पायथन शिकण्यासाठी इंटरनेटवर अनेक ऑनलाइन ट्यूटोरियल आणि कोर्सस उपलब्ध आहेत. तुम्हाला Coursera, Udemy, edX, Khan Academy, Codecademy आणि Python.org सारख्या साइट्सवर पायथनसाठी फ्री आणि paid cources मिळू शकतात.
 • पुस्तके: पायथन शिकण्यासाठी बरीच चांगली पुस्तके उपलब्ध आहेत, जसे की “ऑटोमेट द बोरिंग स्टफ विथ पायथन” आणि “पायथन क्रॅश कोर्स”. या पुस्तकांच्या माध्यमातून तुम्हाला पायथनच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी मदत मिळेल.
 • सराव: Python शिकण्यासाठी जास्तीत जास्त सराव करा. कोडिंग सरावासाठी तुम्ही LeetCode, HackerRank आणि CodeSignal सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सराव करू शकता.
 • Project करा: एका विशिष्ट विषयावर आपले प्रोजेक्ट्स तयार करा. हे तुम्हाला Python चे वेगवेगळे ऍप्लिकेशन समजून घेण्यास मदत करेल. उदाहरणार्थ, तुम्ही डेटा व्हिज्युअलायझेशन, वेब डेव्हलपमेंट किंवा मशीन लर्निंगमध्ये प्रोजेक्ट करू शकता.
 • Community Support: पायथन च्या community मध्ये सामील व्हा. मंच, ब्लॉग आणि community मध्ये सामील होऊन तुम्ही इतर लोकांकडून शिकू शकता आणि तुमच्या समस्यांवर उपाय शोधू शकता.

Python नंतर कोणता कोर्स सर्वोत्तम आहे | Which Course Is Best After Python Programming In Marathi

पायथन प्रोग्रामिंगनंतर, तुम्हाला तुमच्या करिअरच्या उच्च पातळीवर घेऊन जाण्यासाठी अनेक प्रमुख कोर्सस आणि डोमेन असू शकतात, जे तुम्ही निवडलेल्या क्षेत्रानुसार आणि तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे असू शकतात. येथे काही प्रमुख डोमेन आणि कोर्सस ची list आहे:

 1. डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग: पायथनची चांगली समज झाल्यानंतर, तुम्ही डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगकडे जाऊ शकता. या डोमेनमध्ये तुम्हाला अल्गोरिदम, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि डेटा मॉडेलिंगच्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. Coursera, edX आणि Udacity सारख्या प्लॅटफॉर्मवर डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग कोर्स उपलब्ध आहेत.
 2. वेब डेवलपमेंट: तुम्हाला वेब डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट असल्यास, तुम्ही फ्रंटएंड (HTML, CSS, JavaScript) आणि बॅकएंड (Python, Django, Flask) वरील कोर्सस चा अभ्यास करू शकता. Udemy, Coursera आणि FreeCodeCamp सारख्या साइट्सवर वेब डेव्हलपमेंटसाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत.
 3. नेटवर्किंग आणि सायबर सुरक्षा: तुम्हाला सायबर सुरक्षा आणि नेटवर्किंगमध्ये इंटरेस्ट असल्यास, तुम्ही या डोमेनमध्ये पण कोर्सस करू शकता.
 4. DevOps: DevOps कोर्स तुम्हाला सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन, legislation making, कंटेनरायझेशन आणि बॅच प्रक्रिया ऑटोमेशन बद्दल शिकवतात. डॉकर, कुबर्नेट्स, जेनकिन्स आणि ॲन्सिबल सारख्या टूल्स चे knowledge देखील महत्त्वाचे आहे.

FAQ’s

Python शिकण्यासाठी कोणते सर्वोत्तम आहे?

पायथन विनामूल्य शिकण्यासाठी इंटरनेटवरील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे Codecademy.

Python हा चांगला कोर्स आहे का?

Python हे एक उत्तम कौशल्य आहे कारण पायथन काहीही करू शकतो आणि त्याचे कोडिंग जलद आणि सोपे आहे .

Python मध्ये adept होण्यासाठी किती वेळ लागतो?

वेगवेगळ्या अंदाजानुसार डेटा सायन्ससाठी पायथन शिकण्यासाठी तीन ते १२ महिने लागू शकतात.

Python सह मशीन लर्निंग शिकण्यासाठी किती वेळ लागतो?

पायथन प्रोग्रामिंगचा पाया भक्कम असलेल्यांसाठी, मशीन लर्निंगसाठी पायथन शिकणे एका आठवड्यात साध्य केले जाऊ शकते.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. Python भाषा कशी शिकायची आणि सुरुवातीला फक्त Python शिकलो तर नौकरी मिळेल का. याची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. हा लेख आपल्या त्या मित्राला शेयर करा जो कंपनी चलवातो किंव्हा सुरू करणार आहे.

जर तुम्हाला Python भाषा कशी शिकायची. या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment