कोरोना सारख्या महामारीच्या काळात आपला देश आर्थिक परिस्थितीने खुप खालावला होता. तर या परिस्थिती मध्ये खूप लोकांची नोकरी गेली बरेच लोक बेरोजगार झाले. या कारणामुळे देशाची आर्थिक परिस्थिती सुधार करण्यासाठी आणि तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने आत्मनिर्भर भारत अभियान योजना याची घोषणा केली.
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२० रोजी Atmanirbhar Bharat Abhiyan ची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत अभियान १.० याच्या सफलता नंतर आत्मनिर्भर भारत अभियान २. ० आणि आत्मनिर्भर भारत अभियान ३. ० हे लाँच करण्यात आले.
या योजने च्या माध्यमातून कोरोना सारख्या झालेल्या महामारी मुळे झालेल्या परिसथिती मध्ये सुधार आला. आजच्या ह्या आर्टिकल मध्ये आत्मनिर्भर भारत अभियान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, लाभ, पात्रता काय आहे हे बघणार आहोत.
आत्मनिर्भर भारत अभियान | Atmanirbhar Bharat Abhiyan in Marathi
देशाची आर्थिक परिस्थिती सुधार करण्यासाठी आणि तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने Atmanirbhar Bharat Abhiyan योजना याची घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत सर्व तरुण आणि संघटित क्षेत्रातील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
या योजनेत लाभ मिळणाऱ्या सर्व तरुणांना application करून लाभ घेता येईल. रेजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला दुसरीकडे जायची काही गरज नाही. जर तुमच्या कडे मोबाइल, लॅपटॉप च्या साहाय्याने करू शकतो.
आत्मनिर्भर भारत अभियान योजना उद्देश्य | Objectives of Atmanirbhar Bharat Yojana in Marathi
जसे कि आपणाला माहिती आहे कि कोरोना सारख्या संसर्गजन्य विषाणू मुळे भारतात lockdown लागले होते. तर या कारणामुळे सर्व गोष्टींचा लाभ घेणे अशक्य झाले होते.
देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली होती, तसेच लोकांचे नोकरी बंद झाली होती अश्या परिस्थिती मध्ये सुधार करण्यासाठी सरकार ने Atmanirbhar Bharat Abhiyan लाँच केले. ज्यामुळे देशाची आर्थिक स्थिती परिस्तिथी सुधारेल आणि सर्व बेरोजगारांना काही रोजगार भेटेल व देशाची आर्थिक बजेट वाढेल.
आत्मनिर्भर भारत अभियान योजना लाभ | Benefits of Atmanirbhar Bharat Abhiyan in Marathi
- उत्पादन क्षेत्रात आणि MGNREGA ( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act ) योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. विविध उपायांद्वारे देशाच्या बँकिंग प्रणालीमध्ये सुविधा निर्माण होईल.
- MSMES ( Ministry of Micro, Small & Medium Enterprise ) आणि इतर उद्योगांना क्रेडिट सुविधा प्रदान केल्यामुळे उत्पादन वाढेल.
- स्थलांतरित मजुरांच्या हातात थेट रोख रक्कम प्रदान केल्यामुळे मागणी वाढेल.
- अवकाश, कोळसा अशा अनेक क्षेत्रांमध्ये खाजगी खेळाडूंसाठी प्रवेश उघडून त्यांचा खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढेल.
- देशातील आरोग्य सुविधांचा विकास होईल.
आत्मनिर्भर भारत अभियान पात्रता | Eligibility of Atmanirbhar Bharat Abhiyan in Marathi
- आत्मनिर्भर भारत अभियान हि योजना भारतातील ज्या नागरिकांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांच्या साठी सोयीस्कर आहे .
- लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी, व्यापारी ( Start – Up Business ), आणि स्वयंरोजगार या लोकांसाठी ओपन आहे.
- आत्मनिर्भर भारत अभियान हि योजना NRI ( Non – Resident Indian) या लोकांना सुद्धा ओपन आहे जे कि भारतात गुंतवणूक करू इच्छिता.
आत्मनिर्भर भारत अभियान 2025
योजनेचे नाव | आत्मनिर्भर भारत अभियान |
लाँच केले | 12 मे 2020 |
द्वारे घोषित केले | माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी |
आर्थिक मदत | 20 लाख कोटी रुपये (GDP च्या 10%) |
प्रमुख स्तंभ | अर्थव्यवस्था (Economy) पायाभूत सुविधा (Infrastructure) प्रणाली (Technology) लोकशाही (Vibrant Demography) मांग (Demand) |
केंद्र बिंदु क्षेत्र | MSMES निर्वासित आरोग्य शिक्षण संरक्षण अंतरिक्ष बँकिंग कर्ज अन्न सुरक्षा खोदकाम सुधारणा |
अर्ज करण्याची पद्धत | online |
वेबसाइट | aatmanirbharbharat.mygov.in |
आत्मनिर्भर भारत अभियान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | Atmanirbhar Bharat Abhiyan Online Application Process in Marathi 2023
आत्मनिर्भर भारत अभियान योजना ला रजिस्टर करण्याची खूप सोपी पद्दत आहे. ती आपण बघूया step- by – step खालीलप्रमाणे –
- Step 1 :
- आत्मनिर्भर भारत अभियान योजना ला रजिस्टर करण्यासाठी सर्वप्रथम त्याच्या ऑफिसिअल वेबसाइट वर जाणे.
- त्यानंतर तिथे Home Page ओपन होईल.
- तिथे वरच्या बाजूला ला right corner ला Register बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
- Step 2 :
- Register बटण वर क्लिक केल्यावर तिथे आपल्याला एक नवीन page ओपन होईल.
- त्यात आपले नाव , Mail ID , Birth Date याप्रमाणे जी माहिती विचारली गेली असेल ती भरावी .
- सर्व माहिती भरून झाल्यावर Create New Account वर क्लिक करायचे. यापद्धतीने तुमचे रेजिस्ट्रेशन होऊन जाईल.
आत्मनिर्भर भारत अभियान पोर्टलवर लॉगिन प्रक्रिया
- Step 1 :
- सर्वात पहिले आत्मनिर्भर भारत अभियान यासाठी official website वर जाऊन वरील सांगितल्या प्रमाणे आपले रेजिस्ट्रेशन करून घ्यावे .ऑफिसिअल वेबसाइट वर गेल्यावर तिथे Home Page ओपन होईल.
- तिथे वरच्या बाजूला ला right corner ला Login बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
- Step 2 :
- Login बटण वर क्लिक केल्यावर तिथे आपल्याला एक नवीन page ओपन होईल.
- तिथे आपले Mail ID आणि Password टाकावे . आणि Login बटण वर क्लिक करावे.
- अश्या पद्धतीने तुम्ही आत्मनिर्भर भारत अभियान पोर्टलवर लॉगिन करू शकता.
FAQs
आत्मनिर्भर भारत अभियानची ३ पॅकेज कोणते ?
आत्मनिर्भर भारत अभियान १. ०
आत्मनिर्भर भारत अभियान २. ०
आत्मनिर्भर भारत अभियान ३. ०
आत्मनिर्भर भारत योजना ऑनलाइन नोंदणी कशी करावी ?
सर्वात पहिले आत्मनिर्भर भारत अभियान योजना च्या ऑफिसिअल Website वर जाणे .
Home Page ओपन होईल त्याच्या Right कॉर्नर ला तुम्हाला register वर क्लिक करायचे आहे .
नेक्स्ट पेज वर registration form ओपन होईल त्यात संपूर्ण माहिती भरून Creat New Account वर क्लिक करा .
या प्रकारे तुम्ही आत्मनिर्भर भारत अभियान च्या पोर्टल वर रेजिस्टर होऊन जाणार
Registration झाल्यावर तुम्ही आत्मनिर्भर भारत अभियान च्या पोर्टल वर जाऊन login करू शकता
आत्मनिर्भर भारत अभियान योजना किती आर्थिक मदत देण्यात आली आहे ?
आत्मनिर्भर भारत अभियान यासाठी 20 लाख कोटी रुपये (GDP च्या 10%) आर्थिक मदत देण्यात आली आहे.
आत्मनिर्भर भारत अभियान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करण्यासाठी ऑफिसिअल वेबसाइट कोणती ?
आत्मनिर्भर भारत अभियान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करण्यासाठी ऑफिसिअल वेबसाइट aatmanirbharbharat.mygov.in हिआहे.
निष्कर्ष
मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. Atmanirbhar Bharat Abhiyan in Marathi या योजनेची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.
जर तुम्हाला Atmanirbhar Bharat Abhiyan Online Application Process in Marathi या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.
अजून लेख वाचा