Linkedin काय आहे ह्याचा वापर कसा करावा | Linkedin चे फायदे आणि नुकसान | What is the Linkedin in Marathi 2023

नमस्कार मित्रानो आपण समजून घेऊया Linkedin काय आहे ? Linkedin हे एक सोशल मीडिया चे प्रोफेशनल प्लॅटफॉर्म आहे. Linkedin वर सर्व प्रोफेशनल लोक जोडलेले असतात. Linkedin हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उपयोग इंटरनेट च्या मदतीने होतो. Linkedin चा वापर लोक संपूर्ण प्रोफेशनल कामांसाठी करतात. या article मध्ये details मध्ये माहिती घेऊया Linkedin काय आहे ?

linkedin काय आहे | What is the Linkedin in marathi

linkedin ची स्थापना २८ डिसेंबर २००२ मध्ये झाली आणि ५ मे २००३ पासून लोक linkedin चा वापर करायला सुरुवात झाली. रीड हॉफमन आणि एरिक लय हे linkedin चे फाऊंडर आहेत आणि रयन रॉसलांस्की हे linkedin चे CEO आहेत. आज जगामध्ये सगळीकडे linkedin चा वापर वाढत आहे. शाळा ,कॉलेज च्या विद्यार्थी पासून ते principal पर्यंत आणि कंपनी च्या employee पासून ते CEO पर्यंत linkedin चा वापर वाढत आहे. काही विद्यार्थी आणि नवीन freshers linkedin चा वापर नोकरी शोधण्यासाठी करतात.

linkedin या प्लॅटफॉर्म वर individual accounts असतात. आपण आपल्या account वरून जगातील कुठल्याही व्यक्ती सोबत जोडलेले असतो. असेच आपण linkedin ने एक प्रोफेशनल Relationship Build करू शकतो. linkedin च्या मदतीने आपण आपले skills आणि knowledge वाढवू शकतो. linkedin चा वापर आपण आपल्या लॅपटॉप किंवा मॉनिटर मध्ये पण करू शकतो. linkedin चे एक seperate app पण आहे ह्याचा वापर आपण आपल्या android मोबाईल मध्ये पण करू शकतो किंवा linkedin ची एक वेबसाईट पण आहे. अश्या प्रकारे लोक linkedin चा वापर करतात. linkedin वर वेगवेगळ्या professionalist चे groups पण असतात. अनेक लोक त्या group मध्ये जोडलेले असतात. linkedin वर लोक फोटो, विडिओ किंवा काही article पण पोस्ट करतात. त्या पोस्ट ला आपण कंमेंट किंवा like पण पण करू शकतो.

linkedin हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक जॉब मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपले carrer चांगले घढवण्याचा प्रयत्न करत असतात. linkedin वर सगळे professional background चे लोक जसे कि छोट्या buisness पासून ते एक मोठ्या कंपनी पर्यंत, विद्यार्थी पासून employee पर्यंत लोक जॉब च्या शोधात एकमेकांसोबत जोडलेले असतात. सर्वात पहिले linkedin वर आपल्या नावाची profile create होते. ह्याच्या नंतर linkedin वर आपले नेटवर्क वाढण्यास सुरुवात होते. linkedin वर आपण एकमेकांसोबत जोडलेले असतो त्याला connection असे म्हणतात. खूप सगळे विद्यार्थी किंवा employee, freshers कंपनी च्या HR सोबत जोडलेले असतात आणि आपला resume HR ला पाठवून job मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.

Linkedin वर प्रोफाइल कसे तयार करावे? | How to create profile on Linkedin

लिंक्डइन वर स्टेप बाय स्टेप प्रोफाईल कसे create करायचे ? लिंक्डइन प्रोफाइल तयार करण्यासाठी Steps:

 1. ब्राउज़र वर linkedin च्या in.linkedin.com या वेबसाईट वर जा.
 2. त्या वेबसाईट वर वरती उजव्या कोपऱ्यात join now किंवा sign up वर क्लिक करा.
 3. एक नवीन पेज उघडेल, त्यावर तुमचे नाव, आडनाव, ईमेल आणि पासवर्ड भरा.
 4. join now , agree and join वर क्लिक करा.
 5. एक नवीन पेज दिसेल, त्यावर तुमच्या देशाचे, प्रांताचे आणि शहराचे नाव भरा.
 6. next बटण वर क्लिक करा.
 7. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, त्यावर आवश्यक माहिती भरा.
 8. I am Student आणि continue वर क्लिक करा.
 9. तुम्हाला तुमच्या ईमेलवर प्राप्त होणारा confirmation कोड विचारणारे एक नवीन पेज दिसेल.
 10. कोड confirm केल्यानंतर Agree वर क्लिक करा आणि confirm करा.
 11. तुमच्या प्रोफाइलचे स्वतःचे homepage उघडेल.

Linkedin प्रोफाइलचे किती प्रकार आहेत? | What are the types of Linkedin Profile in Marathi

Linkedin प्रोफाइलचे 6 प्रकार आहेत.

 1. Entrepreneurial Executive
 2. कार्यकारी (Executive ) प्रोफाइल
 3. जॉब सीकर प्रोफाइल:
 4. नेटवर्कर प्रोफाइल
 5. बाज़ारिया (marketer )प्रोफ़ाइल
 6. विचारशील नेता (Thought Leader) प्रोफाइल

१) Entrepreneurial प्रोफाइल :

या प्रोफाइलमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थी आणि इतर अनेक लोक buisness प्रोफाइल तयार करतात. हे एक अतिशय उपयुक्त प्रोफाईल आहे. या प्रोफाइलमध्ये 500+ कनेक्शन असावेत. हे प्रोफाइल व्यवसाय उभारण्यात मदत करते. आणि विद्यार्थ्याला स्वयंरोजगार बनवते.

२) कार्यकारी (Executive ) प्रोफाइल:

हे एक वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रोफाइल आहे. हे प्रोफाइल buisness brand प्रोफाइल आहे. linkedin चे हे मजबूत प्रोफाइल आहे. हे प्रोफाइल तुमच्या resume शी जोडलेले आहे. यामध्ये अनेक व्यावसायिकांचा सहभाग आहे. तुमच्या कंपनीचे आणि स्वतःचे मार्केटिंग करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त प्रोफाइल आहे.

३) जॉब सीकर प्रोफाइल:

linkedin वरील हि प्रोफाइल अतिशय महत्त्वाची आहे. LinkedIn चा हा एक उत्तम व्यावहारिक उपयोग आहे. जिथे लोकांना चांगले करिअर मिळते. विद्यार्थी आणि इतर लोक या प्रोफाइलसह कंपन्यांना जोडतात. तुमच्या skills ने तुम्ही नोकरीसाठी कंपनीच्या HR सोबत संपर्क साधता. या प्रोफाइलमध्ये skills add केली पाहिजेत.

४) नेटवर्कर प्रोफाइल:

नेटवर्कर प्रोफाइल एक मजबूत प्रोफाइल आहे, तुम्हाला या प्रोफाइलच्या summery मधून नोकरीसाठी काही सूचना समजतात. या प्रोफाइलसह व्यवसाय देखील केला जातो. या प्रोफाइलमध्ये आपण मार्केटिंग करू शकतो. हि प्रोफाइल clients, colleagues, existing customers, service providers, recuiters यांच्याशी जोडण्यासाठी single विंडो आहे.

५) बाज़ारिया (marketer) प्रोफ़ाइल:

मार्केटर प्रोफाइल हे एक skill आहे. या प्रोफाइलमध्ये अनुभव, मार्केटिंग प्रकारची नोकरी आणि विपणन कौशल्ये समाविष्ट आहेत. लोक फक्त त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी या प्रोफाइलशी जोडलेले आहेत. दिवसेंदिवस हि profile अधिक मजबूत होत आहे.

६) विचारशील नेता (Thought Leader) प्रोफाइल:

थॉट लीडर प्रोफाईल Linkedin वर ही एक Inspiration आहे. LinkedIn ने या प्रोफाइलवरून विचारवंत नेत्यांना आणि त्यांच्या पोस्टचे अनुसरण करण्याची परवानगी दिली आहे. हे प्रोफाइल Linkedin मध्ये तुमची visibility वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. या प्रोफाईलचा उपयोग तुमचे करियर पुढे नेण्यासाठी केला जातो.

Linkedin चे फायदे | Benefits of Linkedin in Marathi

 • इंटरनेटवर इतर व्यावसायिकांशी connect करून तुमचा व्यवसाय वाढवू शकतो.
 • आपल्या auidance साठी content share करून lead तयार करणे.
 • तुमच्या कंपनी बद्दल share करून कंपनीच्या brand बद्दल जागरूकता निर्माण करा.
 • LinkedIn च्या groups मध्ये सहभागी होऊन potential customer च्या संपर्कात रहाने.
 • Linkedin च्या add मधून lead तयार करणे .
 • तुमचे results track करण्यासाठी LinkedIn Insights वापरा.
 • नवीन industry च्या बातम्यांसह connect रहा.
 • तुमच्या क्षेत्रातील इतर व्यावसायिकांशी संपर्क साधता येतो .
 • credibility वाढवणे हा देखील Linkedin चा एक फायदा आहे

Linkedin चे नुकसान | Disadvantages of Linkedin in Marathi

 • Linkedin हे सोशल मीडियापेक्षा अधिक व्यावसायिक व्यासपीठ आहे.
 • LinkedIn वर प्रभावी होण्यासाठी तुम्हाला मोठ्या नेटवर्कची आवश्यकता आहे.
 • LinkedIn मधील वेळेची गुंतवणूक महत्त्वाची आहे.
 • आपण सक्रिय वापरकर्ता असणे आवश्यक आहे.
 • LinkedIn वर प्रीमियम सदस्यत्व महाग होऊ शकते.
 • Linkedin वर तुमच्या प्रतिक्रिया तात्काळ नसतात.
 • LinkedIn वर वेगळे दिसणे कठीण असू शकते.

Linkedin वर नोकरी कशी मिळवायची | How to get job on Linkedin

आजच्या जगात अनेक लोक, विद्यार्थी, कर्मचारी linkedin वर सक्रिय आहेत. linkedin हे नोकऱ्या शोधण्यासाठी एक लोकप्रिय व्यासपीठ आहे. येथे सर्व व्यावसायिक एकमेकांशी जोडलेले राहतात. हे असे व्यासपीठ आहे जिथे दररोज मोठ्या संख्येने लोक नोकऱ्या शोधतात.

linkedin वर एक परिपूर्ण प्रोफाइल असावे. तुमच्या प्रोफाईलवर तुमचा प्रोफेशनल फोटो असायला हवा. तुमची मजबूत प्रोफाइल linkedin वर नोकऱ्या शोधण्यात मदत करते. तुमच्या प्रोफाईलसाठी linkedin हेडलाइन लिहा जे तुम्हाला वेगळे बनवते. एक व्यावसायिक summery तुमच्या प्रोफाइलमध्ये समाविष्ट केली पाहिजे, या summery मध्ये तुम्ही तुमची acheivments आणि extra activity समाविष्ट करू शकता. हि summery सांगते की तुम्ही सर्वात मोठे कर्मचारी कसे व्हाल. तुम्ही linkedin वर तुमच्या कामाच्या अनुभवाचा प्रचार केला पाहिजे, यामध्ये तुम्ही तुमचे अतिरिक्त प्रमाणपत्रे, तुमचे निकाल जोडले पाहिजेत. linkedin वर तुम्हाला कामाच्या कौशल्यांसाठी शिफारसी मिळू शकतात.

linkedin वर जॉब-सर्च function आहे ते वापरा त्यांच्याकडे अनेक नोकऱ्यांची यादी आहे. आणि Internship उपलब्ध आहेत. तुमचे sucess तुमच्या प्रोफाईलवर पोस्ट करा, तिथून कंपन्यांचा दृष्टिकोन वाढतो. तुमच्या प्रोफाइलवर नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करा. linkedin वर जॉब संबंधित groups जोडा, छोट्या-मोठ्या उद्योगांशी Connect रहा आणि Connection वाढवा, linkedin वर तुमचा स्वतःचा article share करा आणि तुमचे article लिहा, यामुळे कंपनीला तुमच्या अतिरिक्त ज्ञानाची माहिती मिळते. Interview ची तयारी करण्यासाठी linkedin वापरा. तुमचा resume कंपन्यांच्या HR ला पाठवून नोकरीकडे जाणे आणि interview ची तयारी करणे म्हणजे तुम्हाला linkedin वर नोकरी मिळेल.

Linkedin वरून पैसे कसे कमवायचे | How to get money on Linkedin in Marathi

तुम्ही auidance तयार करून linkedin वर पैसे कमवू शकता. LinkedIn मध्ये भिन्न वैशिष्ट्ये आहेत. तुम्ही linkedin वर auidance तयार करू शकता आणि ग्राहकांना आकर्षित करू शकता. तुम्ही तुमच्या उत्पादनाचे linkedin सोबत मार्केटिंग देखील करू शकता. LinkedIn व्यवसायात तुमचा ट्रेडमार्क वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. यातूनही तुम्ही पैसे कमवू शकता. तुमच्या auidance साठी mitting point बनवा आणि quality content सतत शेअर करा, तुम्ही तुमचे काम थेट सोशल नेटवर्कवर टर्नओव्हरमध्ये रूपांतरित करून पैसे कमवू शकता.

तुम्ही Affiliate करून linkedin सह पैसे कमवू शकता. यामध्ये Affiliate commercial साइटच्या उत्पादनाची जाहिरात करते. व्हिडिओंवर bet लावून linkedin मधून पैसे कमावले जातात. यामध्ये तुम्ही तुमचे उत्पादन किंवा इतरांचे उत्पादन कमिशनसाठी विकू शकता. हे उत्पादन व्हिडिओच्या स्वरूपात दर्शविले आहे. व्हिडिओ स्वरूप मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढवते. linkedin मधून नोकरी शोधून पैसे मिळतात. linkedin वरून तुमची स्वप्नातील नोकरी मिळवून पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतील. हे एक संपूर्ण linkedin प्रोफाइल विकसित करण्यापासून सुरू होते. Buisness provider बनून linkedin सह पैसे कमावले जातात. अशा प्रकारे, linkedin मधून अनेक प्रकारे पैसे कमावले जातात.

FAQs:

Linkedin चा उपयोग काय आहे?

लोकांना अधिक व्यावसायिक बनवणे आणि सहज नोकऱ्या मिळवणे हे Linkedin चे ध्येय आहे. आणि व्यावसायिक लोकांशी संपर्कात राहण्यासाठी लिंक्डइन चा वापर आहे.

linkedin तुमची प्रोफाइल कोणी पाहिली हे दाखवते का?

तुमचे प्रोफाइल कोणी पाहिले हे LinkedIn चे feature गेल्या 90 दिवसांतील visitors ला दाखवते.

आपण linkedin प्रोफाइल hide करू शकतो का ?

होय, तुम्ही तुमच्या LinkedIn प्रोफाइल सेटिंग्जमध्ये जाऊन public visibility बंद करू शकता.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. Linkedin काय आहे । What is the Linkedin in Marathi ह्याची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील. जर तुम्हाला Linkedin काय आहे । What is the Linkedin in Marathi या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment