आवडेल तेथे प्रवास योजना | याचे मूल्य, नियम काय आहेत | Aavdel Tethe Pravas in Marathi 2023

मित्रानो भटकंती किंवा प्रवास करणे हे प्रत्येक व्यक्तीला आवडते . वेगवेगळ्या नवीन तेथे माहिती घेणे नवीन गोष्टी पाहून त्यातून काही शिकणे बऱ्याच गोष्टी आपणाला आवडता . तर प्रश्न असा पडतो कि एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर कसे जायचे , जाण्यासाठी किती पैसे लागतील, अश्या विचारांनी खूप लोक आपला प्रवास टाळता. प्रवासी आणि एसटी यांचे एक वेगळेच नाते असते तर याचा विचार करून सरकार ने प्रवाशांना सुखरूप आपल्या ठिकाणी जाता येईल यासाठी आवडेल तेथे प्रवास योजना हि योजना काढली आहे. तर यात प्रवाशांना खूप कमी खर्चात प्रवास करता येणार आहे.

एसटी महसूल प्रवासाच्या सोयी साठी खूप साऱ्या वेगवेगळ्या योजना राबवत असते. तसेच एसटी महसूल वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करतच राहते. खूप सारे व्यापारी , उद्योजक यांना कामानिमित्त बाहेर जावे लागते प्रवास करावा लागतो . असे खूप सारे हौशी प्रवासी असता असता ज्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते. तर अश्यासाठी सरकारने आवडेल तेथे प्रवास या योजनेचा आरंभ केला आहे तर चला बघूया कि आवडेल तेथे प्रवास योजना काय आहे.

आवडेल तेथे प्रवास योजना काय आहे ?

१९८८ मध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ( Maharashtra State Road Transport Corporation ) दहा दिवसांसाठी एसटी चा पास देत आवडेल तेथे प्रवास या योजनेची सुरवात केली. २००६, एप्रिल मध्ये या योजनेची पुनर्रचना करून १० दिवसाचा पास cancle करून ४ आणि ७ दिवसाचा पास काढण्यात आला. या पासची वैधता शहर वाहतुकीसोबतच राज्यामध्ये तसेच आंतरराज्य वाहतुकीत मध्ये सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. प्रवाशांना पास चे आरक्षण ( Reservation ) करून घेण्याची परवानगी आहे. ४ आणि ७ दिवसाचा पासचे शुल्क वेगवेगळे आहे.

पूर्वी आवडेल तेथे प्रवास या योजनेच्या अंतर्गत ४ आणि ७ दिवसाचे वर्षातून २ हंगाम काढण्यात आले होते. त्यामध्ये एक कमी गर्दीचा हंगाम आणि दुसरा गर्दीचा हंगाम असे २ हंगाम काढण्यात आले होते . आता मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी हि योजना वर्षभर राबवण्यात आली आहे . यात राज्य आणि आंतरराज्य यांचे पास चे मूल्य वेगळे आहे. एसटी ची साधी सेवा , रात्रीची सेवा , जलद सेवा , शिवशाही , हिरकणी अश्या वेगवेगळ्या बस ची निवड प्रवाशांना करता येते. आवडेल तेथे प्रवास हि योजना वर्षभर चालू असली तरी सणावाराला, उन्हाळा , हिवाळा , लग्नसराईत या योजनेला चांगलाच प्रतिसाद मिळतो. प्रामुख्याने पर्यटन स्थळी तसेच देव धर्मस्थळी या पास ची जास्त नोंदणी केलेली असते.

आवडेल तेथे प्रवास पासचे मूल्य काय आहे ?

१९८८ मध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ( Maharashtra State Road Transport Corporation ) आवडेल तेथे प्रवास हि योजना प्रवाशांसाठी राबवली आहे. या योजनेत ४ आणि ७ दिवसाचा पास देण्यात येतो व त्याचे पैसे आकारले जातात. या पासचे सुधारित दर हे ५ मे २०२२ पासून लागू झाले आहे . तर चला तर बघूया आवडेल तेथे प्रवास पासचे मूल्य काय आहे ?

७ दिवसाच्या पासाचे मुल्य

वाहतूक सेवेचा प्रकारप्रौढमुले
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती (मिडी) आंतरराज्य सह२०४०१०२५
शिवशाही (आसनी) आंतरराज्य सह३०३०१५२०
७ दिवसाच्या पासाचे मुल्य

४ दिवसाच्या पासाचे मुल्य

वाहतूक सेवेचा प्रकार प्रौढमुले
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती (मिडी) आंतरराज्य सह११७०५८५
शिवशाही (आसनी) आंतरराज्य सह१५२०७६५
( वर दिलेल्या मुलांच्या पासचे दर ५ वर्षापेक्षा जास्त व १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत. )

आवडेल तेथे प्रवास योजनेचे प्रमुख नियम :

  • आवडेल तेथे प्रवास या योजनेच्या अंतर्गत ४ आणि ७ दिवसाचे पास दिले जातील.
  • ४ आणि ७ दिवसाचे पास हे वेळेच्या १० दिवस अगोदर देण्यात येणार आहे.
  • शिवशाही बस साठी वेगळे पास ठरवण्यात आले आहे.
  • आवडेल तेथे प्रवास या योजनेचे पास नियमित बस तसेच शिवशाही बसला तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणारी बस साठी पण ग्राह्य धरण्यात येईल.
  • या योजनेत पास घेण्यासाठी पासधारकांना आरक्षण करून ठेवता येईल.
  • आवडेल तेथे प्रवास या योजनेत पास काढणाऱ्या प्रौढ प्रवाशांना ३० किलो आणि १२ वर्षाखालील मुलांना १५ किलो सामान घेऊन जायला कोणत्याही प्रकारचे मूल्य आकारण्यात येणार नाही.
  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत बसने प्रवास करता येईल.
  • जर एखादी वेळेस पास धारकांकडून पास हरवले तर परत पास देता येनार नाही व परत चे दर हि देता येणार नाही.
  • पास चा गैरवापर करण्यात आला तर पास जप्त करण्यात येईल .
  • प्रवास मध्ये कोणत्या प्रकार चे सामान हरवल्यास महामंडळ त्याला जबाबदार राहणार नाही.
  • स्मार्ट कार्ड योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पासांसाठी सर्व वरील नियम लागू राहतील.

आवडेल तेथे प्रवास सेवा पुरविण्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे

  • विहीत नमुन्यातील अर्ज
  • २ पासपोर्ट आकाराचे फोटो
  • पासाचे मुल्याची रक्कम

FAQs

आवयक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल ?

मागणी केल्यावर तात्काळ पास देण्यात येतो़

सेवा पुरविणारा अधिकारी / कर्मचारी कोण असतो ?

सेवा पुरविणारा अधिकारी संबधित आगार व्यवस्थापक असतो

सेवा विहीत कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी कोण असतो ?

विभाग नियंत्रक

आवडेल तेथे प्रवास योजना काय आहे ?

या योजनेत ४ आणि ७ दिवसाचा पास देण्यात येतो व त्याचे पैसे आकारले जातात व त्याचे पैसे आकारले जातात.

निष्कर्ष :

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. आवडेल तेथे प्रवास  या योजनेची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.

जर तुम्हाला आवडेल तेथे प्रवास योजना 2023 | Aavadel Tithe Pravas in Marathi  या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

2 thoughts on “आवडेल तेथे प्रवास योजना | याचे मूल्य, नियम काय आहेत | Aavdel Tethe Pravas in Marathi 2023”

  1. प्रवासात पास संपल्यावर काय करावे

    Reply
    • आवडेल तेथे प्रवास या योजनेत देण्यात येणारा पासची गणना हि ००.०० ते २४.०० अश्या प्रकारे करण्यात आली आहे. पासच्या मुदतीनंतर जर प्रवासी प्रवास करत असेल तर त्याला पुढील प्रवासासाठी तिकीट काढणे आवश्यक राहील.

      Reply

Leave a Comment