नमस्कार मित्रानो, आपल्या सर्वाना माहितीच आहे कि सरकार विविध पद्धतीच्या योजना काढत असते त्यात शेतकरी , आरोग्य , बेरोजगारी ,महिला वृद्ध व्यक्तींसाठी अश्या भरपूर योजना काढत असते. नुकतेच काढण्यात आलेले वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ ( Budget 2023 ) यात अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना याची ओळख करून दिली. या योजनेचा 4.0 घटक लवकरच launched करण्यात येणार आहे. तर त्या आधी आपण जाणून घेऊया कि प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना काय आहे । What is PM Vishwakarma Kaushal Samman Yojana in Marathi.
भारतातील छोटे – मोठे काम करणारे कारागीर हे ब्रिटिश काळापासून लुप्त होत आहेत. भारत सरकार आपली आर्थिक स्थिती वाढवण्याचा आणि जुन्या कला आणि पारंपारिक हस्तकला वेगवेगळ्या मार्गांनी जोपासण्याचा आणि जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचे अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान अर्थातच (PM – Vikas ) हि योजना देशातील कारागिरांना त्यांच्या मालाची क्षमता, व्याप्ती आणि मालाची आयात व निर्यात वाढवता यावी यासाठी ही योजना विकसित करण्यात आली आहे. हे उदयोग सूक्ष्म, लघु आणि मध्यम-उद्योग (Micro, Small, and Medium-scale Enterprises -MSME) यात समाविष्ट केले जातील. बुधवारी, दिनांक १ फेब्रुवारी रोजी भारतीय संसद समोर वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ (Budget 2023) सादर करन्यात आले त्या दरम्यान प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान या योजनेची घोषणा करण्यात आली.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना काय आहे । What is PM Vishwakarma Kaushal Samman Yojana in Marathi
पार्श्वभूमी (Background)
- भारत सरकारने 2015 मध्ये स्किल इंडिया मिशन ( Skill India Mission ) सुरू केले होते. ज्याच्या अंतर्गत प्रमुख योजना हि प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल विकास योजना PM Vishwakarma Kaushal Samman Yojana (PMKVY) चालवली जाते.
- या योजनेच्या अंतर्गत 2022 पर्यंत भारतातील 40 कोटींहून अधिक लोकांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्यात आले आहे. समाजात चांगल्या उपजीविके साठी आणि सन्मानासाठी भारतीय युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल विकास योजना ( PM Vishwakarma Kaushal Samman Yojana ) याची अंमलबजावणी हि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय ( Ministry of Skill Development and Entrepreneurship -MSDE) याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ ( National Skills Development Corporation – NSDC) द्वारे केली जाते.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल विकास योजने चे ३ मुख्य घटक | Three Components of PM Vishwakarma Kaushal Samman Yojana (PMKVY) in Marathi
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल विकास योजना हि २०१५ मध्ये सुरु करण्यात आली होती तर या योजनेचे ३ मुख्य घटक खालील प्रमाणे
- PMKVY 1.0
- PMKVY 2.0
- PMKVY 3.0
PMKVY 1.0
- स्थापना (Launch ) : भारतातील सर्वात मोठी कौशल्य प्रमाणन योजना – प्रधान मंत्री कौशल विकास योजना (PMKVY) हि जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day) या दिवशी म्हणजेच 15 जुलै 2015 रोजी सुरू करण्यात आली.
- उद्देश (Aim ) : मोफत आणि कमी कालावधीचे तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन देशातील कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे आणि कौशल्य तरुणांना आर्थिक बक्षिसे देऊन प्रोत्साहन देणे.
- परिणाम (Outcome ) : 2015-16 मध्ये, 19.85 लाख उमेदवारांना या योजने अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले.
PMKVY 2.0
- स्थापना (Launch ) : PMKVY 2.0 हे 2016-20 मध्ये सुरु करण्यात आले .
- उद्देश (Aim ) : भारतातील व्यापार आणि भूगोल या दोन्ही बाबतीत वाढ करून आणि मेक इन इंडिया ( Make in India ) , डिजिटल इंडिया ( Digital India ), स्वच्छ भारत इत्यादी भारत सरकारच्या इतर मोहिमांशी अधिक संरेखन करून लॉन्च करण्यात आले.
- परिणाम (Outcome ) : 2016-20 मध्ये 1.2 कोटींहून अधिक तरुणांना प्रशिक्षित केले गेले आहे.
PMKVY 3.0
- स्थापना (Launch ) : PMKVY 3.0 हे 2021 मध्ये सुरु करण्यात आले. 717 जिल्हे, 28 राज्ये/आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू केलेले, PMKVY 3.0 हे ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दिशेने एक पाऊल आहे.
- उद्देश (Aim ) : नवीन युग आणि इंडस्ट्री 4.0 जॉब रोल( Industry 4.0 job roles ) च्या क्षेत्रात कौशल्य विकासाला चालना देऊन मागणी-पुरवठ्यातील तफावत कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
- परिणाम (Outcome ) : 2021 मध्ये 8 लाखहून अधिक तरुणांना प्रशिक्षित केले गेले आहे.
आताच जाहीर केलेल्या वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ ( Budget २०२३ ) यात अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सांगितलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना ( PMKV 4.0 ) लवकरच launch करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल विकास योजने चे प्राथमिक घटक । primary factors of PM Vishwakarma Kaushal Samman Yojana in Marathi
- आर्थिक मदत
- प्रगती कौशल्य प्रशिक्षण
- नवीन तंत्रज्ञानात प्रवेश
- सूक्ष्म, लघु आणि मध्यम-उद्योग (Micro, Small, and Medium-scale Enterprises -MSME) मध्ये एकत्रीकरण
- पेपरलेस पेमेंट (Paperless Payment )
- व्यापक पोहोच आणि जागतिक बाजारपेठेचा परिचय
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल विकास योजने चे प्रमुख घटक । key Components of PM Vishwakarma Kaushal Samman Yojana in Marathi
- अल्पकालीन प्रशिक्षण (Short Term Training )
- आधीच्या शिक्षणाची ओळख (Recognition of Prior Learning )
- विशेष प्रकल्प ( Special Projects )
- कौशल आणि रोजगार मेळा (Kaushal and Rozgar Mela)
- प्लेसमेंट सहाय्य (Placement Assistance)
- सतत देखरेख (Continuous Monitoring )
- प्रमाणित ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन (Standardized Branding and Communication)
विश्वकर्मा म्हणून कोणाला संबोधले जाते | Who is referred to as Vishwakarma in Marathi
हिंदू धर्मानुसार, विश्वकर्मा हे कलाकुसरीचे देव आहेत. तो देवांसाठी रथ, शस्त्रे आणि महाल बनवतो. त्यांनी रावणासाठी लंका महाल, भगवान कृष्णासाठी द्वारका आणि पांडवांसाठी इंद्रप्रस्थ बांधले. विश्वकर्मा हे खालीलप्रमाणे :
आचार, आचारी, आचारी थाचेर, आचारी, आचार्य, अक्कासले, अर्कसल्ली, असारी, असारी ओड्डी, असुला, औसुल किंवा कमसाली, बधेल, बडिगर, बग्गा, बैलापथरा, बैलुकममारा, भदिवडल्ला, भारद्वाज, बिधानी, विश्वकर्मा, बोगाहलु चारी, चतुवेदी, चेट्टियन, चिक्कमने, चिपेगरा, चोला, चौधरी, दास, देवगण, देवकमलाकर, धीमान, ढोले, द्विवेदी, गज्जर, गीद, गेज्जीगर, गिज्जेगरा, गिल, गुजर, जांगेर, जांगीड, कलसी, कमर, कंभरा, कमलान कमलार, कममारा, कम्मारी, कममियार, कमसाला,
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजनेचे वैशिष्ट्ये | Significance of PM Vishwakarma Kaushal Samman Yojana in Marathi
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान ही योजना देशातील कुशल कामगारांना त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्याचा आणि त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणासाठी मान्यता प्राप्त करण्याचा मार्ग प्रदान करते. सरकारला देशाच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देण्यासाठी भारतीय कारागीर आणि कारागीरांच्या प्रयत्नांना मान्यता देण्याची आणि समर्थन देण्याची संधी देखील प्रदान करते. भारताला स्वावलंबी बनवण्याचा या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे. तसेच, यामुळे भारताची जागतिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. आजही अनेक भारतीय कला आणि हस्तकलांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना काय आहे
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान अर्थातच (PM – Vikas ) हि योजना देशातील कारागिरांना त्यांच्या मालाची क्षमता, व्याप्ती आणि मालाची आयात व निर्यात वाढवता यावी यासाठी ही योजना विकसित करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल विकास योजने चे प्रमुख घटक
अल्पकालीन प्रशिक्षण
आधीच्या शिक्षणाची ओळख
विशेष प्रकल्प
कौशल आणि रोजगार मेळा
प्लेसमेंट सहाय्य
सतत देखरेख
प्रमाणित ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन
प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजनेचे उद्देश काय आहे
भारताला स्वावलंबी बनवण्याचा या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे. तसेच, यामुळे भारताची जागतिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. आजही अनेक भारतीय कला आणि हस्तकलांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
निष्कर्ष
मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना काय आहे । What is PM Vishwakarma Kaushal Samman in Marathi या योजनेची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील. जर तुम्हाला या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.
अतिशय महत्तवपूर्ण माहिती आहे .
Thank You
thank you