सरकार नागरिकांच्या चांगल्या हेतू साठी नवनवीन योजना काढत असते. देशाचा आणि नागरिकाचा सर्वांगीण विकास व्हावा हेच सरकारचे लक्ष्य आहे. छोट्या – मोठ्या व्यापारांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना काढली आहे. या योजनेत सरकार व्यावसायिकांना बँक अंतर्गत सुलभ अटींवर कर्ज उपलब्ध करून देत आहे . या योजनेअंतर्गत सरकार 10 लाख रुपयांपर्यंत लोण बँक देऊ करणार आहे. या योजनेतून लोण प्राप्त करण्यासाठी लोण घेणाऱ्याला बँकेकडे कोणत्याही प्रकारची सिक्योरिटी जमा करण्याची गरज नाही आहे.
आजच्या या आर्टिकल मध्ये आपण प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना काय आहे, त्याची उद्दीष्टे, पात्रता, या योजना अंतर्गत अर्ज कसा करावा तसेच योजना अंतर्गत संपूर्ण माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळून जाईल.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना काय आहे | PM MUDRA Loan Scheme in Marathi
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना हि 8 एप्रिल 2015 रोजी केंद्र सरकार द्वारा काढण्यात आली आहे. PMMY च्या अंतर्गत सरकारने एक नवीन पाऊल उचला तो म्हणजे Micro Units Development And Refinance Agency (MUDRA) हि लोण योजना काढून आणली आहे. बिगर कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु आणि सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार दिले जाईल. हे लोण 3 प्रकारच्या वर्गीकरणात जोडले जाते ते म्हणजे शिशु , किशोर आणि तरुण श्रेणी. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत लोण घेण्यासाठी बँकेला कोणत्यातही प्रकारची ग्रँरेंटी देण्याची आवश्यकता नाही आहे. लोण घेतल्यावर त्याची परतफेड तुम्ही 5 वर्षांत करू शकतात.
केंद्र सरकारने व्यापाराना व्यवसाय स्थापित करण्यासाठी 3 लाख कोटी रुपयांचे बजेट तयार केले आहे. त्यापैय 1 कोटी 75 लाख हुन अधिक लोण हे लाभार्थ्यांना दिले गेले आहे. या योजनेअंतर्गत एक मुद्रा कार्ड देण्यात येईल, या मुद्रा कार्ड च्या मदतीने लाभार्थी लोण प्राप्त करू शकता. PM MUDRA Loan Scheme अंतर्गत लोण अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येणार नाही.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना फायदे | Benefits of PM MUDRA Loan Scheme in Marathi
- प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत कोणत्याही प्रकारचे सुरक्षा आणि तारण जमा करण्याची आवश्यकता नाही
- या योजनेअंतर्गत कमी व्याजदराने लाभार्थ्यांना लोण दिले जाणार आहे.
- लोण अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही
- महिला उद्योजकांसाठी व्याजदरात सवलत दिली जाणार आहे
- सर्व बिगरशेती उद्योग, म्हणजे लहान किंवा सूक्ष्म कंपन्या मुद्रा कर्ज घेऊ शकतात
- अनुसूचित जाती/अल्पसंख्याक वर्गातील लोक विशेष व्याज दराच्या सवलतींवर मुद्रा कर्ज घेऊ शकतात.
प्रधानमंत्री मुद्रा कर्जाचे प्रकार
केंद्र सरकारने छोट्या व्यवसायांच्या वाढीकरिता कर्जाच्या आवश्यकतेनुसार कर्जाची 3 प्रकारे वर्गीकरण केले आहे. चला तर बघूया प्रधानमंत्री मुद्रा कर्जाचे प्रकार किती व काय आहे
प्रधानमंत्री मुद्रा कर्जाचे प्रकार एकूण ३ आहेत ते खालीलप्रमाणे
- शिशु लोण
- किशोर लोण
- तरुण लोण
शिशु लोण
ज्या नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे ते शिशु लोण अंतर्गत अर्ज करू शकता. या श्रेणीत अर्ज करणाऱ्या व्यक्तींना 50 हजार पर्यन्त कर्ज भेटते. या लोण ची परतफेड 5 वर्षापर्यँत करू शकता आणि वार्षिक व्याजदर 10-12% असणार आहे.
किशोर लोण
ज्या नागरिकांनी व्यवसाय सुरू केले परंतु अजून स्थापित केले नाही ते किशोर लोण अंतर्गत अर्ज करू शकता. या श्रेणीत अर्ज करणाऱ्या व्यक्तींना 50 हजार ते 5 लाख पर्यन्त कर्ज भेटते. कर्जाची परतफेड करण्याची अंतिम मुदत बँकेनेच ठरवून दिली असते, आणि ज्या बँकेकडून कर्ज घेतेले आहे त्या संस्था व्याजदर निश्चित करतात तो व्याजदर बँकेनुसार वेगवेगळा असतो.
तरुण लोण
ज्या नागरिकांचे उद्योग स्थापित झालेले आहे आणि आपला व्यवसाय वाढवण्यासाठी उदयोजक तरुण लोण अंतर्गत अर्ज करू शकता. या श्रेणीत अर्ज करणाऱ्या व्यक्तींना 5 लाख ते 10 लाख पर्यन्त कर्ज भेटते.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना पात्रता | Eligibility of PM MUDRA Loan Scheme in Marathi
- जे नागरिक आपला व्यवसाय सुरु करू इच्छित असणार असे उदयोजक PM MUDRA Loan Scheme साठी पात्र ठरतील
- प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत apply करण्याऱ्या व्यक्तीचे वय हे 18 पेक्षा जास्त हवे.
- या योजना नुसार अर्जदार हा कोणत्याही बँकेकडून defaulter नसावा तरच त्याला कर्ज भेटू शकते.
प्रधानमंत्री मुद्रा लोन साठी आवश्यक कागदपत्रे | Documents for PM MUDRA Loan Scheme in Marathi
- अर्ज ( Application Form )
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- ओळखपत्र ( Identity Card )
- पत्त्याचा पुरावा ( Recedential Proof )
- उत्पन्नाच्या पुराव्याशी संबंधित कागदपत्रे जसे की सेल्स टॅक्स रिटर्न, आयटीआर, परवाना, नोंदणी इ.
- जात प्रमाणपत्र ( Cast Certificate )
- आधार कार्ड ( Aadhar card )
- पॅन कार्ड (PAN Card )
प्रधानमंत्री मुद्रा लोन देणाऱ्या बँक
एक्सिस बैंक | इंडियन बैंक |
बजाज फिनसर्व | कर्नाटक बैंक |
बैंक ऑफ बड़ौदा | कोटक महिंद्रा बैंक |
बैंक ऑफ इंडिया | लेंडिंगकार्ट फाइनेंस |
बैंक ऑफ महाराष्ट्र | पंजाब नेशनल बैंक |
केनरा बैंक | सारस्वत बैंक |
सेंट्रल बैंक ऑफ इंडिया | स्टेट बैंक ऑफ इंडिया |
HDFC बैंक | सिंडीकेट बैंक |
ICICI बैंक | टाटा कैपिटल |
आईडीएफसी फर्स्ट बैंक | यूनियन बैंक ऑफ इंडिया |
आईडीबीआई बैंक | यस बैंक |
प्रधानमंत्री मुद्रा लोनसाठी अर्ज कसा करावा | Application Process for PM MUDRA Loan Scheme in Marathi
- प्रधानमंत्री मुद्रा लोन साठी अर्ज करण्याकरिता त्याच्या official website ला भेट द्या
- त्यानंतर होम पेज वर शिशु, किशोर, तरुण कर्जाचे Option दिसतील.
- आता तुमच्या गरजेनुसार दिलेल्या कोणत्याही एका Option वर क्लिक करा.
- आता नवीन टॅब open होईल तिथे अर्ज डाउनलोड करण्याच्या Option वर क्लिक करा.
- अर्ज डाउनलोड केल्यानंतर, त्याची print घ्या.
- आता अर्जात दिलेली सर्व महत्वाची माहिती अचूक भरा.
- अर्जामध्ये दिलेले योग्य महत्त्वाचे तपशील भरल्यानंतर, अर्जासोबत सर्व वर दिलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या xerox copy जमा करा.
- यानंतर, तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.
- अर्जाच्या पडताळणीनंतर, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेंतर्गत लाभार्थींना 1 महिन्यानंतर कर्ज दिले जाईल.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना Helpline Number
कर्ज घेणाऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने National Toll Free Number जारी केले आहेत
- 18001801111
- 1800110001
मुद्रा कार्ड म्हणजे काय ?
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेंतर्गत अर्ज करण्याऱ्या व्यक्तींचे लोण मंजूर झाल्यावर त्यांना एक डेबिट कार्ड दिले जाते. त्याला मुद्रा कार्ड से म्हणतात. या कार्ड च्या साहाय्याने बँक account मध्ये कर्जाची रक्कम जमा झाल्यांनतर मुद्रा कार्ड च्या साहाय्याने तुम्ही पैसे काढू शकतात. नागरिकांना पैसे काढणे सोपे करण्यासाठी सरकाने मुद्रा कार्ड देऊ केले आहे.
FAQs
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना काय आहे ?
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत बिगर कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु आणि सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार दिले जाईल. हे लोण 3 प्रकारच्या वर्गीकरणात जोडले जाते ते म्हणजे शिशु , किशोर आणि तरुण श्रेणी.
प्रधानमंत्री मुद्रा कर्जचा परतफेड कालावधी किती असेल ?
प्रधानमंत्री मुद्रा कर्जचा परतफेड कालावधी कर्ज घेतल्यापासून पाच वर्ष हा आहे.
मुद्रा कार्ड म्हणजे काय
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेंतर्गत अर्ज करण्याऱ्या व्यक्तींचे लोण मंजूर झाल्यावर त्यांना एक डेबिट कार्ड दिले जाते. त्याला मुद्रा कार्ड से म्हणतात. या कार्ड च्या साहाय्याने बँक account मध्ये कर्जाची रक्कम जमा झाल्यांनतर मुद्रा कार्ड च्या साहाय्याने तुम्ही पैसे काढू शकतात.
निष्कर्ष
मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना या योजनेची माहिती समजली असेल. या योजनेचे लाभ कसा घ्यायचा त्याचे फायदे काय आहे, यात बिगर कॉर्पोरेट, बिगर कृषी लघु आणि सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार दिले जाईल. हे लोण 3 प्रकारच्या वर्गीकरणात जोडले जाते ते म्हणजे शिशु , किशोर आणि तरुण श्रेणी. या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.
जर तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना | PM MUDRA Loan Scheme या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.