जेष्ठ नागरिक कार्ड – Online Application Process | Senior Citizen Card in Marathi 2023

मित्रांनो तुमच्या घरात 60 वयापेक्षा जास्त वयाचे लोक असतील तर सरकारने त्यांच्यासाठी खूप छान सवलत आणली आहे. ती म्हणजे जेष्ठ नागरिक कार्ड. जर तुमच्या आजी किंवा बाबांना याची कल्पना नसेल तर तुम्ही या article मार्फत त्यांना देऊ शकतात.

जर तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तीनी अजून कार्ड काढले नसेल तर ते तुरंत काढून घ्या. सरकारने यावर भरपूर सुविधा दिल्या आहेत. हे कार्ड तुम्ही घरबसल्या mobile phone वर ही काढू शकतात. ते कसे करायचे याची online process तुम्हाला या article च्या माध्यामातून मिळून जाईल. तसेच त्याचे फायदे, उदेश्य काय आहे याची देखील माहिती तुम्हाला या article मधून मिळून जाईल.

जेष्ठ नागरिक कार्ड काय आहे | Senior Citizen Card in Marathi

हे कार्ड खास वृद्ध लोकांसाठी बनवण्यात आले आहे. Card चा उपयोग करून जेष्ठ नागरिकांना त्यांच्या ओळखीबद्दल सर्व माहिती भेटावी हा याचा महत्त्वाचा उद्देश्य आहे.

Senior Citizen Card म्हणजेच जेष्ठ नागरिक ओळखपत्र म्हणुन ही ओळखले जाते. कार्ड मध्ये जेष्ठ नागरिकांची सर्व माहिती दिलेली असते. जसे की त्यात आपत्कालीन नंबर , blood group, allergy तसेच त्यांची मेडिकल details. कार्ड च्या मदतीने नागरिकांना भरपूर सुविधा भेटतात.

Senior Citizen Card मध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार सोबतच खासगी योजनांची माहिती दिलेली आहे. हे नागरिकांना खूप सार्‍या सवलती देते जसे की कर सवलती, कमी भावात रेल्वे तिकीट, बस तिकीट, विमान तिकीट आणि बैंकिंग मध्ये सुद्धा सुविधा देते.

जेष्ठ नागरिक कार्डचे फायदे | Benefits of Senior Citizen Card in Marathi

आताच आपण जेष्ठ नागरिक कार्ड काय आहे हे समजून घेतले. तर तुम्हाला प्रश्‍न पडला असेल की त्याचा उपयोग कुठे आणि कसा करावा म्हणजेच त्याचे नेमके काय फायदे आहे तर चला समजून घेऊया जेष्ठ नागरिक कार्डचे फायदे काय आहे

प्रवासात सवलत

कार्ड च्या मदतीने तुम्ही खूप सारी बचत करू शकतात. तर तुम्हाला खालील सवलती भेटू शकतात –

Medical सवलत

सरकारी रुग्णालयात मोफत किंवा योग्य सवलतीत सुट व काही खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवेवर सवलत.

विविध सेवेवर सवलत

 • Restaurant मध्ये जेवण
 • उपयुक्तता
 • सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये प्रवेश
 • मालमत्ता कर

प्राधान्य सेवा

 • Bank, सरकारी कार्यालय व इतर सेवांमध्ये प्राधान्य
 • इतरत्र फायदे
 • Pension
 • गृहनिर्माण मदत
 • रोजगार संधी

जेष्ठ नागरिक कार्डचे प्रकार किती आहेत

कार्डचे एकूण 3 प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत-

जेष्ठ नागरिक कार्ड – ज्या नागरिकांचे वय 60 वर्ष ते 80 वर्ष यात आहे त्यांना कार्ड देण्यात येते.

सुपर जेष्ठ नागरिक कार्ड – ज्या नागरिकांचे 80 वर्ष आहे त्यांना सुपर जेष्ठ नागरिक कार्ड देण्यात येते.

निर्दिष्ट जेष्ठ कार्ड – ज्या नागरिकांचे 75 वर्ष पेक्षा जास्त आहे त्यांना निर्दिष्ट जेष्ठ नागरिक कार्ड देण्यात येते.

जेष्ठ नागरिक कार्ड साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

राहण्याचा पुरावा

 • Driving license
 • मतदान कार्ड
 • किंवा तुम्ही महाराष्ट्र चे रहिवासी आहात असे दर्शवणारे पुरावे

वयाचा पुरावा

 • जन्म दाखला
 • पासपोर्ट
 • किंवा तुमची जन्म तारीख दर्शवणारे पुरावे

जेष्ठ नागरिक कार्ड बनवण्यासाठी पात्रता

 • कार्ड बनवण्यासाठी अर्ज दाराचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असले पाहिजे
 • कार्ड बनवण्यासाठी महाराष्ट्रचे रहिवासी असणे आवश्यक आहे

जेष्ठ नागरिक कार्ड बनवण्यासाठी Online Application Process

कार्ड बनवण्यासाठी आपल्याला काही steps follow करायला लागेल. चला बघुया

Step-1

 • सर्वप्रथम आपल्याला आपले सरकार च्या Official Website वर जावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला Registration करावे लागेल. तेथे New User येथे click करा आणि आपले registration करा.
जेष्ठ नागरिक कार्ड

Step- 2

 • Registration केल्यानंतर तुम्हाला login करावे लागेल. त्यासाठी user ID आणि password टाकून तुम्ही login करू शकता.
 • त्यानंतर Webpage च्या डाव्या कडील बाजूला सर्व विभागांची list मिळेल. त्यात महसूल विभाग निवडा हे झाल्यावर उपविभाग मध्ये महसूल सेवा निवडा आणि NEXT वर click करा.

Step-3

 • विभाग अंतर्गत तिथे सर्व सेवा उपलब्ध आहेत. त्यातून जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र या option वर click करा व Next वर click करा.
 • त्यानंतर एक page open होईल त्यावर जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र यावर click करा.
 • त्यानंतर तिथे कोणते कागदपत्रे submit करायचे त्याची माहिती येईल ती खात्री करून पुढे जा.

जेष्ठ नागरिक कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला 3 stages मधून जावी लागेल ते असे-

 • वैयक्तिक माहिती भरणे
 • आवश्यक कागदपत्रे upload करणे
 • Payment भरणे

अशा प्रकारे तुम्ही कार्ड बनवण्यासाठी online apply करू शकतात.

Online apply करून झाल्यानंतर official website वर सात दिवसांमध्ये तुम्हाला Senior Citizen Card download करता येईल.

FAQs

जेष्ठ नागरिक कार्ड बनवण्यासाठी official website कोणती आहे ?

कार्ड बनवण्यासाठी आपले सरकार च्या Official Website वर जावे लागेल.

जेष्ठ नागरिक कार्ड बनवण्यासाठी वयाची मर्यादा काय आहे ?

कार्ड बनवण्यासाठी अर्ज दाराचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. जेष्ठ नागरिक कार्ड काय आहे  याची माहिती समजली असेल. या कार्डचे लाभ कसा घ्यायचा त्याचे फायदे काय आहे, यात जेष्ठ नागरिकांची सर्व माहिती दिलेली असते. जसे की त्यात आपत्कालीन नंबर , blood group, allergy तसेच त्यांची मेडिकल details. कार्ड च्या मदतीने नागरिकांना भरपूर सुविधा भेटतात. या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.

जर तुम्हाला या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment