अग्निपथ योजना काय आहे | ऑनलाइन अर्ज, फायदे, उध्दीष्टे, पगार  काय आहे | Agneepath Scheme in Marathi 2023

मित्रानो आजच्या पोस्ट मध्ये आपण अग्निपथ योजना काय आहे हे बघणार आहोत . पूर्वी सैन्यात ज्याप्रमाणे भरती करण्यात येत होती त्या प्रकारची सर्व भरती रद्द करून नवीन प्रकारे भरती करून देशाचे संरक्षन करण्यासाठी भारत सरकारने अग्निपथ योजना याची घोषणा केली आहे . हि योजना आपले ३ दल म्हणजेच लष्कर ( Army ) , नौदल ( Navy ) , वायुदल ( Air Force ) या साठी राबवण्यात आली आहे. या तिन्ही दलांमध्ये भरती करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गंत देशाच्या सैन्यात भरती होणाऱ्या सैनिकांना अग्नीवर असे म्हणतात.

अग्निपथ योजना या योजनेच्या मध्ये नवीन selection करण्यात येणाऱ्या सैन्याना म्हणजेच अग्निविराना ४ वर्षे सैन्य दलामध्ये सेवा करता येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत देशांतील तरुणांना किती पगार देणार आहे , भारतीय तरुणांना या योजनेचा काय फायदा व उद्दीष्टे काय आहे हे आपण आज या पोस्ट मध्ये बघणार आहेत चला तर बघूया अग्निपथ योजना काय आहे । ऑनलाइन अर्ज ,फायदे ,उध्दीष्टे , पगार काय आहे । Agneepath Scheme in marathi २०२३.

अग्निपथ योजना काय आहे

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १४ मे रोजी २०२२ ला यांच्या हस्ते अग्निपथ योजना लागू झाली आहे. देशाच्या तिन्ही सशस्त्र दलात भारत देशाची संरक्षण करण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी या योजनेच्या अंतर्गत ४६ हजार तरुण हे लष्करी भरतीत शामिल होतात. देशाच्या सैन्यात भरती होणाऱ्या सैनिकांना म्हणजेच अग्नीवर याना ४ वर्षे सैनिक म्हणून दलामध्ये आपली सेवा रुजू करण्यात येते.

४ वर्षात सामील झालेल्या तरुणांपैकी २५% तरुणांना नियमित लष्कर मध्ये सामील करण्यात येते आणि उरलेल्या ७५% तरुणांना निवृत्त करण्यात येते. यात निवृत्त झालेल्या तरुणांना प्रत्येकाला ११ लाख ७१ हजार रुपये देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर या तरुणांना संरक्षण क्षेत्र मध्ये प्राधान्य देण्यात येते. ४ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर या तरुणांना समाजात प्रगतिशील जगात येते वेगवेगळ्या नोकरती मध्ये त्यांना कार्य करता येतील. हि योजना देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांना हा एक उत्तम मार्ग प्रदान करण्यात आला आहे . अग्निपथ योजना हि लष्करी profile वाढवण्यास मदत करते.

अग्निपथ योजना याच्या अंतर्गत काम करू इच्छिणाऱ्या सेवकांना वयाची मर्यादा १७.५ ते २१ वर्षे इतकी आहे. कोरोना काळात सर्व गोष्टी बंद असल्यामुळे लष्करात कोणतीही भरती झाली नव्हती त्यामुळे त्या काळात वयोमर्यादा हि २३ वर्षे केली गेली होती. त्याच्या पुढच्या वर्षांपासून या योजनेची वयोमर्यादा हि २१ वर्षे पर्यंत असणार आहे.

अग्निपथ योजनेचे उध्दीष्टे काय आहे | Objectives of Agneepath Scheme in Marathi

१४ मे रोजी २०२२ ला अग्निपथ योजना लागू झाली आहे. देशाच्या तिन्ही सशस्त्र दलात भारत देशाची संरक्षण करण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत उद्धीष्ट्ये हे पुढीलप्रमाणे –

  • सशस्त्र दलांमध्ये अग्निपथ योजना हि लष्करी profile वाढवण्यास मदत करते.
  • समाजातील तरुणांना प्रगतिशील मार्ग दाखवण्यास दिशा दाखवते.
  • राष्ट्र सेवेसाठी इच्छुक असणाऱ्या लोकांना संधी मिळते.
  • अग्निपथ योजना मध्ये तरुणांना टीम वर्क ची समज येते.

अग्निपथ योजनेचे फायदे काय आहे | Benefits of Agneepath Scheme in Marathi

  • अग्निपथ योजनेच्या अंतर्गत सामील होणाऱ्या माणसांना ३०००० रुपये रक्कम देण्यात येते. त्यापैकी ९००० रुपये म्हणजेच ३०% रक्कम हि कॉर्पस फंड साठी कापली जाईल. २१००० रुपये म्हणून पगार देण्यात येईल.
  • दुसऱ्या वर्षी अग्नीवर ला ३३००० रुपये देण्यात येतील त्यापैकी ९९०० हे कॉर्पस फंड साठी कापली जाईल. २३१०० रुपये म्हणून पगार देण्यात येईल.
  • तिसऱ्या वर्षी अग्नीवर ला ३६५०० रुपये देण्यात येतील त्यापैकी १०९५० हे कॉर्पस फंड साठी कापली जाईल. २५५८० रुपये म्हणून पगार देण्यात येईल.
  • चौथ्या वर्षी अग्नीवर ला ४०००० रुपये देण्यात येतील त्यापैकी १२००० हे कॉर्पस फंड साठी कापली जाईल. २८००० रुपये म्हणून पगार देण्यात येईल.

अग्निपथ योजनेचा पगार काय आहे | Salary of Agneepath Scheme in Marathi

अग्निपथ हि योजना देशातील जे तरुण आपल्या देश साठी त्यांची सेवा रुजू करू इच्छित असतील त्यांच्या साठी अगदी उत्तम मार्ग आहे. या योजनेत सरकार त्यांना काय पगार देईल चला तर बघूया अग्निपथ योजनेचा पगार काय आहे | Salary of Agneepath Scheme in Marathi

वर्ष Package (Monthly)In-hand (७०%) जमाअग्निवीर कॉर्पस फंड साठी योगदान (३०%)GOI (Government of India) द्वारे कॉर्पस फंड साठी योगदान
पहिले वर्ष300002100090009000
दुसरे वर्ष330002310099009900
तिसरे वर्ष36500255801095010950
चौथे वर्ष40000280001200012000
चार वर्षांनंतर अग्निवीर कॉर्पस फंड साठी एकूण योगदान  5.02 लाख रुपये5.02 लाख रुपये
४ वर्षांनंतर सेवा निधी Package म्हणून 11.70 लाख रुपये (हि रक्कम करमुक्त असणार आहे) 

एवढेच नव्हे तर अग्निपथ योजनेत अग्नीवर याना ४८ लाख रुपयांचा विमा देण्यात येईल . जर अग्नीवर देशाची सेवा करत असताना दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर तया योजने अंतर्गत त्याच्या कुटुंबाला १ कोटी रुपये देण्यात येणार आहे.

अग्निपथ भरतीसाठी कुठे अर्ज करावा। Where to Apply for Agneepath Recruitment in Marathi

तरुणांना अग्निपथ योजनेसाठी online अर्ज करण्यासाठी प्रक्रिया वेगवेगळ्या भागांमध्ये स्वतंत्रपणे पूर्ण केली जाईल. अग्निपथ भरतीसाठी अर्ज करण्यासाठी भारतीय लष्कराच्या Official Website वर जाऊन पूर्ण करता येईल. तरुणांना भारतीय लष्कराचे तिन्ही दल म्हणजेच लष्कर (Army) , नौदल (Navy), वायुदल (Air Force) यांच्या Official Website वर जाऊन अर्जाची नोंद करता येईल. जे कि पुढीलप्रमाणे –

लष्कर ( Army ) –  https://joinindianarmy.nic.in/

नौदल ( Navy ) https://www.indiannavy.nic.in/

वायुदल ( Air Force )https://indianairforce.nic.in/

अग्निपथ योजना महत्त्वाचे कागदपत्रे | Agneepath Yojana Important Documents in Marathi

  • आधार कार्ड ( Aadhar Card )
  • पॅन कार्ड ( PAN card )
  • पासपोर्ट आकाराचा फोटो ( Passport size photograph )
  • मोबाईल नम्बर ( mobile number )
  • बँक खाते तपशील ( Bank account details )
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र ( Educational Qualification Certificate )
  • निवास प्रमाणपत्र ( Residence Certificate )

अग्निपथ योजना शैक्षणिक पात्रता | Educational Qualification of Agneepath Yojana in Marathi

अग्नीवर पदपात्रतावयपात्रताशिक्षण
Agniveer ( Technical All Arms – तांत्रिक सर्व शस्त्रे )17.5 ते 21 वर्षेPCM – ( Physics, Chemistry, Maths ) विषयात किमान ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण
Agniveer ( Techincial Aviation & Ammunition Examiner – तांत्रिक विमानचालन आणि दारुगोळा परीक्षक )17.5 ते 21 वर्षेPCM विषयात किमान 50% गुणांसह बारावी उत्तीर्ण
Agniveer ( General Duty All Arms – जनरल ड्युटी सर्व शस्त्रे )17.5 ते 21 वर्षे 10 वी किमान 33% गुणांसह उत्तीर्ण
Agniveer Tradesmen (All Arms) 17.5 ते 21 वर्षे 10 वी उत्तीर्ण, प्रत्येक विषयात किमान 33% गुणांसह उत्तीर्ण
Agniveer Tradesmen (All Arms)17.5 ते 21 वर्षे8 वी उत्तीर्ण प्रत्येक विषयात किमान 33% गुणांसह उत्तीर्ण
Agniveer Clerk/Store keeper17.5 ते 21 वर्षे12 वी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण

अग्निपथ योजना शारीरिक पात्रता | Physical Eligibility of Agneepath Yojana in Marathi

शारीरिक पात्रता उंची ( Height )वजन ( Weight )
महिला ( Female )152 cmउंचीनुसार ( According to height )
पुरुष ( Male )157 cmउंचीनुसार ( According to height )

FAQs

अग्निपथ योजना काय आहे ?

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १४ मे रोजी २०२२ ला यांच्या हस्ते अग्निपथ योजना लागू झाली आहे. देशाच्या तिन्ही सशस्त्र दलात भारत देशाची संरक्षण करण्यासाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

अग्निपथ योजना महिलांसाठी खुली होण्याची शक्यता आहे का ?

अग्निवीर योजनेंतर्गत सशस्त्र दलामध्ये भविष्यात महिलांना सामील होण्यासाठी जुन्या पद्धतीने सामावून घेतले जाईल

अग्निपथ भरतीसाठी कुठे अर्ज करावा ?

लष्कर ( Army ) –  https://joinindianarmy.nic.in/
नौदल ( Navy ) https://www.indiannavy.nic.in/
वायुदल ( Air Force )https://indianairforce.nic.in/

Conclusion

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. अग्निपथ योजना काय आहे   या योजनेची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.

जर तुम्हाला अग्निपथ योजना काय आहे | ऑनलाइन अर्ज , फायदे ,उध्दीष्टे , पगार  काय आहे | Agneepath Scheme in Marathi २०२३   या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment