2019 मध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यात खूप लोक हे बेवारस झाले होते. त्यात खूप कुटुंब नाहीसे झाले होते. एक किंवा दोन्ही पालक गमावल्यामुळे पाल्य हे अनाथ झाले तसेच महिला विधवा झाल्या यांना आधार मिळावा म्हणुन सरकारने मिशन वात्सल्य योजना राबवली आहे. अनाथ बालकांचे शैक्षणिक शुल्क सरकारने माफ केले.
अनाथ मूल किंवा विधवा बायका यांच्या कुटुंबियांना स्वतः भेट देऊन त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सरकारने सोडवत शासनामार्फत राबवलेल्या योजनांचा लाभ त्यांना करून दिला असून “शासन आपल्या दारी” या संकल्पनेचा विचार करून मिशन वात्सल्य योजना सरकारने राबवली आहे. आजच्या ह्या article मध्ये मिशन वात्सल्य योजना | उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, फायदे, काय आहे | Mission Vatsalya Yojana in Marathi 2023 याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत.
मिशन वात्सल्य योजना | Mission Vatsalya Yojana in Marathi
फेब्रुवारी 2022 मध्ये आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात मिशन वात्सल्य योजना ह्या योजनेची घोषणा केली. तर ह्या योजनेची देखभाल घेण्याची जबाबदारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ह्यांच्याकडे सरकारने सोपवली आहे.
भारत सरकारने सुरू केलेली मिशन वात्सल्य योजना ही महिला आणि बालकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही एक सामाजिक कल्याण योजना आहे जी विधवा माता आणि त्यांच्या मुलांना धोरणात्मक, आर्थिक आणि शैक्षणिक सहाय्य प्रदान करते.
मिशन वात्सल्य योजनेच्या अंतर्गत विधवा माता आणि त्यांच्या मुलांना आर्थिक मदत, शिक्षण सुविधा, आरोग्य संरक्षण आणि मुलांच्या विकासासाठी इतर सुविधा त्या निराधार नागरिकांना मिळू शकतात. ही योजना खास अशा मुलांसाठी आहे ज्यांच्या पालकांचे दुर्दैवाने निधन झाले आहेत किंवा त्यांचे पती/वडील यांचा मृत्यू झाला आहे. याची खात्री करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे या मुलांना योग्य काळजी, शिक्षण आणि प्रेम मिळावे जेणेकरून ते त्यांचे भविष्य समृद्ध आणि समान संधींसह घडवू शकतील व त्यांचा सर्वांगीण विकास होईल.
मिशन वात्सल्य योजनेची पार्श्वभूमी | History Of Mission Vatsalya Yojana in Marathi
- महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 2009-2010 रोजी पासून बाल संरक्षणासाठी 3 योजना सुरू करण्यात आल्या आहे. त्या खालीलप्रमाणे –
- बाल न्याय कार्यक्रम – मुलांच्या संरक्षणा साठी आणि कायद्याच्या विरोधातील बालकांसाठी बाल न्याय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
- एकात्मिक कार्यक्रम – रस्त्यावरील मुलांना सांभाळण्यासाठी एकात्मिक कार्यक्रम राबविण्यात आला आहे.
- बालगृह सहाय्य योजना – लहान मुलांच्या निवासाची व्यवस्था करणे व मदत करणे.
- 2010 मध्ये वरील तिन्ही योजनेचे एकत्रीकरण करून “एकात्मिक बाल संरक्षण” या योजनेत समाविष्ट करण्यात आले.
- 2017 मध्ये त्यांचे नाव बदलून “बाल संरक्षण सेवा” असे करण्यात आले.
- त्यानंतर 2021 ही योजना “मिशन वात्सल्य” म्हणून पुढे राबवण्यात आली.
Why in News
बलात्काराला बळी पडलेल्या अल्पवयीन मुली ह्या गर्भवती राहिल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सोडून देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने मिशन वात्सल्य या योजनेअंतर्गत एक नवीन मदत योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारने बलात्कार पीडित, गर्भवती असलेल्या महिलांना वैद्यकीय आणि आर्थिक मदत देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विशेष योजना जाहीर केली.
मिशन वात्सल्य सुरू केलेल्या नवीन योजनेबद्दल नियम | Guidelines about new schemed launched in Mission vatsalya in Marathi
- मिशन वात्सल्य या योजने अंतर्गत अन्न, दैनंदिन गरज, निवारा तसेच कोर्ट सुनावणीसाठी वाहतूक आणि त्यांच्या कुटुंबियांनी सोडून दिलेल्या अल्पवयीन मुलींना कायदेशीर मदत करणे हा मुख्य उद्देश आहे.
- सक्तीच्या गर्भधारण झालेल्या स्त्रियांना आर्थिक मदतीचा साथ देणे.
- पीडितग्रस्त असलेल्या स्त्रियांना स्वतःचे समर्थन करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे.
- पीडितांना स्वतः च्या आश्रयासाठी निवारा उभारणी साठी मदत मिळणार.
- मिशन वात्सल्य नवीन योजने अंतर्गत पीडित मुलींना एकात्मिक आधार आणि मदत करणे ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो-
- शिक्षणात प्रवेश ( Acees to Education )
- पोलीस मदत ( Police Support )
- नवजात, प्रसूती आणि अर्भक काळजी यांसोबत आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देणे.
- मानसिक आणि कायदेशीर मदत देणे.
मिशन वात्सल्य योजनेचे उद्दिष्टे | Objectives of Mission Vatsalya Yojana in Marathi
मिशन वात्सल्य योजनेचे उद्दिष्टे पुढीलप्रमाणे येतात.
- Covid – 19 मुळे आईवडिलांचे निधन झाले असे बालक व विधवा महिला यांच्या सर्वांगीण विकास व्हावा हा मिशन वात्सल्य योजना या योजनेचा प्रमुख उद्देश्य आहे.
- या योजनेअंतर्गत विधवा मातांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
- मिशन वात्सल्य योजनेद्वारे, विधवा माता त्यांच्या मुलांसाठी आरोग्य सुरक्षा आणि उच्च शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
- या योजनेद्वारे विधवा माता ह्या आर्थिक आधारावर कर्ज किंवा वीज अनुदानासाठी पात्र होऊ शकता.
- या योजनेंतर्गत विधवा मातांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
मिशन वात्सल्य योजना Key Highlights in Marathi
योजना | मिशन वात्सल्य योजना |
---|---|
व्दारा सुरु | भारत सरकार |
Official Website | https://wcd.nic.in/ |
लाभार्थी | Covid – 19 मुळे आईवडिलांचे निधन झाले असे बालक व विधवा महिला |
विभाग | महिला आणि बाल विकास मंत्रालय |
उद्देश्य | मिशन वात्सल्य योजनेद्वारे, विधवा माता त्यांच्या मुलांसाठी आरोग्य सुरक्षा आणि उच्च शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. |
योजना सुरु | 2022 |
बजेट | 900 कोटी |
श्रेणी | केंद्र/राज्य सरकारी योजना |
मिशन वात्सल्य योजनेचे फायदे | Benefits of Mission Vatsalya Yojana in Marathi
- मिशन वात्सल्य योजने अंतर्गत लाभार्थ्यांना राज्यातील 18 योजनांचे लाभ घेता येणार आहे.
- या योजने अंतर्गत मुख्य म्हणजे ग्रामीण आणि अल्प उत्पन्न गटातील विधवांचा समाविष्ट आहे.
- ही योजना राज्यामधील कठीण काळात पति गमावलेल्या महिलांच्या आणि अनाथ बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात आली आहे.
- या योजने अंतर्गत महिला व बालकांना सर्वांगीण विकास होणार आहे.
मिशन वात्सल्य योजनेचे वैशिष्ट्ये | Features of Mission Vatsalya Yojana in Marathi
आर्थिक सहाय्य: मिशन वात्सल्य योजना ही विधवांना आर्थिक मदत करते. या अंतर्गत विधवांना आर्थिक मदत, रेशन, घर या सुविधा मिळतात. हे महिलांना आर्थिक स्थैर्य देते आणि त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाची आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यवस्था करण्यास मदत करते.
शिक्षणाची सुविधा: मिशन वात्सल्य योजनेचा उद्देश मुलांसाठी शैक्षणिक व्यवस्था मजबूत करणे हा आहे. या योजनेच्या अंतर्गत विधवांच्या मुलांना आर्थिक मदत आणि शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे त्यांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी मिळते, ज्यामुळे त्यांचे भविष्य सक्षम होण्यास मदत होते.
आरोग्य आणि विकासात्मक सुविधा: मिशन वात्सल्य या योजनेअंतर्गत, विधवांना औषधे, नियमित आरोग्य तपासणी आणि विकासात्मक सुविधा देखील पुरविल्या जातात. हे विधवा आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य आणि त्यांचा सर्वांगीण विकास
मिशन वात्सल्य योजना: विधवा आणि त्यांच्या मुलांना मदत करण्यासाठी एक प्रगतीशील पाऊल आहे.
मिशन वात्सल्य योजनेचे कागदपत्रे |Documents for Mission vatsalya yojana in marathi
- आधार कार्ड ( Aadhar Card )
- PAN Card ( पॅनकार्ड )
- मोबाइल नंबर ( Mobile Number)
- शिधापत्रिकेची कॉपी
- ईमेल आयडी ( E-mail ID )
- ओळख पत्र ( Identity Card )
- पत्ता प्रमाणपत्र ( Proof Address )
- जातीचा दाखला ( Cast Certificate )
मिशन वात्सल्य योजना guidelines
मिशन वात्सल्य योजना guidelines download करण्यासाठी खाली दिलेल्या steps follow करा.
Step 1:
- मिशन वात्सल्य योजना guidelines साठी सर्वप्रथम official website वर जावे.
- तेथे तुमच्या समोर Home Page येईल.
Step 2:
- Home Page वर तुम्हाला menu मधील Schemes and guidelines विभागावर क्लिक करा.
- तेथे तुम्हाला मिशन वात्सल्य दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला Guidelines PDF दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्या लिंक वर क्लिक करताच तुम्हाला मिशन वात्सल्य योजना guidelines pdf open होईल जे तुम्ही download ही करू शकता.
थोडक्यात, मिशन वात्सल्य या योजनेंतर्गत विधवा मातांना त्यांच्या मुलांचे संगोपन करता यावे म्हणून त्यांना आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय त्यांना शिक्षण, आरोग्य आणि पोषणाच्या सुविधाही मिळतात. या योजनेअंतर्गत विधवा मातांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कर्ज, अनुदान आणि इतर आर्थिक सुविधाही मिळू शकतात.
FAQs
मिशन वात्सल्य योजनेचे उद्दिष्टे काय आहे?
आईवडिलांचे निधन झाले असे बालक व विधवा महिला यांच्या सर्वांगीण विकास व्हावा हा मिशन वात्सल्य योजना या योजनेचा प्रमुख उद्देश्य आहे.
मिशन वात्सल्य योजनेची Official Website काय आहे?
https://wcd.nic.in/ ही मिशन वात्सल्य योजनेची Official Website आहे.
मिशन वात्सल्य योजना सरकारने कोणाकडे सोपवली आहे?
मिशन वात्सल्य योजना सरकारने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय कडे सोपवली आहे.
निष्कर्ष
मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. मिशन वात्सल्य या योजनेची माहिती समजली असेल. या योजनेचे लाभ कसा घ्यायचा त्याचे उद्दिष्टे काय आहे नोंदणी कसे करायचे. त्यात विधवा मातांना त्यांच्या मुलांचे संगोपन करता यावे म्हणून त्यांना आर्थिक मदत दिली जाते. देण्यात येणार आहे. या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.
जर तुम्हाला मिशन वात्सल्य योजना 2023|उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, फायदे, काय आहे | Mission Vatsalya Yojana in Marathi 2023 या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.