भारत सरकार नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरु करत असते. कोरोना नंतर सरकारने गरीब लोकांसाठी गरीब कल्याण पैकेज ची घोषणा केली होती यात सरकारने नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या होत्या. आजकाल शहरी भागात कोणतीही सुविधा लवकर उपलब्ध होते परंतु ग्रामीण भागातील लोकांना अजून हि त्रास सहन करावा लागतो.
यावेळी सरकाने महिलांसाठी आर्थिक दृष्ट्या विचार करून विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ची अंबलबजावणी केली. या योजनेच्या अंतर्गत 18 वर्षांपुढील महिलांना एक सिलेंडर फ्री देण्यात येईल. भारतात जनसंख्या अधिक आहेत त्या भागांमध्ये LPG ची आवश्यकता भासते, त्या भागातील महिला अजून हि गॅस पासून वंचित आहेत.
देशातील महिलांना त्यांच्या विकासासाठी हातभार म्हणून सरकार महिलांना योजने अंतर्गत फ्री सिलेंडर वाटप केले आहे. त्यासाठी चला तर समजून घेऊया कि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे, लाभ पात्रता काय आहे, आणि या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करवा याची सर्व माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळून जाईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे?
1 मे 2016 रोजी माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेष येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना याची घोषणा केली होती. या योजनेचा मुख्य उद्धेश हा ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वच्छ अन्न घ्यावे, LPG गॅस नसल्या कारणाने तेथील स्रिया स्वयंपाकासाठी लाकडे आणि कोळसा वापरतात त्यामुळे तेथील महिलांना गंभीर आजार होतात, आणि त्या आजारांवर औषोधोपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याकारणाने ते मृत्यू चे कारण होतात.
तेथील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील लोंकाना गंभीर आजारापासून वाचवण्यासाठी सरकारने योजना काढली आहे. हि योजना 2016-17 च्या आर्थिक वर्षात काढण्यात आली होती आणि हि सुविधा 3 वर्षापर्यंत होती. परंतु कोरोना सारख्या महासंसर्गामुळे जनतेची आर्थिक स्थिती वाईट झाली होती, याचा विचार करून या योजनेची सुविधा वाढवण्यात आली आहे.
कॅबिनेट च्या बैठकी नंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना च्या अंतर्गत लाभार्थ्यांसाठी सबसिडी ammount हि 2०० होती तर ती 3०० रुपये प्रति सिलेंडर केली आहे. या योजनेत 3200 रुपये हे गॅस agency ला दिले जातात. त्यात 1600 रुपये हे केंद्र सरकार द्वारा दिले जातात, आणि 1600 रुपये हे तेल कंपनी कडून दिले जातात. जेणेकरून नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2025
योजनेचे नाव | प्रधानमंत्री उज्ज्वला योजना |
सुरुवात | 1 मे 2016 |
कोणी सुरु केली | श्री नरेंद्र मोदी |
उद्धेश | फ्री गॅस connection उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | 18 वर्षांपुढील महिला |
Official Website | https://pmuy.gov.in/ |
Helpline Number | 18002666696 |
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभ
- महिलांना मिळणार फ्री गॅस Connection
- ग्रामीण भागातील प्रदूषण कमी करणे हा मुख्य हेतू आहे.
- महिला सशक्तीकरणाला वाव मिळेल.
- PM Ujjwala Yojana मध्ये सबसिडी 200 हुन 300 करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पात्रता
PM Ujjwala Yojana मध्ये अर्ज करण्यासाठी खाली दिलेली पात्रता आवश्यक आहे.
- अर्जदाराचे (केवळ महिला) वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- अर्ज करणाऱ्याच्या त्याच घरातील कोणत्याही OMC कडून इतर कोणतेही LPG Connection नसावे.
- अर्ज करणारी महिला हि BPL च्या परिवारातील असावी.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जन-धन बँक खात्याचे नंबर
- पंचायत अधिकारी / नगर पालिका यांनी प्रमाणित केलेले बीपीएल प्रमाणपत्र (BPL Certificate )
- BPL रेशनकार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- कुटुंबाच्या स्थितीला आधार देण्यासाठी पूरक KYC
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अर्ज कसा करावा
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या गॅस agency मध्ये जावे. तिथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फ्री गॅस Connection मध्ये अर्ज करण्यासाठी फॉर्म घ्यावा आणि त्यात विचारली सर्व माहिती बरोबर भरून फॉर्म जमा करून दयावा. फॉर्म जमा करताना ते काही कागदपत्रे विचारतील ते त्या सोबत जमा करावे अश्या प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मध्ये अर्ज करू शकतात.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हेल्पलाइन नंबर
PM Ujjwala Yojana मध्ये कोणत्याही प्रकाराची चौकशी करण्यासाठी किंवा नवीन माहिती जाणून घेण्यासाठी सरकारने हेल्पलाईन नंबर दिला आहे तो-
- 18002666696
FAQs
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभ काय आहे
महिलांना मिळणार फ्री गॅस Connection
ग्रामीण भागातील प्रदूषण कमी करणे हा मुख्य हेतू आहे.
महिला सशक्तीकरणाला वाव मिळेल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मध्ये सबसिडी 200 हुन 300 करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हेल्पलाइन नंबर
18002666696
निष्कर्ष
मित्रांनो, पारंपारिक इंधन (कोळसा, लाकूड, गोवळा) वापरणाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. उज्ज्वला योजनेमुळे महिलांना सुरक्षित आणि स्वच्छ इंधन मिळाले आहे, ज्यामुळे श्वसन रोगांमध्ये घट झालेली आहे.
सरकार कनेक्शनसाठी प्रारंभिक शुल्क प्रदान करते, जे गरीब कुटुंबांसाठी खूप मदतकारक ठरते. यामुळे इंधन खरेदी सुलभ होते. गॅस चुल्ह्यामुळे महिलांचा वेळ वाचतो आणि ते घराच्या इतर कामांसाठी वापरू शकतात. यामुळे त्यांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त बनवण्यास मदत मिळाली आहे.
एलपीजी गॅस वापरणे पर्यावरणासाठी अनुकूल आहे, कारण यामुळे धुराचे उत्सर्जन कमी होते आणि जंगलांची तोड थांबते. या योजनेअंतर्गत 2016 पासून लाखो कुटुंबांना एलपीजी कनेक्शन मिळाले आहेत, ज्यामुळे या योजनेने समाजात मोठे परिवर्तन घडवले आहे.