मित्रांनो आज आपण आपल्या आरोग्याशी निगडित एक महत्त्वाची योजना बघणार आहोत. या योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे आहे. महाराष्ट्र सरकार जनतेसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. त्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्वपूर्ण आरोग्य योजना आहे.
ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे लोक तसेच अत्यंत गरजेच्या वेळी सर्वसामान्य लोकांना मदत करणारी आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी नेमकी काय आहे त्याचे लाभ पात्रता काय आहे.
ह्या योजनेत नाव नोंदणी कशा प्रकारे केली जाते हे सर्व आज आपण यात बघणार आहोत तर आमचा हा article महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना काय आहे? महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी, लाभ, पात्रता काय आहे , शेवटपर्यंत वाचा.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना काय आहे?
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी काय आहे ह्याची माहिती खाली दिली आहे.
उद्देश आणि लक्ष्य
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही योजना काढण्याचे महत्व म्हणजे की आर्थिक स्थिति कमी असलेल्या लोकांना चांगली आणि मोफत वैद्यकीय सेवा देने. जेणेकरून ते आपले आरोग्य सुधारू शकतील.
सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने जीवनदायी ही योजना सुरू केली त्यात त्यांनी फक्त गंभीर आजारांवर खर्च देण्याचा दावा केला होता. ह्या योजनेत बदल करून त्यांनी राजीव गांधी जीवनदायी योजना या नावाने ओळखली जाऊ लागली.
2 जुलै 2012 पासून ही योजना 8 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली. ही योजने अंतर्गत ठाणे, मुंबई , धुळे, नांदेड, सोलापूर, अमरावती, गडचिरोली, रायगड हे जिल्हे समाविष्ट होते. या योजने मध्ये बदल करून 971 प्रकारच्या विविध शस्त्रक्रिया व थेरपी यांचा समावेश केला गेला.
या योजनेत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने ही योजना संपूर्ण राज्यात म्हणजेच 35 जिल्ह्यांमध्ये राबवण्याची घोषणा केली. त्यानंतर 1 एप्रिल 2017 पासून राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू ठेवण्याचा सरकारने घोषणा केली. या ही योजना सुरळीत चालवावी म्हणून सरकारने call Centre ची सुविधा उपलब्ध केली.
नागरिकांसाठी 24 तास call Centre ची सेवा ठेवली गेली. आजारी व्यक्ती हॉस्पिटल मध्ये उपचार घेतांना व हॉस्पिटलमधून घरी जाताना तसेच रोगाबद्दल नंतर डॉक्टर चा सल्ला घेण्यासाठी या सुविधेचा उपयोग करता येणार आहे. या योजनेत आजाराच्या उपचारासाठी कुटुंबातील लोकांसाठी वार्षिक विमा संरक्षण देण्यात आले आहे.
23 डिसेंबर 2018 पासून आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची विमा योजना आहे तर सदर योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हिच्या सोबत एकत्रीत सुरू करण्यात आली आहे. पूर्वी या योजनेअंतर्गत कुटुंबाला वार्षिक 1.50 लाख रुपयांचा विमा मिळत होता नंतर तो वाढवून 2 लाख रुपये करण्यात आला होता. किडनी ट्रांसप्लांट साठी 2.5 लाख रुपये होते तर ते वाढवून 3 लाख करण्यात आले.
आता नुकतेच सरकारने या योजनेत बदल करून राज्यातील सर्व रेशनकार्ड धारक व domicile असणार्या सर्व व्यक्तिंना ही योजना लागू होणार आहे. राज्यातील सर्व नागरिकांना एक आरोग्य कवच प्राप्त होणार आहे. योजनेअंतर्गत कुटुंबाला वार्षिक 1.50 लाख रुपयांचा विमा मिळत होता तर 5 लाख रुपये करण्यात आला आहे हा निर्णय 28 जुन 2023 रोजी Mantri मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना 2025
योजना | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना |
योजना आरंभ | 1 एप्रिल 2017 |
द्वारा सुरु | महाराष्ट्र सरकार |
Official Website | jeevandayee.gov.in |
उद्देश्य | आर्थिक स्थिति कमी असलेल्या लोकांना चांगली आणि मोफत वैद्यकीय सेवा देने |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महाराष्ट्र आरोग्य हमी सोसायटी |
हेल्पलाईन नंबर | 155388 1800 233 2200 |
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लाभ
महाराष्ट्र राज्यात या योजनेत यापूर्वी केशरी कार्ड व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ घेता येत होता. मात्र, यापुढे राज्यातील सर्व नागरिकांना एक आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे.
त्यात महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य या योजनेचे एकत्रीकरण करून काही बदल करून योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रत्येक कुटुंब दर वर्ष 5 लाख रूपये देण्यात येणार आहे. तसेच आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रत्येक कुटुंब दर वर्ष 5 लाख रूपये एवढे करण्यात आले आहे.
किडनी शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचारादरम्यान खर्च प्रत्येक रुग्णाला 2.5 लाख एवढे आहे. ते आता 4.5 लाख रूपये एवढे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना पात्रता
- आर्थिकदृष्टय़ा कमजोर असलेल्या गरीब कुटुंब ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये पेक्षा कमी हवे.
- अर्जदार हा महाराष्ट्र चा रहिवासी असावा.
- महाराष्ट्र राज्यातील संकटग्रस्त असलेले कुटुंब व त्यातील सदस्य या योजनेसाठी प्राप्त आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेला लागणारे कागदपत्रे
- पॅनकार्ड
- मतदान कार्ड
- आधार कार्ड
- बॅंकेचे पासबूक
- रेशन कार्ड
- मेडिकल सर्टिफिकेट
- उत्पन्नाचा दाखला
- वाहन चालक परवाना
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला पांढरा शिधापत्रिका आणि 7/12 उतारा
- आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सरकारने निर्धारित केलेले ओळखपत्र
महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी कशी करावी ?
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी हॉस्पिटल मध्ये आरोग्य मित्र असतात. हॉस्पिटल मध्ये उपचार करताना ते मदतही करतात. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी www.jeevandayee.gov.in या वेबसाइट वर जाऊन नाव नोंदणी करावी लागते.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हेल्पलाइन नंबर
या article मध्ये तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याचे सर्व माहिती दिली गेली आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबर वर फोन करू शकता.
- 155388
- 1800 233 2200
FAQs
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना उद्देश काय आहे ?
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही योजना काढण्याचे महत्व म्हणजे की आर्थिक स्थिति कमी असलेल्या लोकांना चांगली आणि मोफत वैद्यकीय सेवा देने. जेणेकरून ते आपले आरोग्य सुधारू शकतील.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लाभ काय आहे ?
महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रत्येक कुटुंब दर वर्ष 5 लाख रूपये देणार आहे. किडनी शस्त्रक्रियेसाठी 4.5 लाख रूपये देणार आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हेल्पलाइन नंबर काय आहे ?
155388
1800 233 2200
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ऑफिसिअल वेबसाइट काय आहे
https://www.jeevandayee.gov.in/ या या वेबसाइट वर जाऊन नाव नोंदणी करू शकतात.
निष्कर्ष
मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी या योजनेची माहिती समजली असेल. या योजनेचे लाभ कसा घ्यायचा त्याचे नाव नोंदणी कसे करायचे त्यात अर्जदाराला दर वर्ष 5 लाख रूपये देण्यात येणार आहे. या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.
जर तुम्हाला महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.
अजुन लेख वाचा