मेरा युवा भारत | देशातील तरुण घेणार आता उंच भरारी | Mera Yuva Bharat- MY Bharat in Marathi 2023

आपले सरकार देशातील युवापिढींसाठी अनेक नवीन मार्ग काढत असतात जेणे करून नवीन पिढीला त्याचा फायदा होईल. देशातील तरुण वर्गाला सक्षम बनवण्यासाठी आणि सामर्थ्य देण्यासाठी भारत सरकारने मेरा युवा भारत हि संघटना स्थापन केली. युवा विकास करण्यासाठी technology चा उपयोग करून अत्यंत महत्त्वपूर्ण सर्व समावेशक संघटना म्हणून हा मंच काम करण्यात येणार आहे . सरकारचा महत्वाचा हेतू म्हणजे कि या MY Bharat portal मुळे युवा पिढीच्या मदतीने देश विकसित होण्यास मदत होईल.
आजच्या ह्या आर्टिकल मध्ये आपण मेरा युवा भारत काय आहे, उद्देश, त्याचे फायदे, पात्रता काय आहे याची सर्व माहिती बघणार आहोत.

मेरा युवा भारत काय आहे | Mera Yuva Bharat- MY Bharat in Marathi

31 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्लीमध्ये झालेल्या मेरी माटी मेरा देश-अमृत कलश यात्रेचा समारोप च्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘मेरा युवा भारत पोर्टल’ Launch करण्यात आले. या वेळीही नरेंद्र मोदींनी virtually MY Bharat portal launch केले. या संघटनेच्या माध्यमातून सरकार युवकांच्या विकासासाठी पाऊल उचलणार आहे. तरुणांच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणणे तसेच सरकार आणि नागरिक यांच्यातील एक युवा सेतू म्हणून तरुणांनी काम करावे.

MY Bharat संघटनेच्या माध्यमातून नवीन पिढीला स्वतःचा विकास आणि देशाच्या विकास उभारणीसाठी सुद्धा प्रोत्सहन देता येईल. देशातील युवांसाठी हि खूप महत्वाची संधी आहे, जेणे करून ते आपले कौशल्य जगासमोर दाखवतील व सरकार आणि नागरिकांमधील दुआ म्हणून त्यांचे महत्वाचे योगदान देण्यात येईल. देशातील कोट्यवधी तरुणांनी यात सहभागी व्हावे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ये पोर्टल सुरु करण्यात येणार आहे.

मेरा युवा भारतचे उद्धेश

मेरा युवा भारत काय आहे हे आपण समजून घेतले, पण हे पोर्टल काढण्यामागचा सरकारचा महत्वाचा उद्धेश काय आहे, चला तर बघूया मेरा युवा भारतचे उद्धेश

  • तरुणांमध्ये अनुभवात्मक शिक्षण आणि Programetic कौशल्ये यांच्या माध्यमातून तरुणांचे नेतृत्व कौशल्य सुधारण्याचे काम MY Bharat ने हाती घेतले आहे.
  • या संघटनेमुळे तरुणांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक होईल ज्यामुळे त्यांना त्यांच्या समाजातील सकारात्मक बदल आणि विकास घडवून आणू शकतात.
  • तरुणांच्या आकांक्षांसह सरकारचे लक्ष केंद्रित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
  • एक Digital Ecosystem तयार करून MY Bharat चे उद्दिष्ट सरकारी कार्यक्रम आणि उपक्रम तरुण व्यक्तींपर्यंत पोहचवणे आणि सहभाग वाढवणे हे आहे.

मेरा युवा भारतचे फायदे

  • तरुण युवांमध्ये नेतृत्व विकास होईल.
  • तरुण पिढीचे समाजात एकत्रीकरण होईल आणि पुढच्या पिढीसाठी ते बदल घडवून आणतील.
  • तरुण पिढीच्या कौशल्यांवर वाव मिळेल.
  • तरुण वर्गाला देश विकसित करण्याची संधी भेटणार आहे.

मेरा युवा भारतचे पात्रता

  • MY Bharat हि संघटना 15-29 वयोगटातील तरुणांसाठी असेल.
  • विशेषत: किशोरवयीन मुलांसाठीकाही घटकांच्या बाबतीत, लाभार्थी हे 10-19 वर्षे वयोगटातील असतील.

मेरा युवा भारत Online Portal

मेरा युवा भारत मध्ये सहभागी होण्यासाठी MY Bharat portal च्या official website वर जाऊन 15-29 वर्षातील तरुण सहभागी होऊन शकता. आणि देशाच्या विकास उभारणीसाठी आपले योगदान देऊ शकतात.

मेरा युवा भारत

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. मेरा युवा भारत काय आहे समजले असेल. MY Bharat संघटनेच्या माध्यमातून नवीन पिढीला स्वतःचा विकास आणि देशाच्या विकास उभारणीसाठी सुद्धा प्रोत्सहन देता येईल. देशातील युवांसाठी हि खूप महत्वाची संधी आहे, जेणे करून ते आपले कौशल्य जगासमोर दाखवतील व सरकार आणि नागरिकांमधील दुआ म्हणून त्यांचे महत्वाचे योगदान देण्यात येईल. या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.

जर तुम्हाला मेरा युवा भारत याबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment