मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की भारतामधे 75% लोक हे शेतीवर अवलंबून असता, आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकर्याला त्याचा मालाचा कधी भाव येतो तर कधी येत नाही. त्यामुळे त्याचा आर्थिक परिस्थिती वर परिणाम होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्यातच सरकारने आता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एक नवीन योजना काढली आहे. त्या योजनेचे नाव नमो शेतकरी सन्मान निधी योजना | Namo Shetakari Sanman Nidhi Yojana असे आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना यात केंद्र सरकार पाहिले शेतकरी मित्राला दरवर्षी 6000 रुपये इतकी आर्थिक मदत करत होती. आता राज्य सरकारही 6000 रुपये भर देणार आहे. म्हणजेच सरकार आता दरवर्षी 12000 रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा करेल. आजच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजना |Namo Shetakari Sanman Nidhi Yojana या article मध्ये आपण या योजनेचे फायदे, लाभ, पात्रता काय आहे याची सविस्तर माहिती बघणार आहोत.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे | Namo Shetakari Sanman Nidhi Yojana in Marathi
नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत सरकार शेतकर्याची आर्थिक परिस्थिती मध्ये सुधार आणण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणार आहे. या योजनेत केंद्र सरकार 6000 रुपये आणि राज्य सरकार 6000 रुपये म्हणजे दरवर्षी 12000 रुपये अशी आर्थिक मदत शेतकर्याला होणार आहे. ही रक्कम शेतकर्यांच्या बैंक खात्यात जमा होईल. नमो शेतकरी सन्मान निधी योजना मध्ये देशाच्या 1.15 करोड शेतकर्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना Key Highlights
योजनेचे नाव | नमो शेतकरी सन्मान निधी योजना |
योजनेची घोषणा | 2023 |
योजनेस मान्यता | 15 जुन 2023 |
योजनेचा लाभ | प्रती कुटुंब रू. ६,०००/- प्रती वर्षी |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी ( पती, पत्नी व १८ वर्षा खालील अपत्ये) लाभार्थी |
विभाग | कृषी विभाग (Agriculture Department ) |
लाभ कसा भेटणार | राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या महा DBT पोर्टल द्वारे |
अनुदान वितरणासाठी बँक खाते उघडण्यास पवानगी | २८ जुलै २०२३ |
बँकेचे नाव | Bank Of Maharashtra |
बँक खात्याचा प्रकार | बचत खाते |
योजनेचा पहिला हप्ता कधी भेटणार | 2023 ऑगस्ट |
लाभ मिळविण्यासाठी आवश्यक बाबी | जमिनीची नोंद असणे, बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे |
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे वैशिष्ट्य| Features of Namo Shetakari Sanman Nidhi Yojana in Marathi
- नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
- या योजनेत मिळणारी रक्कम ही direct लाभार्थ्यांच्या बैंक account मध्ये जमा होणार.
- शेतकऱ्याला दरवर्षी 12000 रुपयांची आर्थिक मदत सरकार करणार.
- या योजनेचा लाभ 1.15 करोड शेतकऱ्यांना होणार आहे.
- नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकरी हा आत्मनिर्भर होईल.
- ६९०० कोटींचा भार आता राज्य सरकार उचलणार आहे
1 रुपयात पीक विमा काढला जाणार
नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील शेतकरी वर्गाला दरवर्षी 12000 रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा या योजनेचा देखील फायदा घेता येणार आहे असे आपले राज्याचे उपुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस घोषणा केली आहे. पीक विम्याचा हप्ता राज्य सरकार शेतकऱ्यांच्या वतीनं भरणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जी नुकसान भरपाई झालेली असेल तिच्या निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान काढून कमीत कमी 30% तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पीक कापणी प्रयोग अंतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येणार आहे.
ही योजना तीन वर्षांच्या कालावधीसाठी खरीप व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या वेळेत निविदा प्रक्रियेने राबविण्यात येणार आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना पात्रता | Eligibility of Namo Shetakari Sanman Nidhi Yojana in Marathi
- लाभार्थी मूळचा महाराष्ट्र रहिवासी हवा.
- लाभार्थी हा शेतकरी हवा.
- लाभार्थीचे महाराष्ट्राच्या agriculture department मध्ये registration पाहिजे.
- लाभार्थ्यांकडे सर्व कागदपत्रे हवे.
- लाभार्थ्यांची बैंक aacount आधार कार्ड ला लिंक पाहिजे.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना फायदे | Benefits of Namo Shetakari Sanman Nidhi Yojana in Marathi
- प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर पडली असून ते ६००० रुपयांची आर्थिक मदत करणार आहेत
- प्रति शेतकरी आता मिळणार केंद्राचे आणि राज्य सरकारचे १२००० रुपये
- १. १५ कोटी शेतकरी परिवाराला फायदा मिळणार आहे.
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे | Documents Needed For Namo Shetakari Sanman Nidhi Yojana in Marathi
- आधार कार्ड ( Aadhar Card )
- रहिवासी दाखला ( Residence certificate )
- उत्पन्नाचा दाखला ( Income Certificate )
- जातीचा दाखला ( Cast Certificate )
- सातबारा उतारा
- रेशन कार्ड ( Ration Card )
- बँक पासबुक ( Bank Passbook )
- मोबाइल नंबर (Mobile Number )
नमो शेतकरी सन्मान निधी योजना ऑनलाईन अर्ज नोंदणी | Online Registration for Namo Shetakari Sanman Nidhi Yojana in Marathi
- महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 मध्ये नमो शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे.
- या योजनेसाठी लवकरच अर्ज भरले जातील.
- त्यानंतर, अधिकृत वेबसाइट लिंक तयार झाल्यावर तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना कधीपासून व कशी लागू होणार?
केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता हा 27 फेब्रुवारी 2023 रोजी जारी करण्यात आला. या योजनेच्या कार्यपद्धती नुसार, पुढचा हप्ता हा देखील एप्रिल ते जुलै 2023 च्या दरम्यान जारी केला.
आता केंद्राच्या पुढील हप्त्यातच राज्य सरकार त्यांच्या वाट्याची रक्कम म्हणजेच 6000 रुपये टाकून शेतकऱ्यांना देणार, हि काही वेगळी कार्यपद्धती सरकार अवलंबणार आहे , हे मात्र या योजनेचा शासन कडून निर्णय आल्यावरच स्पष्ट होईल.
PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं?
PM किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबर सोबत लिंक करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. तरच तुम्हाला राज्य सरकार मिळणाऱ्या 6000 रुपयांचा फायदा होऊ शकतो.
थोडक्यात, नमो शेतकरी सन्मान निधी योजना यात शेतकऱ्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून मिळणार दरवर्षी १२००० रुपयांची आर्थिक मदत. नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत सरकार शेतकर्याची आर्थिक परिस्थिती मध्ये सुधार आणण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणार आहे.
FAQs
नमो शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे?
नमो शेतकरी सन्मान निधी योजना यात शेतकरीला राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून मिळणार दरवर्षी १२००० रुपयांची आर्थिक मदत.
PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं?
PM किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबर सोबत लिंक करणे.
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा मुख्य उद्धेश काय आहे?
नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत सरकार शेतकर्याची आर्थिक परिस्थिती मध्ये सुधार आणण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणार आहे.12000 रक्कम शेतकर्यांच्या बैंक खात्यात जमा होईल.
निष्कर्ष
मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेची माहिती समजली असेल. या योजनेचे लाभ कसा घ्यायचा त्याचे फायदे काय आहे, यात केंद्र सरकार पाहिले शेतकरी मित्राला दरवर्षी 6000 रुपये इतकी आर्थिक मदत करत होती. आता राज्य सरकारही 6000 रुपये भर देणार आहे. म्हणजेच सरकार आता दरवर्षी 12000 रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा करेल आहे. या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.
जर तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी योजना | Namo Shetakari Sanman Nidhi Yojana या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.