महिला सम्मान बचत पत्र योजना | उद्देश्य फायदे पात्रता काय आहे | MSSC- Mahila Samman Savings Certificate in Marathi 2023

आपल्याला माहितीच आहे कि सरकार दरवर्षी महिलांसाठी नवनवीन योजना राबवत असते. महिलांना सक्षम बनवने स्वतःच्या पायावर उभे करणे याकडे भारतचा कल चाललेला आहे. त्यातच ह्या वर्षी झालेल्या वार्षिक अर्थसंकल्प 2023 च्या वेळी माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना यावेळेस महिलांकडे विशेष भर दिला होता. त्यावेळी महिलांसाठी खूप साऱ्या योजना काढण्यात आलेल्या आहेत. त्यातच एक योजना म्हणजे महिला सम्मान बचत पत्र योजना हि आहे . या योजनेबाबद्दल तुम्हाला या आर्टिकल मध्ये सर्वच माहिती मिळून जाईल.

महिलांना आत्मनिर्भर बनवणे व त्यांना आर्थिक परिस्थितीमधून काढून सक्षम करणे. जर तुम्ही एकक महिला आहेत आणि तुम्हाला तुमच्या पैशाचीही बचत करायची असेल तर या तुम्ही योजनेत नक्कीच apply करा. तसेच तुम्ही आपल्या घरातल्या महिलांनाही या योनजेची माहितीची देऊ शकता. या आर्टिकल मध्ये तुम्हाला महिला सम्मान बचत पत्र योजना काय आहे, त्याचे फायदे काय आहे, पात्रता तसेच तुम्ही कशाप्रकारे हा फॉर्म भरू शकता याची सर्व माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळेल, तर आर्टिकल शेवट पर्यंत वाचा.

Table of Contents

महिला सम्मान बचत पत्र योजना काय आहे | Mahila Samman Savings Certificate in Marathi

2023-24 च्या झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सम्मान बचत पत्र योजनेची घोषणा केली. या योजनेत महिला किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते. व त्या ठेवीवर सरकार तुम्हाला 7.5% व्याजदर देणार आहे. 2 वर्ष पूर्ण झाल्यावर तुमची ठेव व त्यावरचे व्याज तुम्हाला परत भेटेल. या योजनेत महिलांना अडचण आल्यास त्यांना रक्कम काढता येऊ शकते. या योजनेत अर्ज करण्यासाठी मार्च 2025 पर्यंत मुदत आहेत. तरी सर्व महिलांनी या योनजेचा लवकरात लवकर लाभ घ्या.

महिला सम्मान बचत पत्र योजना अंतर्गत कोणत्याही वयोगटातील महिलेला लाभ घेता येणार आहे. हि योजना खास महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी काढण्यात आलेली आहे. कोणत्याही सरकारी बँक किंवा पोस्ट च्या FD पेक्षा हि योजना अधिक व्याजदर देणारी आहे.

महिला सम्मान बचत पत्र योजनेचा मुख्य उद्धेश काय आहे | Objectives of Mahila Samman Savings Certificate in Marathi

महिला सम्मान बचत पत्र योजनेचा मुख्य उद्धेश महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम बनवणे व त्यांचे कल्याण करणे. भरपूर महिलांमध्ये खूप साऱ्या कला भरलेल्या असता परंतु काही अडचणींमुळे ते त्या पूर्ण करू शकत नाही. महिलांना या कालांवर वाव मिळावा, महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, आपल्या भविष्यासाठी ते बचत करू शकतील त्या मुळे सरकारने महिला सम्मान बचत पत्र योजना राखली आहे.

महिला सम्मान बचत पत्र योजना Key Highlights

योजनामहिला सन्मान बचत पत्र योजना
व्दारा सुरुभारत सरकार
योजनेचा आरंभ2023
लाभार्थीदेशातील मुली आणि महिला
लाभ2 वर्षांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक
व्याजदर7.5% व्याजदर
उद्देश्य महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम बनवणे व त्यांचे कल्याण करणे
Official Website Updated Soon
श्रेणीकेंद्र सरकार
महिला सम्मान बचत पत्र योजना Key Highlights

महिला सम्मान बचत पत्र योजना फायदे | Benefits of Mahila Samman Savings Certificate in Marathi

 • या योज़नेअंतर्गत महिला आर्थिकदृष्टया सक्षम बनतील.
 • महिला सम्मान बचत पत्र योजनेत कोणत्याही वयोगटातील महिला अर्ज करू शकता.
 • या योजनेत महिलांना 7.5% व्याजदर मिळणार आहे.
 • या योजनेत महिला 2 वर्षांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता.
 • या योनजेअंतर्गत कमीत कमी 1000 पासून खाते उघडू शकता.

महिला सम्मान बचत पत्र योजना पात्रता | Eligibility of Mahila Samman Savings Certificate in Marathi

आतापर्यंत आपण महिला सम्मान बचत पत्र योजना काय आहे, महिला सम्मान बचत पत्र योजना उद्धेश काय आहे आणि महिला सम्मान बचत पत्र योजना फायदे बघितले. परंतु अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बघूया महिला सम्मान बचत पत्र योजना पात्रता काय आहे

 • महिला सम्मान बचत पत्र योजनेत खाते उघडण्यासाठी महिला हि भारतातील रहिवासी पाहिजे.
 • या योजनेत वयाला मर्यादा नाही, कोणत्याही वयोगटातील महिला पात्र ठरेल.
 • या योजनेत भाग घेण्यासाठी कोणत्या जाती धर्माचा भेद नाही, कोणीही महिला खाते उघडू शकते.

महिला सम्मान बचत पत्र योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents Needed for Mahila Samman Savings Certificate in Marathi

 • आधार कार्ड ( Aadhar Card )
 • मतदान कार्ड ( Voter ID )
 • शिधापत्रिका ( Ration Card )
 • जातीचा दाखला ( Caste Certificate )
 • पत्त्याचा पुरावा ( Recedential Proof
 • उत्पन्न प्रमाणपत्र ( Income Certificate )
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • Mobile Number
 • Email ID

महिला सम्मान बचत पत्र योजनेसाठी खाते कसे उघडावे?

महिला सम्मान बचत पत्र योजनेअंतर्गत खाते ओपन करण्यासाठी कोणत्याही ब्रँच च्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही खाते ओपन करू शकता. खाते ओपन करण्यासाठी फॉर्म तिथून च मिळून जाईल. अजून पर्यंत काही बँकेमध्ये हि योजना लागू झालेली नाही आहे. या योजनेसाठी खात ओपन करण्यासाठी वर दिलेले सर्व कागदपत्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. या कागदपत्रांची xerox कॉपी व ओरिजिनल सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

महिला सम्मान बचत पत्र योजनेसाठी फॉर्म कसा भरावा?

आताच आपण महिला सम्मान बचत पत्र योजनेसाठी खाते कसे उघडावे हे समजून घेतले परंतु खात ओपन करतांना आपल्याला एक फॉर्म भरावा लागतो तो कसा भरायचा चला बघूया

महिला सम्मान बचत पत्र योजनेत खाते ओपन करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. तो फॉर्म तो फॉर्म तुम्हाला कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये मिळून जाईल. फॉर्म कसा डाउनलोड करायचा त्या साठी इथे क्लिक करा. तुम्हाला फॉर्म ची सॉफ्ट कॉपी मिळून जाईल. त्याची तुम्ही प्रिंट मारून तो फॉर्म फॉर्म भरून दिलेले सर्व आवश्यक कागदपत्र जोडून तुम्ही apply करू शकता. फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रीतीने भरणे आवश्यक आहे.

महिला सम्मान बचत पत्र योजना

FAQs

महिला सन्मान बचत पत्र योजनेत किती व्याज मिळेल?

महिला सन्मान बचत पत्र योजनेत 7.5% व्याजदर मिळणार आहे.

महिला सम्मान बचत पत्र योजना काय आहे?

महिला सम्मान बचत पत्र योजना या योजनेत महिला किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते. व त्या ठेवीवर सरकार तुम्हाला 7.5% व्याजदर देणार आहे. 2 वर्ष पूर्ण झाल्यावर तुमची ठेव व त्यावरचे व्याज तुम्हाला परत भेटेल.

महिला सम्मान बचत पत्र योजनेत अर्ज करण्यासाठी मुदत काय आहे?

महिला सम्मान बचत पत्र योजनेत अर्ज करण्यासाठी मार्च 2025 पर्यंत मुदत आहेत

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल.  महिला सम्मान बचत पत्र योजना या योजनेची माहिती समजली असेल. या योजनेचे लाभ कसा घ्यायचा त्याचे फायदे काय आहे, यात महिला किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते. व त्या ठेवीवर सरकार तुम्हाला 7.5% व्याजदर देणार आहे. 2 वर्ष पूर्ण झाल्यावर तुमची ठेव व त्यावरचे व्याज तुम्हाला परत भेटेल. या योजनेत महिलांना अडचण आल्यास त्यांना रक्कम काढता येऊ शकते. या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.

जर तुम्हाला महिला सम्मान बचत पत्र योजना | Mahila Samman Savings Certificate  या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment