प्रधानमंत्री स्वनिधी योजना – उद्देश, फायदे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | PM SVANidhi Yojana in Marathi 2023

Covid-19 मुळे लागलेल्या lockdown मुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आर्थिक अडचणी येऊ लागल्या, विशेषत: Street Vendors ( पथ विक्रेते ) यांच्या उपजीविकेचे हाल झाले. पथ विक्रेते म्हणजेच जे शहरी लोकांना कमी किमतीत वस्तूंची उपलब्धी करून देतात. जसे की, ठेलावाला, फेरीवाला, रेहडीवाला इत्यादी कामाच्या क्षेत्रात ओळखले जातात. ते लोक भाजीपाला, street food, फळे, सणवारीच्या गोष्टी, कपडे इत्यादी गोष्टींचा पुरवठा करतात. या व्यवसायांत पुन्हा चालना देण्यासाठी तसेच त्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

Street Vendors ला त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सरकारने कर्ज देण्याचे सुनिश्चित केले आहे. त्यासाठी सरकारने प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी (प्रधानमंत्री स्वनिधी योजना) सुरू केली आहे. या योजनेत street vendors ला एका वर्षासाठी loan सरकारकडून मिळणार आहे.

Street Vendors यांना परवडणारे असे ह्या कर्जाची योजना त्यांचा सर्वांगीण विकासासाठी मदत होईल. प्रधानमंत्री स्वनिधी योजना काय आहे, त्याचे फायदे, उद्धेश्य, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत याची संपूर्ण माहिती आपण या article प्रधानमंत्री स्वनिधी योजना | PM SVANidhi Yojana in Marathi मध्ये बघणार आहोत. तर चला समजून घेऊया गरजू लोकांच्या मदतीचा हात म्हणून सरकारने काढलेली योजनेची संपूर्ण माहिती.

Table of Contents

प्रधानमंत्री स्वनिधी योजना काय आहे| PM SVANidhi Yojana in Marathi

Covid -19 च्या परिस्थितीमुळे आर्थिक स्थिती ही ढासळली होती. विशेषत: रस्ते विक्रेते यांची परिस्थिती मध्ये सुधार आणण्यासाठी परवडणारे working capital कर्ज सरकार देणार आहे. 1 जून 2020 रोजी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय ( Ministry of Housing and Urban Affairs ) याने street vendors साठी तसेच गरजू लोकांसाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी ( PM SVANIDHI ) लागू केली गेली आहे. ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही विक्रेत्यांना काम करण्याची पुन्हा एक संधी निर्माण झाली आहे. त्यांचा परिवाराचा सर्वागीण विकास करण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रबल करण्यासाठी त्यांचा उपजीविकासाठी PM SVANidhi ही अत्यंत महत्तवपूर्ण योजना आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा कालावधी हा मार्च 2022 पर्यंत होता पण तो कालावधी वाढवून आता डिसेंबर 2024 पर्यंत करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत छोट्या व्यावसायिकांना सुरुवातीला 10,000/- रुपये कर्ज देणार आहे. ते एका वर्षात हफ्ता भरून पूर्ण भरणे आवश्यक आहे. या कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्याच्या बँक account मध्ये 7% वार्षिक व्याज अनुदान खात्यात जमा करावे लागेल. पाहिल्या कर्जाची परतफेड केल्यानंतरच नवीन कर्ज घेण्यास पात्र असणार.

दुसर्‍या वेळेस 20,000/ – रुपये कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जाची परतफेड केल्यानंतर लाभार्थ्यांना 50,000/ – रुपये कर्ज सरकार देऊ करणार आहे. प्रत्येक वेळेस कर्ज घेताना online पोर्टल वर जाऊन नवीन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी करावी हे आपण पुढे बघणार आहोत.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना उद्दिष्टे | Objectives of PM SVANidhi Yojana in Marathi

  • Street Vendors ला आर्थिक मदत म्हणून सरकार कर्ज देणार आहे. तर ही मदत 3 टप्प्यात असणार आहे.
    • 10,000/- रुपये
    • 20,000/- रुपये
    • 50,000/- रुपये
  • जो लाभार्थी नियमित कर्ज परतफेड करेल त्याला प्रोत्साहन दिले जाईल.
  • Digital transaction ( डिजिटल व्यवहार ) ला प्रोत्साहन देने.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना Key Highlights in Marathi

योजनाप्रधानमंत्री स्वनिधी योजना
व्दारा सुरुमाननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी
योजना सुरुवात01 जून 2020
लाभार्थीदेशातील रस्ते विक्रेते आणि छोटे व्यावसायित
Official Website https://pmsvanidhi.mohua.gov.in/
उद्देश्यStreet Vendors ला त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सरकारने कर्ज देण्याचे सुनिश्चित केले आहे. त्यासाठी सरकारने प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी (प्रधानमंत्री स्वनिधी ) योजना सुरू केली आहे.
रूपे डेबिट कार्डसर्व कर्जदारांना रूपे डेबिट कार्ड देण्यात येईल
विभागगृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय ( Ministry of Housing and Urban Affairs )
अर्ज करण्याची पद्धतOnline
लाभ10,000/- रुपये कर्ज
20,000/- रुपये कर्ज
50,000/- रुपये कर्ज
अंतिम कालावधीडिसेंबर 2024
मार्जिनशून्य
तारणशून्य
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
वर्ष2023
PM SVANidhi Key Highlights

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत कर्ज कश्या प्रकारे दिले जाईल

प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही रस्त्यावरील विक्रेत्यांना मदतीचा हात म्हणून काढण्यात आली आहे. या योजने अंतर्गत street vendors ला 3 टप्प्यात कर्ज देण्यात येणार आहे ते कसे तर बघुया –

टप्पा 1 – 10,000/- रुपये

  • सुरुवातीला लाभार्थ्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत 10,000/- कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जाची परतफेड ही मासिक हप्त्यात करता येईल.
  • या योजनेत नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांकडून 7% वार्षिक व्याज अनुदान घेण्यात येणार आहे.
  • कर्ज परतफेड करण्याचा कालावधी हा जास्तीत जास्त 12 महीने असणार आहे. त्याचा आत तुम्हाला कर्जाची परतफेड करावी लागेल तेव्हाच तुम्ही पुढचे कर्ज घेण्यासाठी पात्र असणार.

टप्पा 2 – 20,000/- रुपये

  • पाहिल्या टप्प्यात घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर लाभार्थी दुसर्‍या टप्प्यात कर्ज घेण्यास पात्र असणार.
  • प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात लाभार्थ्यांना 20,000/- कर्ज देण्यात येणार आहे.
  • 7% वार्षिक व्याज अनुदान घेण्यात येणार आहे.
  • कर्ज परतफेड करण्याचा कालावधी हा कमीत कमी 6 महीने असणार आहे. त्याचा आत तुम्हाला कर्जाची परतफेड करावी लागेल तेव्हाच तुम्ही पुढचे कर्ज घेण्यासाठी पात्र असणार.

टप्पा 3 – 50,000/- रुपये

  • दुसर्‍या टप्प्यात घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर लाभार्थी तिसर्‍या टप्प्यात कर्ज घेण्यास पात्र असणार.
  • प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या तिसर्‍या टप्प्यात लाभार्थ्यांना 50,000/- कर्ज देण्यात येणार आहे.
  • 7% वार्षिक व्याज अनुदान घेण्यात येणार आहे.
  • कर्ज परतफेड करण्याचा कालावधी हा जास्तीत जास्त 36 महीने असणार आहे. त्याचा आत तुम्हाला कर्जाची परतफेड करावी लागेल.
योजना प्रधानमंत्री स्वनिधीरक्कम कार्यकाळमार्जिन
टप्पा 110,000/- रुपये 12 महीनेशून्य
टप्पा 220,000/- रुपये 06 महीनेशून्य
टप्पा 350,000/- रुपये 36 महीनेशून्य

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सबसिडी कशी भेटणार?

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत व्याज हे direct लाभार्थीच्या bank account मध्ये जमा केले जाईल. कर्जाची pre-payment झाल्यावर सबसिडी ही एकाच वेळी खात्यात जमा केली जाईल.

लाभार्थ्यांने डिजिटल पद्धतीनुसार व्यवहार केल्यावर त्याला 1200/- रुपये cashback दिला जाईल. पाहिल्या कर्जाची वेळेत परतफेड केल्यास दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात लाभार्थी पात्र ठरू शकतो.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना फायदे | Benefits of PM SVANidhi Yojana in Marathi

  • प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत स्ट्रीट वेंडर्स ला लाभ मिळणार आहे.
  • या योजनेत लाभार्थ्यांना 3 टप्प्यात कर्ज देण्यात येणार आहे. त्यात
    • 10,000/-
    • 20,000/-
    • 50,000/-
  • या योजनेत दंड देण्यास तरतूद नाही.
  • गरजू लोकांनाही या योजनेचा फायदा होणार.
  • प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत तुम्हाला 7% वर कर्ज मिळेल.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना लाभार्थी | Beneficiaries of PM SVANidhi Yojana in Marathi

  • नाईची दुकाने ( Barber shops )
  • जोडे दुरस्ती दुकाने मोची Shoe Repair Shops
  • पान सुपारीची दुकाने (पानवडी) ( Betel nut shops )
  • लॉन्ड्री दुकाने (धोबी) ( Laundry Shops )
  • भाजी विक्रेता ( Vegetable vendor )
  • फळ विक्रेता ( Fruit Seller )
  • खाण्यासाठी तयार स्ट्रीट फूड ( Ready to eat street food )
  • चहा स्टँड ( Tea Stand )
  • ब्रेड, डंपलिंग्ज आणि अंडी विक्रेते ( Sellers of bread, dumplings and eggs )
  • कपडे विकणारे व्यापारी ( Merchants selling clothes )
  • पुस्तके / स्टेशनरी धारक ( Books / Stationery Holders )
  • कारागीर उत्पादने ( Artisan products )

प्रधानमंत्री स्वनिधी योजना कर्ज देणार्‍या संस्था

  • प्रादेशिक ग्रामीण बँक
  • सहकारी बँक
  • स्मॉल फायनान्स बँक
  • अनुसूचित व्यावसायिक बँक
  • मायक्रो फायनान्स संस्था आणि SHG बँका
  • बिगर बँकिंग वित्त कंपन्या

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Documents needed for PM SVANidhi Yojana in Marathi

  • आधार कार्ड ( Aadhar Card )
  • पॅन कार्ड ( PAN Card )
  • मतदार ओळखपत्र ( Voting Card )
  • रेशन कार्ड ( Ration Card )
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बैंक पासबुक
  • Mobile Number
  • Email – ID

प्रधानमंत्री स्वनिधी योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया Process | Online Application Process for PM SVANidhi Yojana in Marathi

Step 1

  • प्रधानमंत्री स्वनिधी योजनाचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम त्याच्या official website वर जा.
  • Official Website वर गेल्यानंतर Apply Loan 10K या button वर क्लिक करा.
प्रधानमंत्री स्वनिधी योजना
  • त्यानंतर तुमच्या समोर एक page येईल त्यात तुम्हाला Mobile Number टाकून Request OTP वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाइल नंबर वर तुम्हाला एक OTP येईल तो verify करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची vendors ची category निवडायची आहे.
  • विचारलेले आवश्यक कागदपत्रे upload करा – (श्रेणी A साठी सर्वेक्षण संदर्भ क्रमांक ( Survey Reference Number ) आणि विक्री प्रमाणपत्र ( Vending Certificate ) आणि श्रेणी C आणि श्रेणी-D साठी LOR ( Letter of Recommendation ))
  • तुमचा आधार कार्ड क्रमांक enter करा आणि OTP टाकून तो verify करा
  • पुढे जाण्यासाठी Submit बटणावर क्लिक करा
  • चेकबॉक्सवर टिक करून Agree to declaration मान्य करा
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘Submit’ बटणावर क्लिक करा

अशा प्रकारे तुम्ही PM SVANidhi Yojana साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करू शकता.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना login करण्याची पद्धत | PM SVANidhi Login Process

  • प्रधानमंत्री स्वनिधी योजनाचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम त्याच्या official website वर जा.
  • Official Website वर गेल्यानंतर तिथे login option वर click करा.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक page येईल त्यात तुम्हाला Mobile Number टाकून Request OTP वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाइल नंबर वर तुम्हाला एक OTP येईल तो verify करा.

अशा प्रकारे तुम्ही PM SVANidhi वेबसाइटवर तुमच्या खात्यात यशस्वीपणे Login केले आहे.

थोडक्यात, प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडरची आत्मानिर्भर निधी (PM SVANidhi) योजना हा कोविड-19 च्या महामारीमुळे झालेल्या आर्थिक प्रभावित झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेला एक सामाजिक कल्याणकारी कार्यक्रम आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांचे जीवनमान आणि त्यांच्या स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे.

FAQs

प्रधानमंत्री स्वनिधी १००००/- रुपये कर्जाची योजनेचा परतफेड कालावधी किती आहे ?

प्रधानमंत्री स्वनिधी १००००/- रुपये कर्जाची योजनेचा परतफेड कालावधी 12 महीने आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना कर्जाची शेवटची तारीख काय आहे?

प्रधानमंत्री स्वनिधी योजना कर्जाची शेवटची तारीख डिसेंबर 2024 आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना काय आहे?

Street Vendors ला त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सरकारने कर्ज देण्याचे सुनिश्चित केले आहे. त्यासाठी सरकारने प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी (प्रधानमंत्री स्वनिधी ) योजना सुरू केली आहे

प्रधानमंत्री स्वनिधी योजना Login कसे कराल?

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी official website वर जाऊन लॉगिन करू शकता.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सबसिडी किती येणार?

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत 1200/- रुपये सबसिडी येणार.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना व्याजमुक्त आहे का?

प्रधानमंत्री स्वनिधी योजना हि 7% वार्षिक व्याज अनुदान घेते.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. प्रधानमंत्री स्वनिधी या योजनेची माहिती समजली असेल. या योजनेचे लाभ कसा घ्यायचा त्याचे उद्दिष्टे काय आहे नोंदणी कसे करायचे. Street Vendors ला त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सरकारने कर्ज देण्याचे सुनिश्चित केले आहे. या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.

जर तुम्हाला प्रधानमंत्री स्वनिधी योजना | PM SVANidhi Yojana in Marathi या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment