प्रधानमंत्री यशस्वी योजना | फायदे, पात्रता, ऑनलाईन अर्ज | PM Yashasvi Scheme in Marathi 2023

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे. आज ही देशात असे बहुसंख्य विद्यार्थी आहेत जे की आर्थिक स्थिति मुळे आपले शिक्षण पूर्ण करू नहीं शकत. ह्या गोष्टीचा विचार करून भारत सरकारने गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रधानमंत्री यशस्वी योजना काढली आहे. या योजनेत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी सरकार scholarship देणार आहे.

प्रधानमंत्री यशस्वी योजना काय आहे, पात्रता, फायदे, scholarship कश्या प्रकारे प्राप्त होणार तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा याची सर्व माहिती तुम्हाला प्रधानमंत्री यशस्वी योजना | PM Yashasvi Scheme या article मध्ये मिळणार आहे.

Table of Contents

प्रधानमंत्री यशस्वी योजना | PM Yashasvi Scheme in Marathi

प्रधानमंत्री यशस्वी योजना ही एक सरकारी योजना असून जे विद्यार्थी आपल्या आर्थीक परिस्थिती मुळे आपले शिक्षण पूर्ण नही करू शकणार यांच्या साठी राबवण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने YASHASVI हा एक शिष्यवृत्ती प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला आहे.

प्रधानमंत्री यशस्वी योजनेचा लाभ इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ही स्कॉलरशिप घेण्यासाठी विद्यार्थ्यांना National Testing Agency ( NTA ) द्वारे एक entrance test द्यावी लागणार आहे. जे विद्यार्थी यात पास असणार ते या स्कॉलरशिप साठी पात्र राहतील. प्रधानमंत्री यशस्वी योजने अंतर्गत इतर मागासवर्गीय ( OBC ), विमुक्त भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती ( DNT/ NT/ SNT ), आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीय ( EBC ) असलेल्या विद्यार्थ्यांना सरकार 75,000 ते 1,25,000 रुपयांची स्कॉलरशिप सरकारने प्रधानमंत्री यशस्वी योजनेत देण्याचे ठरवले आहे.

प्रधानमंत्री यशस्वी योजना Key Highlights

योजनेचे नावप्रधानमंत्री यशस्वी योजना
योजना सुरू Government of India 
विभाग सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय ( Ministry of Social Justice and Empowerment )
वर्ष 2023
PM यशस्वी शिष्यवृत्तीचे फायदेScholarship मिळवणे
पात्रताइयत्ता 9 वी ते 11 वी मध्ये शिकणारे आरक्षित वर्गातील विद्यार्थी
वयोमर्यादा 14 ते 17 वर्षे 
शिष्यवृत्तीची रक्कम 75000 ते 125000 रु
प्रधानमंत्री यशस्वी योजना शिष्यवृत्ती अर्ज फॉर्म तारखा11 जुलै ते 17 ऑगस्ट 2023 (Extended)
प्रधानमंत्री यशस्वी योजना शिष्यवृत्ती Application Form 2023 modeOnline 
प्रधानमंत्री यशस्वी योजना Exam Date29 September 2023
Exam mode Offline 
एकूण विद्यार्थी निवडले जाणार आहेत15000
परीक्षेतील एकूण प्रश्न100
एकूण गुण400
Qualifying marks 45%
Website https://yet.nta.ac.in/
प्रधानमंत्री यशस्वी योजना Key Highlights

प्रधानमंत्री यशस्वी योजनेचे फायदे | Benefits of PM Yashasvi Scheme in Marathi

  • PM यशस्वी योजनाच्या शिष्यवृत्ती साठी प्राप्त झालेल्या 9 वी तिल विद्यार्थ्यांना दरवर्षी 75,000 रुपये scholarship मिळणार आहे. तसेच 11 वी तिला विद्यार्थ्यांना दरवर्षी 1,25,000 रुपये मिळणार आहे.
  • प्रधानमंत्री यशस्वी योजने अंतर्गत शाळा आणि होस्टेल ची फि समाविष्ट असणार आहे.

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी पात्रता | Eligibility of PM Yashasvi Scheme in Marathi

  • अर्ज करणारा विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय ( OBC ), विमुक्त भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती ( DNT/ NT/ SNT ), आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीय ( EBC ) या वर्गातला असावा.
  • विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा.
  • लाभ घेणारा विद्यार्थी हा 2022-23 मध्ये 8 वी आणि 10 वी उत्तीर्ण असावा
  • इयत्ता 9 वी मध्ये असणारा विद्यार्थी हा 01 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2011 मधला असावा.
  • इयत्ता 11 वी मध्ये असणारा विद्यार्थी हा 01 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2009 मधला असावा.
  • वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असावे.

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी अर्ज करताना लागणारी फी | Application Fee for PM Yashasvi Scheme in Marathi

प्रधानमंत्री यशस्वी योजने अंतर्गत apply करताना विद्यार्थी मित्राकडून कोणत्या प्रकारची fees घेतली जाणार नाही. विद्यार्थीने मोफत अर्ज भरून परीक्षा द्यावी.

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Documents needed for PM Yashasvi Scheme in Marathi

  • आधार कार्ड
  • उत्पन्नचा दाखला
  • जातीचा दाखला
  • 8 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वाक्षरी
  • बैंक पास बुक
  • दिव्यांग प्रमाणपत्र ( असेल तर )
  • Mobile Number
  • Email ID

प्रधानमंत्री यशस्वी योजनेच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे पॅटर्न | PM Yashasvi Scheme Pattern in Marathi

  • ही test ऑनलाइन computer वर घेतली जाणार आहे.
  • या परीक्षेचा कालावधी 3 तास आहे
  • या परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातील. 400 गुणांची ही परीक्षा असणार आहे.
  • परीक्षेमध्ये विचारले गेलेले सर्व प्रश्न बहुपर्यायी ( Objective – MCQ ) असणार
  • ही परीक्षा English आणि hindi दोन्ही माध्यामातून घेतली जाणार आहे.
Subjects of TestNo. of QuestionsTotal Marks
Mathematics30120
Science2080
Social Science25100
General Awareness/Knowledge25100
प्रधानमंत्री यशस्वी योजना Pattern

प्रधानमंत्री यशस्वी योजनेच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा पाठयक्रम | PM Yashasvi Scheme Syllabus in Marathi

प्रधानमंत्री यशस्वी योजनेच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा पाठयक्रमासाठी 9 वी तिला विद्यार्थ्यांंना 8 वी चा syllabus असणार आहे तर 11 वी तिल विद्यार्थ्यांना 10 वी चा syllabus असणार आहे.

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा | How to Register PM Yashasvi Scheme in Marathi

  • सर्वप्रथम PM yashasvi योजनेच्या official website वर जा.
  • आता Home Page वर register यावर click करा
  • त्यानंतर New Candidate Register Here या button क्लिक करा.
  • आता तिथे एक form open होईल.
  • त्यात विचारलेल्या वैयक्तिक आणि इतर तपशीलांमध्ये तपशील भरा.
  • सबमिट टॅबवर क्लिक करा आणि नंतर OTP पाठवा.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
  • पीएम यशस्वी शिष्यवृत्ती नोंदणी 2023 आयडी आणि पासवर्ड वापरून, अर्ज उघडा.

प्रधानमंत्री यशस्वी योजना Application Form

  • सर्वप्रथम PM yashasvi योजनेच्या official website वर जा.
  • आता होमपेजवर दिलेल्या Application Form लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी आयडी आणि पासवर्ड वापरून, अर्ज उघडा.
  • अर्जातील तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे upload करा.
  • आता Final Submit करण्यापूर्वी PM यशस्वी योजना अर्ज फॉर्म पुन्हा तपासा.
  • अर्ज Submit करा आणि नंतर त्याचा PDF करा नंतर वापरण्यासाठी उपयोग करा.
प्रधानमंत्री यशस्वी योजना

FAQs

प्रधानमंत्री यशस्वी योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे?

प्रधानमंत्री यशस्वी योजनेचा लाभ इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी त्याच्या official website जाऊन करावा लागेल.

प्रधानमंत्री यशस्वी योजनेत शिष्यवृत्तीची रक्कम किती आहे?

प्रधानमंत्री यशस्वी योजनेत विध्यार्थ्यांना 75,000 ते 1,25,000 रुपयांची शिष्यवृत्तीदेण्यात येणार आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा प्रधानमंत्री यशस्वी योजना | PM Yashasvi Scheme हा article आवडला असेल. या योजनेची माहिती समजली असेल. या योजनेचे लाभ कसा घ्यायचा त्याचे online account कसे create करायचे . या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.

जर तुम्हाला प्रधानमंत्री यशस्वी योजना | PM Yashasvi Scheme या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजून लेख वाचा

Leave a Comment