भारत सरकार नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना असते. कोरोना नंतर सरकारने गरीब लोकांसाठी गरीब कल्याण पैकेज ची घोषणा केली होती यात सरकारने नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या होत्या. आजकाल शहरी भागात कोणतीही सुविधा लवकर उपलब्ध होते परंतु ग्रामीण भागातील लोकांना अजून हि त्रास सहन करावा लागतो. यावेळी सरकाने महिलांना आथिर्कदृष्टीचा विचार करून विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ची अंबलबजावणी केली. या योजनेच्या अंतर्गत 18 वर्षांपुढील महिलांना एक सिलेंडर फ्री देण्यात येईल. भारतात जनसंख्या अधिक आहेत भागांमध्ये LPG ची आवश्यकता भासते, त्या भागातील महिला अजून हि गॅस पासून वंचित आहेत.
देशातील महिलांना त्यांच्या विकासासाठी हातभार म्हणून सरकार महिलांना योजना अंतर्गत फ्री सिलेंडर वाटप करणार आहे. त्यासाठी चला तर समजून घेऊया कि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे, लाभ पात्रता काय आहे, आणि या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करवा याची सर्व माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळून जाईल
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे | PM Ujjwala Yojana in Marathi
1 मे 2016 रोजी माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेष येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना याची घोषणा केली होती. या योजनेचा मुख्य उद्धेश हा ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वच्छ अन्न घ्यावे, LPG गॅस नसल्या कारणाने तेथील स्रिया स्वयंपाकासाठी लाकडे आणि कोळसा वापरतात त्यामुळे तेथील महिलांना गंभीर आजार होतात, आणि त्या आजारांवर औषोधोपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याकारणाने ते मृत्यू चे कारण होतात. तेथील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील लोंकाना गंभीर आजारापासून वाचवण्यासाठी सरकारने योजना काढली आहे. हि योजना 2016-17 च्या आर्थिक वर्षात काढण्यात आली होती आणि हि सुविधा 3 वर्षापर्यंत होती. परंतु कोरोना सारख्या महासंगमामुळे जनतेची आर्थिक स्थिती वाईट झाली होती, याचा विचार करून या योजनेची सुविधा वाढवण्यात आली आहे.
2023 मध्ये या योजनेत बदल करून महिलांना फ्री गॅस connection भेटणार आहेत. एवढेच नवे तर कॅबिनेट च्या बैठकी नंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना च्या अंतर्गत लाभार्थ्यांसाठी सबसिडी ammount हि 2०० होती तर ती 3०० रुपये प्रति सिलेंडर केली आहे. या योजनेत 3200 रुपये हे गॅस agency ला दिले जातात. त्यात 1600 रुपये हे केंद्र सरकार द्वारा दिले जातात, आणि 1600 रुपये हे तेल कंपनी कडून दिले जातात. जेणेकरून नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना Key Highlights
योजनेचे नाव | प्रधानमंत्री उज्ज्वला योजना |
सुरुवात | 1 मे 2016 |
कोणी सुरु केली | श्री नरेंद्र मोदी |
उद्धेश | फ्री गॅस connection उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | 18 वर्षांपुढील महिला |
Official Website | Click Here |
Helpline Number | 18002666696 |
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभ | Benefits of PM Ujjwala Yojana in Marathi
- महिलांना मिळणार फ्री गॅस Connection
- ग्रामीण भागातील प्रदूषण कमी करणे हा मुख्य हेतू आहे.
- महिला सशक्तीकरणाला वाव मिळेल.
- PM Ujjwala Yojana मध्ये सबसिडी 200 हुन 300 करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पात्रता | Eligibility for PM Ujjwala Yojana in Marathi
PM Ujjwala Yojana मध्ये अर्ज करण्यासाठी खाली दिलेली पात्रता आवश्यक आहे.
- अर्जदाराचे (केवळ महिला) वय 18 वर्षे पूर्ण असावे.
- अर्ज करणाऱ्याच्या त्याच घरातील कोणत्याही OMC कडून इतर कोणतेही LPG Connection नसावे.
- अर्ज करणारी महिला हि BPL च्या परिवारातील असावी.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आवश्यक कागदपत्रे | Documents needed for PM Ujjwala Yojana in Marathi
- आधार कार्ड
- जन-धन बँक खात्याचे नंबर
- पंचायत अधिकारी / नगर पालिका यांनी प्रमाणित केलेले बीपीएल प्रमाणपत्र (BPL Certificate )
- BPL रेशनकार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- कुटुंबाच्या स्थितीला आधार देण्यासाठी पूरक KYC
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अर्ज कसा करावा
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या गॅस agency मध्ये जावे. तिथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फ्री गॅस Connection मध्ये अर्ज करण्यासाठी फॉर्म घ्यावा आणि त्यात विचारली सर्व माहिती बरोबर भरून फॉर्म जमा करून दयावा. फॉर्म जमा करताना ते काही कागदपत्र विचारतील ते त्या सोबत जमा करावे अश्या प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मध्ये अर्ज करू शकतात.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हेल्पलाइन नंबर
PM Ujjwala Yojana मध्ये कोणत्याही प्रकाराची चौकशी करण्यासाठी किंवा नवीन माहिती जाणून घेण्यासाठी सरकारने हेल्पलाईन नंबर दिला आहे तो-
- 18002666696
FAQs
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभ काय आहे
महिलांना मिळणार फ्री गॅस Connection
ग्रामीण भागातील प्रदूषण कमी करणे हा मुख्य हेतू आहे.
महिला सशक्तीकरणाला वाव मिळेल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मध्ये सबसिडी 200 हुन 300 करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हेल्पलाइन नंबर
18002666696
निष्कर्ष
मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेची माहिती समजली असेल. या योजनेचे लाभ कसा घ्यायचा त्याचे फायदे काय आहे, यात ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वच्छ अन्न घ्यावे, LPG गॅस नसल्या कारणाने तेथील स्रिया स्वयंपाकासाठी लाकडे आणि कोळसा वापरतात त्यामुळे तेथील महिलांना गंभीर आजार होतात, आणि त्या आजारांवर औषोधोपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याकारणाने ते मृत्यू चे कारण होतात. तेथील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील लोंकाना गंभीर आजारापासून वाचवण्यासाठी सरकारने योजना काढली आहे . या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.
जर तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना | PM Ujjwala Yojana या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.