आदित्य L1 मिशन काय आहे | Aditya L1 Mission in Marathi

भारताच्या यशस्वी झालेल्या चंद्र मोहीम नंतर आता भारताचे ISRO ने सूर्याभ्यास मोहीम गाठली आहे. या मोहिमेला Solar Mission म्हणून नाव देण्यात आले आहे. आदित्य L1 या यानाद्वारे भारतीय अंतराळ संशोधन संस्था ने 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी भारताचे पहिले Solar Mission launch केले आहे.

आदित्य एल 1 मिशन काय आहे, त्याचा प्रवास कसा होणार आहे, तसेच त्याचे उद्दिष्टे काय हे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आदित्य L1 मिशन | Aditya L1 Mission in Marathi या article मध्ये मिळणार आहे.

Table of Contents

आदित्य L1 मिशन काय आहे | Aditya L1 Mission in Marathi

भारताच्या चंद्रयान 3 मिशन च्या यशस्वी मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था ने सूर्याचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी भारतीय First Solar Mission launch केले आहे. हे Mission आदित्य L1 यानाच्या सहाय्याने जाणार आहे. भारताच्या श्रीहरीकोटा च्या सतीश धवन space centre मधून 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आदित्य L1 मिशन launch केले गेले.

आदित्य L1 मिशन हे परिपूर्ण स्वदेशी असून ते Indian Institute of Astrophysics ( IIA ) ने तयार केले आहे. आदित्य L1 मिशन द्वारे आपल्याला सूर्याची सर्व माहिती भेटेल. हा प्रवास 125 दिवसांचा असणार आहे.

आदित्य L1 मिशन नाव का पडले | Why was the Aditya L1 Mission named

आदित्य L1 मिशन नावामध्ये L1 म्हणजे अंतराळातील एक असे स्थान जेथे सूर्य आणि पृथ्वीसारख्या दोन खगोलीय पिंडाची गुरुत्वाकर्षण शक्ती ( Gravitational Force ) समतोल स्थितीत आहेत ( Lagrange Point 1 of the Sun-Earth system ). सूर्याचे दुसरे नाव हे आदित्य असल्याने, व तसेच त्याचे लक्ष्य L1 point पर्यंत पोहोचणे आहे, म्हणून या मोहिमेला आदित्य L1 मिशन असे नाव देण्यात आले.

आदित्य L1 मिशन मध्ये L1 Point का निवडला | Why did Select L1 Point in Aditya L1 Mission in Marathi

पृथ्वी पासून सूर्याचे अंतर हे 150 दशलक्ष किलोमीटर आहे. या अंतर दरम्यान 5 point आहेत. जसे L1, L2, L3, L4, L5. यात L1, L2, L3 हे point स्थिर नाही. L4, L5 हे point स्थिर आहेत. L1 हा पहिला point आहे ज्याचे पृथ्वी पासूनचे अंतर हे 1.5 दशलक्ष किलोमीटर आहे.

L1 Point हे असे ठिकाण आहे तेथून २४ तास सूर्याचे निरीक्षण करता येऊ शकते. जिथे पृथ्वी आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणामध्ये ( Gravitational Force ) समतोल निर्माण होतो. पृथ्वी आणि गुरुत्वाकर्षण यांच्या मधील संतुलनामुळे एक केंद्रापसारक शक्ती म्हणजेच Centrifugal Force तयार होतो, त्यामुळे कोणतेही अंतराळयान हे एकाच ठिकाणी स्थिर राहू शकते. L1 point हा पृथ्वीच्या जवळ असून इथून संपर्क करणे खूप सोपे आहे. त्यामुळे L1 point select केला.

आदित्य L1 मिशन

आदित्य L1 मिशन उद्दिष्टे | Objectives of Aditya L1 Mission in Marathi

  • सूर्याभोवती असणार्‍या वातावरणाचा अभ्यास करणे.
  • क्रोमोस्फेरिक ( chromospheric ) आणि कोरोनल हीटिंग ( coronal heating ) चा अभ्यास करणे, फ्लेअर्स ( flares ) वर संशोधन करणे
  • सौर कोरोनाचे भौतिकशास्त्र ( Physics of solar corona ) आणि त्याचे तापमान मोजणे.
  • कोरोनल ( coronal mass ejections ) आणि कोरोनल लूप प्लाझ्माचे ( ionized plasma) निदान करणे, तापमान, वेग आणि घनता माहिती काढणे.
  • सूर्याभोवती वाऱ्याची उत्पत्ती, रचना आणि गतिशीलता तपासणे.
आदित्य L1 मिशन

आदित्य L1 मिशन वरील उपकरणे | Instruments of Aditya L1 Mission in Marathi

व्हिजिबल एमिशन लाइन करोनाग्राफ ( Visible Emission Line Coronagraph – VELC )

  • सूर्याच्या भोवती असणारे आणि वस्तुमान उत्सर्जन यांचा अभ्यास करणे हे ह्या उपकरणाचे काम आहे.

सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप ( Solar Ultraviolet Imaging Telescope – SUIT )

  • सूर्याचा फोटोस्फीअर ( Photosphere) आणि क्रोमोस्फीअर (Chromosphere) येथील ultra Violet पट्टयाची निरीक्षणे नोंदणी करणे

आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपरिमेंट ( Aditya Solar wind Particle Experiment- ASPEX )

  • सौर वारा विश्लेषक प्रोटॉन ( Proton ) आणि दिशानिर्देशांसह जड आयन ( Heavier ion ) यांचे निरीक्षण करणे

प्लाझ्मा नालायझर पैकेज फॉर आदित्य ( Plasma Analyser Package For Aditya – PAPA)

  • सौर वारा विश्लेषक इलेक्ट्रॉन ( Electron ) आणि दिशानिर्देशांसह जड आयन ( Heavier ion ) यांचे निरीक्षण करणे

सोलर एनर्जी एक्स-रे स्पेक्टोमीटर ( Solar Low Energy X-ray Spectrometer – SoLEXS)

  • मऊ ( Soft ) क्ष-किरण आणि त्यांच्या ऊर्जेतील वैविध्य यांचा अभ्यास करणारे उपकरण.

हाय एनर्जी एल वन ऑर्बिटिंग एनर्जी स्पेक्ट्रोमीटर ( High Energy L1 Orbiting X-ray Spectrometer – HEL1OS )

  • कठोर ( Hard ) क्ष-किरण आणि त्यांच्या ऊर्जेतील वैविध्य यांचा अभ्यास करणारे उपकरण

मॅग्नोमीटर ( Magnetometers )

  • L1 Point जवळ असणाऱ्या आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास करणारे
आदित्य L1 मिशन वरील उपकरणे

FAQs

आदित्य L1 मिशन कधी लॉन्च करण्यात आले?

आदित्य L1 मिशन हे 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी लॉन्च करण्यात आले.

आदित्य L1 मिशन मध्ये L1 काय आहे?

आदित्य L1 मिशन नावामध्ये L1 म्हणजे अंतराळातील एक असे स्थान जेथे सूर्य आणि पृथ्वीसारख्या दोन खगोलीय पिंडाची गुरुत्वाकर्षण शक्ती ( Gravitational Force ) समतोल स्थितीत आहेत.

आदित्य L1 मिशन कुठून लॉन्च करण्यात आले?

आदित्य L1 मिशन हे श्रीहरीकोटा च्या सतीश धवन space centre मधून लॉन्च करण्यात आले.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. आदित्य L1 मिशन याची माहिती समजली असेल. या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.

जर तुम्हाला आदित्य L1 मिशन काय आहे | Aditya L1 Mission in Marathi या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment